ADVERTISEMENT
home / Weight Loss
common mistakes people make when trying to lose weight

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात हमखास केल्या जातात या चुका

आजकाल सर्वजण फिटनेसबाबत चांगलेच जागरूक झाले आहेत. फिटनेस राखायची म्हणजे वजन कमी करणं ओघाने आलंच. मात्र वजन कमी करणं वाटतं तितकं सोपं नाही हा विचार मनात घट्ट बसलेला असतो. ज्यामुळे वजन कमी करताना हमखास काही चुका केल्या जातात. जर वजन कमी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर तुमचे वजन कमी होत नाही आणि हाती निराशा येते. यासाठीच प्रयत्नांसोबत काही गोष्टी नियोजनबद्ध असायला हव्या. जसं की वजन कमी करताना या गोष्टी मुळीच दुर्लक्षित करू नका.

वजन कमी करताना कोणती चूक करू नये

वजन कमी करण्यासाठी प्रयत्नासोबतच योग्य नियोजनाची गरज आहे. जर तुम्ही काही चुका केल्या तर तुमचे वजन कधीच कमी होणार नाही.

आहारात अती मीठ असणे

गोड पदार्थांमुळे वजन वाढते हे सर्वांना माहीत असते. त्यामुळे वजन कमी करायचं म्हणजे फक्त गोड पदार्थ कमी खायचे असं आपल्याला वाटतं. पण चमचमीत, तिखट आणि जास्त मीठ असलेल्या पदार्थांमुळेही तुमचे वजन वाढू शकते. गोड कमी करून तुम्ही जास्त मीठाचे, तिखट, तेलकट पदार्थ खाऊ लागला तर तुमचे वजन मुळीच कमी होणार नाही. कारण अती मीठामुळे तुमचे वजन वाढू लागेल. चिप्स, लोणचं, पापड, खारे शेंगदाणे असे पदार्थही आहारातून कमी करायला हवेत. कारण अती मीमठामुळे तुमच्या शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढते आणि तुम्हाला सतत भूक लागते. 

कमी जेवणे

वजन कमी करण्यासाठी आपल्याला वाटतं की कमी जेवणे अथवा एकाच वेळी जेवणे हा एक उत्तम उपाय आहे. शरीरात कॅलरिज कमी जाव्या यासाठी काही लोक अचानक जेवण कमी करतात. मात्र अशा मुळे शरीराचे पोषण कमी होते आणि मॅटॉबॉलिझम कमी होते. यामुळे तुमचे वजन कमी होते मात्र तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागतो. शिवाय अशा पद्धतीने कमी झालेले वजन कधीही वाढण्याची शक्यता असते. यासाठी दररोज ठराविक वेळी थोडं थोडा आहार घ्या. अचानक आहार कमी करण्यापेक्षा थोडा थोडा आहार कमी करा. 

ADVERTISEMENT

प्रोटिन्सचे प्रमाण कमी घेणे

वजन कमी करण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात प्रोटिन्सची गरज असते. कारण प्रोटिन्समध्ये वजन कमी करणारे गुणधर्म असतात. कारण प्रोटिन्सयुक्त आहारामुळे तुमची भूक लवकर भागते आणि तुम्ही सतत खात नाही. कॅलरिज कमी घेतल्यावरही तुमचे मेटबॉलिझम सुरळीत राहते. यासाठी वजन कमी करण्यासाठी आहारातून पनीर, दूध, अंडी, चिकन असे पदार्थ कमी करू नका. 

पुरेशी झोप न घेणे 

तुम्ही योग्य आहार घेतला, नियमित व्यायाम केला मात्र कामाच्या चिंतेमुळे पुरेशी झोप घेतली नाही तरी तुमचे वजन वाढू शकते. याचे कारण अपुऱ्या झोपेमुळे तुमचे हॉर्मोन्स असंतुलित होतात. जेव्हा तुम्ही उशीरापर्यंत जागे राहता तेव्हा तुम्हाला सतत भुक लागते. शिवाय कमी झोपल्यामुळे तुमच्या आहाराचा तुमच्या शरीरावर योग्य परिणाम होत नाही. यासाठी कमीत कमी आठ तास शांत झोप गरजेची आहे.

स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष करणे

अनेकांना असं वाटत असतं की स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंगमुळे तुमचे वजन वाढते. मात्र या व्यायामुळे तुमचे शरीर मजबूत होते. पोटातील चरबी कमी करण्यासाठी अशा प्रकारचे व्यायाम गरजेचे असतात. फक्त पोट कमी करणे हा यामागचा उद्देश नसून संपूर्ण  शरीराचे आरोग्य यामुळे राखले जाते. त्यामुळे व्यायाम हा सर्व प्रकारे शरीराला पूरक आणि पोषक असेल याची काळजी घ्या.

मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi)

ADVERTISEMENT

मॉर्निंग वॉक करताना याकारणासाठी दूर ठेवा मोबाईल

वजन कमी करण्यासाठी योग्य नाईट रूटीन

16 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT