सुशांत सिंह राजपूतप्रकरणानंतर सुरु झालेल्या बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची आतापर्यंत चौकशी आणि अटक झाली आहे. याच ड्रग्ज प्रकरणात कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचियाही अडचणीत सापडला आहे. NCB ने भारतीच्या प्रोडक्शन हाऊसवर आणि घरावर धाड टाकल्यानंतर त्यांना तिच्या घरात गांजा आढळला. त्यामुळे भारती सिंहला शनिवारी( 21 नोव्हेंबर) रोजी अटक करण्यात आली. शिवाय हर्ष लिंबाचियाला चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि त्यालाही अटक करण्यात आली. दरम्यान, या दोघांनाही आता कोर्टाने जामिन दिला आहे. या दोघांचा जामिन मंजूर झाल्यामुळे त्यांना काही काळासाठी दिलासा मिळाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
NCB कडून सध्या ड्रग्जसंदर्भात अधिक कसून चौकशी सुरु आहे. खारदांडा परीसरात ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले. या तरुणाकडून गांजा आणि अन्य प्रकारचे ड्रग्ज मिळाले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अनेक नावांचा खुलासा करण्यात आला. ज्यामध्ये कॉमेडी क्वीन भारती सिंह हिचे देखील नाव होते. या आधारावरच भारतीसिंहच्या प्रोडक्शन ऑफिसवर आणि घरावर छापा मारण्यात आला. यामध्ये तिच्या घरातून तब्बल 86.5 ग्राम इतका गांजा सापडला. गांजा संदर्भात त्यांची कसून चौकशी केल्यानंतर हर्ष आणि भारती यांनी याचे सेवन केल्याचे कबूल केले. त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना 4 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पण या दोघांनी जामिन अर्ज केला. कोर्टाने या दोघांचा जामिन मंजूर केला असून या दोघांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या संदर्भात भारती सिंहने काहीही मत व्यक्त केलेले नाही.
गांजा प्रकरणामुळे भारतीची ‘द कपिल शर्मा शो’मधून हकालपट्टी, तितली आता दिसणार नाही
मीम्सवर चिडला करणवीर बोहरा
Let the NCB do their job, and have some shame, don't speak about someone's talent like this, they have reached here with their own hardwork and gods blessings… #BhartiSinghwearewithyou #BhartiSingh https://t.co/oXKs1cMNqC
— Karanvir Bohra (@KVBohra) November 21, 2020
भारती सिंह ही अनेकांची आवडती कॉमेडीयन आहे. नंबर वन होण्याचा तिचा प्रवास हा फारच मेहनतीचा होता. तिने तिच्या बळावर हे सारे साम्राज्य उभे केले आहे. लोकांनी तिच्या या करीअर ग्राफची तारीफ केली असली तरी आता ड्रग्ज प्रकरणात सापडल्यानंतर तिचे मीम्स करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच चिडलेल्या करणवीर बोहराने ट्विट करत या सगळ्या मीमर्सची कानउघडणी केली आहे. NCB ला त्यांचे काम करु द्या. एखाद्याच्या टॅलेंटबद्दल असे बोलू नका.कारण या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले आहेत, असे म्हणत करणवीरने भारतीला पाठिंबा दिला आहे.
गौहर – झेद करणार 25 डिसेंबरला निकाह, प्री वेडिंगसाठी निवडले पुण्यातील रॉयल लोकेशन
जॉनी लिव्हरने सांगितला त्यांचा अनुभव
कॉमेडी म्हटले की, जॉनी लिव्हर यांचे नाव येणार नाही असे मुळीच होणार नाही. भारती सिंह प्रकरणानंतर त्यांनी आपले मत मांडत सांगितले की, या क्षेत्रात अनेक पार्ट्या सतत सुरु असतात. आमच्या काळात दारु पार्टी तेजीत चालायची. दुर्दैवाने मी देखील यामध्ये दारु पिऊ लागलो. पण दारुच्या सेवनामुळे माझे टँलेंट, माझे काम वाया जात आहे असे लक्षात आल्यानंतर मी दारु सोडली. हल्लीच्या जनरेशनला ड्रग्जची सवय लागली आहे. त्यातून योग्यवेळी बाहेर पडला नाहीत आणि पकडले गेलात तर विचार करा तुमच्या कुटुंबावर याचा नेमका कसा परिणाम होतो ते. ही बातमी वाचूनही जर तुम्ही ड्रग्जचे सेवन करत असाल तर आताच ही सवय थाबवा. कारण यामुळे इंडस्ट्री बदनाम होत आहे.
या सगळ्या प्रकरणानंतर भारतीचे पुढे काय ? तिच्या कामावर याचा कितपत परिणाम होणार हे आलेली वेळच सांगेल.
Bigg Boss 14 : जान सानू खेळातून बाहेर, रुबिनाला मिळाला इम्युनिटी स्टोन