कॉमेडी क्वीन भारती सिंह ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर NCB नावाचे संकट तिच्याभोवती घोंगावू लागते. भारती या प्रकरणात कधी सापडेल असे वाटलेही नसताना अचानक तिच्या अटकेची बातमी समोर आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. इतरवेळी सगळ्यांना हसवणाऱ्या भारतीचा हा एक नवा चेहरा लोकांसमोर आला. सोशल मीडियावरुन तिच्यावर टीकाही होऊ लागली. तिला काही कालावधीसाठी तुरुंगवासही भोगला. पण आता ती पुन्हा तिचे आयुष्य पूर्ववत जगू लागली आहे. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. भारती आणि हर्ष या दोघांनी आदित्य नारायणच्या लग्नाला हजेरी लावली असून या लग्नात दोघे आनंदात दिसत आहेत. या आनंदामागे आणखी एक कारण असल्याचे देखील सांगितले जाते आहे. जाणून घेऊया ही संपूर्ण माहिती
रिसेप्शनला लावली हजेरी
आदित्य नारायण आणि भारती सिंह यांचे नाते फार जवळचे आहे. रिअॅलिटी शोमध्ये अँकरींग करताना त्यांची मैत्री झाली. त्यामुळे भारती आदित्यच्या लग्नात नसणं म्हणजे नवलचं झाले असते.NCBच्या ताब्यात अडकलेल्या भारती- हर्षला जामिन मिळाल्यानंतर त्यांची अगदी दुसऱ्याच दिवशी यातून सुटका झाली. पण यामध्ये या दोघांचीही फार बदनामी झाली. पण त्यातून बाहेर पडत भारती आणि हर्ष यांनी आदित्य नारायणच्या रिसेप्शन पार्टीला गुरुवारी हजेरी लावली. नुसतीच हजेरी लावली नाही तर त्यांनी यामध्ये चांगलाच आनंद लुटला आहे. या व्हिडिओवरुन भारती सिंह आणि हर्षचा चाहता वर्ग अजिबात कमी झाला आहे असे वाटत नाही. उलट ते दोघं या कार्यक्रमात छान नटून थटून आनंद लुटताना दिसत आहे.
भारती आणि हर्षला मिळाला जामिन, ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक
हा आनंद लग्नाच्या वाढदिवसाचा
हर्ष आणि भारती यांच्या लग्नाचा वाढदिवस हा 3 डिसेंबर आहे. त्यामुळे आदित्यच्या रिसेप्शनला हा आनंद जास्त असणे अगदीच स्वाभाविक आहे. त्यांना असे आनंदी पाहून फॅन्सना मात्र फारच आनंद झाला आहे. वायरल व्हिडिओ खाली अनेकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. कपिल शर्मानेदेखील त्याच्या शोमधील लल्लीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोण निशाण्यावर, वायरल झाले चॅट
संकट वाढण्याची शक्यता
भारती-हर्षला जामिन मंजूर झाला असला आणि त्यांना यातून थोडीशी सुटका मिळाली असली तरी देखील त्यांच्यावरुन NCB चा फास इतक्या लवकर उतरेल असे वाटत नाही. कारण भारती ड्रग्ज घेते अशी टिप लागल्यानंतरच त्यांच्या घरी NCB ने धाड टाकून गांजा जप्त केला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली. पण दुसऱ्याच दिवशी त्यांना जामिन मिळाला. हा जामिन देणाऱ्या NCB च्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हर्ष लिंबाचिया, भारती सिंह आणि दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश या तिघांचा जामिन कोर्टाकडून मंजूर झालेला नसतानाही त्या विरोधात जाऊन त्यांनी या तिघांना जामिन दिल्याचा आरोप करत या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करणयात आल्याचे कळत आहे.
आता भारती-हर्षला आणखी कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागेल? त्यांची पुन्हा चौकशी होईल का?हे सगळं लवकरच कळेल.
भारती सिंहची ‘द कपिल शर्मा शो’मधून हकालपट्टी, गांजा प्रकरणामुळे तितली नाही दिसणार