टेलिव्हिजनवरील मालिका आणि प्रेक्षकांचं एक अतूट नातं असतं. मालिकामधील पात्रांसाठी चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा नेहमीच असते. त्यामुळे या मालिकांना अधिक मनोरंजक करण्यासाठी नेहमीच निरनिराळे प्रयत्न केले जातात. बऱ्याचदा या मालिकांमध्ये यासाठी सणसमारंभ साजरे केले जातात. ज्यामुळे मालिकेतील पात्रांचे प्रेक्षकांशी भावनिक नाते निर्माण होते. एन.आर.आय नचिकेत आणि मराठमोळ्या सईची आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेली, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही मालिका सुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. नवनवीन सरप्रायझेस देण्यात सुद्धा ही वाहिनी आघाडीवर आहे. मालिकेला मिळणारे एखादे नवे वळण, एखाद्या नव्या पात्राची अचानक होणारी एन्ट्री, अशा गोष्टी प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. आता आणखी एक गोड सरप्राइझ ‘झी युवा’च्या ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेतून अनुभवायला मिळणार आहे. अनेकांना आपल्या तालावर नाचायला लावणारी फुलवा खामकर, या मालिकेत चक्क अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. उत्कृष्ट कोरिओग्राफर असलेली फुलवा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
या मालिकेत फुलवाची नेमकी काय आहे भूमिका
फुलवा खामकर या मालिकेत देखील तिची खरी भूमिकाच साकारणार आहे. म्हणजेच ती या मालिकेतसुद्धा कोरिओग्राफरचीच भूमिका साकारताना दिसणार आहे. सईला नृत्याचे धडे देताना तिला पाहणे, हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम अनुभव असणार आहे. आता या मालिकेत सई केतकर म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि फुलवा खामकर यांचे शास्त्रीय नृत्यावर पाय थिरकणार आहेत. यानिमित्ताने मालिकेतील मनोरंजनात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
फुलवा खामखरचा नवा अंदाज
या मालिकेतील अभिनयाबाबत फुलवाला विचारल्यावर तिने तिच्या बिनधास्त शैलीत तिचा आनंद व्यक्त केला. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत अभिनय करण्याच्या या अनुभवाविषयी बोलताना, फुलवा फारच उत्साही दिसत होती. फुलवाच्या मते तिला जेव्हा या भूमिकेविषयी विचारण्यात आले तेव्हा तिला खूपच आनंद झाला. कारण या मालिकेतून फुलवाला नवीन काहीतरी करण्याचा अनुभव मिळणार होता. अभिनय करणं ही प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा असते. पण फुलवाला या मालिकेतून स्वतःचीच भूमिका साकारता येत असल्याने तिच्या मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण आले नाही. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत काम करण्याची संधी संधी दिल्याबद्दल ती मालिकेच्या टीमची कतज्ञ आहे. शिवाय फुलवाला तिची भूमिका प्रेक्षकांनादेखील आवडेल हे पक्कं माहीत आहे. आता फुलवाचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक आहे.
म्हणूनच मालिकेच्या लोकप्रियेत दिवसेंदिवस होतेय वाढ
ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेचा विषय थोडासा हटके असल्यामुळे ही मालिका कमी वेळात टेलिव्हिजनवर लोकप्रिय झाली आहे. ही मालिका एक कॉमेडी मालिका असल्याने यातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होत आहे. खूप हसवत, कोपरखळ्या देत या मालिकेत मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा अभिमान राखण्याबाबत शिकवणसुद्धा दिली जात आहे. हलक्या फुलक्या मनोरंजक अशा या ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिकेतून एक अनोखी प्रेमकथा या मालिकेत फुलत आहे. आदेश बांदेकर यांच्या ‘सोहम प्रोडक्शन’मार्फत या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या मालिकेतील कलाकार हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
अरबाज खानची गर्लफ्रेंड करणार वकिली
तान्हाजी मालुसरेंच्या खऱ्या घराचा होणार जीर्णोद्धार
तुमचे आवडते बॉलीवूड सेलिब्रेटीज आणि त्यांच्या विचित्र सवयी