कॉफीची सवय खूप जणांना असते. काहींच्या दिवसाची सुरुवात ही कॉफीच्या सेवनाने होते. अशांच्या आयुष्यात कॉफी हा एक अविभाज्य भाग आहे. कॉफीचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधानांसाठी आता प्रामुख्याने केला जातो. कॉफी ही केसांपासून ते पायांच्या त्वचेबरोबर सगळ्यांसाठीच खूप फायद्याची असते. हल्ली कॉफीचा उपयोग हा नुसता मास्क किंवा स्क्रब म्हणून केला जात नाही. तर त्याचा उपयोग हा केसांच्याही अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. मास्क आणि स्क्रबच्या उपयोगाने तुमची त्वचा आणि केसांच्या कोणत्या समस्या दूर होतात ते जाणून घेऊया.
केसांमधील कोंडा
केसांमध्ये कोंड्याचा त्रास असेल तर तुम्ही कॉफी स्क्रबचा उपयोग करुन केसांचा स्काल्प चोळायला हवा. केसांचा स्काल्प चोळून जर तुम्ही केस चोळले तर तुमच्या केसांमधील कोंड्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी तुम्हाला काही वेगळे ट्राय करायचे असेल तर तुम्ही कॉफी आणि एखादा शॅम्पू मिक्स करा. ते थेट केसांच्या स्काल्पला लावून चोळा. केस स्वच्छ धुवून घ्या. कॉफी स्क्रबमुळे केसांना एक वेगळा रंग देखील मिळायला मदत मिळते. त्यामुळे केस स्वच्छ आणि सुंदर दिसतात. स्काल्प स्वच्छ झाल्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते.
मोगऱ्याच्या फुलांपासून बनवा त्वचेसाठी बेस्ट फेसमास्क
त्वचेवरील मृत त्वचा
त्वचेसाठी कॉफी मास्क किंवा कॉफी स्क्रब हा फारच लाभदायक आहे. कारण त्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. तुम्हाला तुमची त्वचा रुखरुखीत वाटत असेल तर तु्म्ही अगदी हमखास त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी याचा उपयोग करा. संपूर्ण शरीराला स्क्रब करण्यासाठी बाजारात काही खास स्क्रब मिळतात त्याचा वापर करुन तुम्ही त्वचेला चकाकी मिळवू शकता.बॉडी पॉलिशिंगचा पैसा तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही अगदी हमखास याचा उपयोग करायला हरकत नाही. पण याचा चेहऱ्यावर अजिबात उपयोग करु नका. चेहऱ्यावर याचा प्रयोग करणे हे फारच धोक्याचे असू शकते. त्यामुळे तुमची त्वचा डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते.
त्वचेखाली असणारे कोलॅजन त्वचेसाठी का असते गरजेचे
त्वचेचे नरिशमेंट
कॉफी मास्क हा प्रकार देखील हल्ली अगदी सर्रास पाहायला मिळतो. त्याचा उपयोग करुन तुम्ही त्वचा नरिश करु शकता. या सोबत तुम्ही कॉफीचे मॉश्चरायझर लावले तर तुमची त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते. कॉफीमध्ये असे घटक असतात जे त्वचेचे तारुण्य टिकवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा ही फारच सुंदर दिसू लागते. तुमची त्वचा जर खराब दिसू लागली असेल तर तुम्ही याचा उपयोग नक्कीच करायला हवा. त्यामुळे तुमची त्वचा ही छान उठून दिसेल.
कॉफीचे फायदे
कॉफीचे अनेक फायदे आहेत. पण सौंदर्याच्या दृष्टिकोनातून विचार करता कॉफीमध्ये असलेले कॅफेन नावाचे घटक असते जे त्वचेवर योग्य पद्धतीने काम करत त्वचा नरिश करण्याचे काम करते. त्वचेची जळजळ कमी करते. त्वचेला अँटी एजिंगपासून वाचवते. तर केसांच्या वाढीला चालना देत केसांचा पोत सुधारण्यास मदत करते.
आता कॉफीचा असा उपयोग नक्की करुन पाहा.