माझ्याकडे हे असते तर मी असं केलं असतं. तिच्या किंवा त्याच्यासारखं माझ्याकडे हे हवं होतं. तर माझं आयुष्य असं झालं असतं, मी तिच्यासारखी का सुंदर नाही… अशी आपण एकमेकांशी सतत तुलना करत राहतो. त्यामुळे आपण काय आहोत याचा विसर आपल्याला पडतो आणि आपण दुसरा कसा आहे याची स्पर्धा करत राहतो आणि स्वत्व विसरुन जातो. तुम्हालाही सतत दुसऱ्याशी तुलना करायची सवय लागली असेल तर आताच काही सवयी बदलायला हव्यात. कारण ही तुलना तुम्हाला तुमच्यापासून कधी तोडते हे तुम्हाला देखील कळणार नाही. चला यातून बाहेर पडण्यासाठी नेमके काय करायला हवे
न्यूनगंड पडेल महागात
प्रत्येक माणूस हा एकमेकांच्या तुलनेत वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला समान गोष्टी येऊ शकत नाही. अशावेळी जर काही गोष्टींनी तुमच्यामधील न्यूनगंड वाढला तर त्याचे रुपांतर भयावह असू शकते. अनेकदा न्यूनगंडातून माणून आपल्या कोशात जातो. तर कधी कधी त्याच्या मनावर इतका परिणाम होतो की, तो इतरांचे चांगले बघूच शकत नाही. त्यामुळे तो रागिष्ट आणि खुनशीसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये ही वृत्ती वाढत असेल तर तुम्ही नक्कीच काहीतरी करायला हवे.
व्यायाम आणि चालणे
शरीर चांगले असेल तर तुम्हाला इतरांकडे पाहण्याची इच्छाही होत नाही. हो, हे खरं आहे. बरेचदा आपण इतरांशी तुलना करतो कारण आपलं डोकं रिकामी असतं किंवा आपल्याकडे काही उद्दिष्ट नसतं म्हणून. जर तुम्हाला स्वत:कडे लक्ष वळवायचं असेल तर रोजच्या रोज व्यायाम आणि चाला. यादरम्यान तुमच्या मनात अनेक चांगल्या गोष्टी येतात. माणूस जेव्हा काहीही करत नसतो.त्यावेळी उगाचच त्याला नको त्या गोष्टी सुचत राहतात. पण जर तुम्ही नियमित व्यायाम आणि चालण्यात आपले लक्ष घातले तर उत्तम शरीरासोबत तुम्ही दुसऱ्यांना काही काळासाठी विसरुन जाल
गुंतवा मन
खाली दिमाग शैतान का घर त्यामुळे रिकामी डोकेही काही कामाचे नाही हे तुम्हाला कळलेच असेल तर त्यामुळे तुम्हाला आवडत असलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचे मन गुतंवा. उदा. जेवणाची आवड, चित्रकलेची आवड,साडी नेसण्याची किंवा नेसवण्याची आवड या मधून ही तुम्हाला तुमचे असे समाधान मिळू शकते. एकदा का तुम्हाला याची आवड लागली की, तुम्ही तुमच्या गोष्टीत अधिक रस घेता. समोरची व्यक्ती काय करते यापेक्षा जास्त महत्वाचे आहे तुम्ही काय करता त्यामुळे तुम्हाला तो विचार करण्याचाही वेळ नको असेल तर मन गुंतवा . काहीतरी विधायक करत राहा.
आयुष्यात आभार मानणे का आहे गरजेचे
लोकांशी चर्चा करा
वरुन सगळ्या गोष्टी चांगल्या आणि हिरव्या दिसत असल्या तरी प्रत्येकाचे काही ना काही दु:ख आहे. तुम्ही ते कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. कारण तुम्हाला केवळ वरवरच्याच गोष्टी दिसत असतात. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला कळेल की, प्रत्येकाची आपली अशी एक दु:ख असतात. जास्त पैसा जास्त तक्रारी किंवा जास्त सौंदर्य त्याचाही त्रास त्यामुळे जे आहे ते आपल्याकडे खूप आहे. असा विचार करा आणि आपल्या झोनमध्ये राहा.
आता दुसऱ्यांशी तुलना करताना तुम्ही या गोष्टींचा नक्की विचार करा.