काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या “चोरीचा मामला” या चित्रपटाच्या नावावर आता नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. मल्लाळम, तेलुगू, तमीळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये चित्रपटाची निर्मिती होणार असून, पाच भाषांमध्ये निर्मिती होणारा “चोरीचा मामला” हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर प्रियदर्शन जाधवने “चोरीचा मामला” च्या सर्व मुख्य कलाकारांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे “चोरीचा मामला 2” मध्ये हे सर्व कलाकार दिसतील याची खात्री झाली असून त्यांच्यासोबत नवीन कोणी कलाकार दिसणार का
याची मात्र अजून उत्सुकता आहे. चोरीचा मामला या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळविली होती. यावर्षी जानेवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता.
अचंबित करणारे स्टंट करताना दिसणार श्रिया पिळगावकर
लवकरच येणार ‘चोरीचा मामला 2’
स्वरुप स्टुडिओज निर्मित एवरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत सुधाकर ओमाळे,आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार,स्मिता ओमाळे यांनी “चोरीचा मामला” या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रियदर्शन जाधव लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट होती. एक प्रामाणिक चोर एका बंगल्यात चोरी करायला गेल्यावर कसा अडकत जातो याची धमाल गोष्ट या चित्रपटात होती. गुंतवणून ठेवणारी पटकथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर या चित्रपटानं प्रेक्षकांची दाद मिळवली. या सगळ्यासह चित्रपटातील कलाकारांनी यामध्ये आपल्या अभिनयाने मनं जिंकून घेतली. अतिशय सहज आणि साधेपणाने केलेली कॉमेडी प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यामुळे आता मराठीची सीमा ओलांडून पाच वेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट तयार होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही निश्चितच अभिमानाची घटना आहे.
करिश्मा कपूरचा कमबॅक, अभिनेत्री नाही दिसणार निर्मातीच्या भूमिकेत
अमृता, जितेंद्र आणि हेमंत ढोमेची धमाल केमिस्ट्री
या चित्रपटाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी आणि हेमंत ढोमेची कमाल धमाल केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळाली आहे. चोरीचा मामला चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अमृताने आपल्या लहानपणीचा एक किस्साही शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अमृताने सांगितलं की, असाच मला माझा एक किस्सा आठवतो जो आहे माझ्या लहानपणीचा. तुम्हाला कशी वाटली ही चोराची गोष्ट? तुमच्याकडेही असतील जर असे तुमचे आणि चोरांचे किस्से तर तुम्हीदेखील व्हिडीओ करा आणि आम्हाला सांगा”. तसंच अमृताने लॉकडाऊन असल्यामुळे सर्व फॅन्सना घरी राहण्याचं आवाहन केलं आणि मनोरंजनासाठी चोरीचा मामला हा चित्रपट पाहायला सांगितलं. आता तुम्ही म्हणाल की, हा चित्रपट आम्ही घरी कसा पाहणार… तर हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच टीव्हीवरदेखील प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धी पाहता पुन्हा एकदा ही टीम याचा दुसरा भाग घेऊन येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार आणि प्रेक्षकांमध्ये आता पुढे कथा काय असणार याचीही उत्सुकता आहे. तर या कोविड काळात आता या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करणार का असाही प्रश्न आता नक्कीच सर्वांना पडला असेल. पण याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे याचा दुसरा भाग पाहण्यासाठी थोडी कळ नक्कीच सोसावी लागेल.
पूनम पांडे अडकली विवाहबंधनात,गुपचूप केले लग्न
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा