कोरोनामुळे हल्ली आपण सगळे इतके घाबरुन गेलो आहोत की, आपल्याला इतर कोणतेही आजार किंवा त्रास यांचा विसर पडला आहे. सर्दी, ताप, खोकला आणि सीझनल आरोग्याच्या तक्रारींचा आपल्या सगळ्यांना विसर पडला आहे. गेल्या दोन वर्षात वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. अनेक ठिकाणी चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. या दिवसात खूप जणांना सर्दीचा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. तुम्हालाही थंडी, ताप आणि अंगदुखी असे काहीतरी होत असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी फारच फायद्याचे ठरेल
ताप येतोय?
सध्या वातावरण इतके थंड आहे की, त्यामुळे खूप जणांना सर्दीचा त्रास होऊ लागला आहे. सर्दी झाल्यानंतर नाक चोंदणे, नाक गळणे असे त्रास होऊ लागतात. सर्दी साधारण आठवडाभर राहते. त्यानंतर ती आपोआप बरी होते. पण या काळात खूप जणांना सर्दीचा त्रास एवढा जास्त झाला आहे की, सर्दी सतत ओढल्यामुळे त्याचे रुपांतर कणकणीमध्ये होऊ शकते. सर्दीचा त्रास जास्त झाला की, तुम्हाला नक्कीच अंग गरम झाल्यासारखे, अंग दुखल्यासारखे जाणवू लागते. सर्दीमुळे अनेकदा तोंडाची चव देखील जाते. त्यामुळे खाण्याची इच्छा मरुन जाते. कोणत्याही पदार्थाची चव लागत नाही.
थंडीत अशी घ्या काळजी
थंडीत आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे असते. कारण या दिवसात रोगप्रतिकारशक्ती फारच कमी झालेली असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेताना नेमकं काय करायला हवं ते जाणून घेऊया.
- शक्य असेल तर गरम पाणी प्या. थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही सर्दी टाळायची असेल तर गरम पाणी प्या.
- सर्दी झाली असेल तर शक्य असल्यास वाफ घ्या. वाफ घेतल्यामुळे सुकलेली सर्दी बरी होते. श्वासोच्छवासाला अडथळा होत असेल तर श्वास घेण्यास होणारा अडथळा कमी होतो.
- नाक शिंकरताना तुम्ही पाण्याखाली नाक शिंकरा. त्यामुळे नाक साफ होण्यास मदत मिळते. कोरड्या रुमालामुळे नाकाला जखम होण्याची शक्यता असते.
- जर तुम्हाला काढा करता येत असेल तर तुम्ही घरच्या घरी काही आयुर्वेदीक उपचार देखील करु शकता.
- जर तुम्हाला ताप आला असेल तर तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी दिलेल्या औषधामुळे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.
- अनेकदा काही कारणामुळे आलेला ताण- तणाव यामुळे देखील शरीराला थकवा येऊ शकतो. अशावेळीही काही तास कणकण आणि ताप आल्यासारखे होते. अशावेळी तुम्हाला आराम करणे खूपच गरजेचे असते. कोणत्याही औषधांपेक्षा काळजी ही महत्वाची आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त आराम करा.
आता तुम्हाला थंडी, सर्दी किंवा ताप आला असेल तर घाबरुन जाऊ नका तर आरोग्याची काळजी घ्यायला विसरु नका.
जर तुम्हाला लागत असेल जास्त थंडी, तर आहारात करा या पदार्थांचा समावेश