दूधाचे वेगवेगळे प्रकार पाहता हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळे ट्रेंड सुुरु असल्याचा नक्कीच अंदाज पाहायला मिळतो. ऑलमंड मिल्क, सोया मिल्क, काजूचे दूध, कोकोनट मिल्क, तांदुळाचे दूध असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. शरीरात फॅट जाऊ नये यासाठी खूप जण दूधाव्यतिरिक्त वेगळ्या दुधांचा उपयोग करतात. कोकोनट मिल्क अर्थात नारळाचे दूध हा नवा ट्रेंड दिसून आला आहे. नारळाचे दूध अनेक रेसिपीजमध्ये वापरण्यात येते. नारळाचे दूध आणि डेरी क्रिम या दोघांचा उपयोग केला जातो. पण या दोघांमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया.
नारळाचे दूध
ओला नारळ खोवून त्याचा गर पिळून त्यामधून जे दूध काढले जाते त्याला ‘नारळाचे दूध’ असे म्हटले जाते. नारळाचे दूध ताजेही वापरले जाते. इतकेच नाही तर हल्ली अनेकदा यावर प्रोसेस केले जाते. त्यामुळे ते दूध अधिक काळासाठी टिकण्यास मदत करते. नारळाच्या दुधामुळे मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन C, पोटॅशिअम आणि फायबर मोठ्याप्रमाणात असते. जे आरोग्यासाठी फारच फायद्याचे ठरते.
नारळाच्या दुधाचे फायदे
- नारळाच्या दुधात मोठ्या प्रमाणात फॅट्स असले तरी देखील हे फॅट्स मिडीअम चिन्ड फॅटी अॅसिड असते. हे फॅट शरीरात चरबी रुपात राहात नाही. यामुळे मेटाबॉलिझम वाढून वजन कमी करण्यास मदत होते.
- नारळाच्या दुधामधील अँटी- मायक्रोबायल घटक असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्की वाढण्यास मदत मिळते.
- जर तुम्हाला दूधातील साखरेचा त्रास होत असेल तर नारळाच्या दुधामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास मदत मिळते.
- नारळाच्या दुधामुळे व्हिटॅमिन C आणि K हे घटक असतात. त्यामुळे केस आणि त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते.
डेरी क्रिम
दुधापासून जी क्रिम बनवली जाते त्याला डेरी क्रिम असे म्हणतात. डेरी क्रिमचा उपयोग करुन अनेक रेसिपीज बनवल्या जातात. जर तुम्हीही वेगवेगळ्या कारणांसाठी डेरी क्रिमचा वापर करत असाल तर डेरी क्रिमविषयी ही माहिती जाणून घ्या. डेरी क्रिममध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, साखर, लेक्टौज असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी फारच फायद्याचे ठरते.
दूध आवडत नसेल तर ‘या’ पदार्थांपासून मिळवा शरीरासाठी पुरेसं कॅल्शिअम
डेरी क्रिमचे फायदे
- डेरी क्रिमच्या सेवनामुळे किडनी स्टोनची समस्या दूर होते. ज्यांना किडनी स्टोनची तक्रार असते अशांना डॉक्टर डेरी क्रिम खाण्याचा सल्ला देतात.
- डेरी क्रिममध्ये व्हिटॅमिन B असल्यामुळे डोळे, त्वचा, केस चांगले राहण्यास मदत मिळते.
- डेरी क्रिमच्या सेवनामुळे लाल पेशी वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे त्याचे सेवन आरोग्यासाठी चांगले ठरते.
- हाडांना बळकटी देण्यासाठी डेरी क्रिमही फारच फायद्याची ठरते. त्यामुळे डेरी उत्पादनाचा समावेश आहारात असणे गरजेचे असते.
- हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठीही डेरी क्रिमचा उपयोग होतो.
पण जर तुम्हाला वजन वाढण्याची भीती असेल तर तुम्ही नारळाच्या दुधाचे सेवन करा डेरी उत्पादने टाळणे नेहमीच उत्तम