आजकालच्या धापवळीच्या जगात जंकफूड खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. जंकफूड म्हटलं की त्यासोबत येतो टोमॅटो केचप… बर्गर असो वा पिझ्झा तो टोमॅटो केचपशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. सॅंडविज, चायनिझ, पास्ता अशा प्रकारातही भूरपूर प्रमाणात टोमॅटो केचप वापरलं जातं. एवढंच कशाला घरात साधं ऑम्लेट, टिक्की, पॅटिस, थालीपिठ, पराठा केला तरी त्याला तोंडी लावण्यासाठी टोमॅटो केचप लागतोच. थोडक्या पदार्थ कोणताही असो टोमॅटो केचप आपल्या आहाराचा एक मुख्य घटक होत चालला आहे. चवीला कितीही चांगली असली तरी कोणतीही गोष्ट अती प्रमाणात खाणं आरोग्यासाठी मुळीच चांगलं नाही. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही प्रत्येक गोष्टीसोबत टोमॅटो केचप घेत असाल तर ते तुम्हाला लगेच थांबवायला हवं. कारण याचे दुष्परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागू शकतात.
टोमॅटो केचप अती खाण्यामुळे होणारे दुष्परिणाम
टोमॅटो केचप कधी तरी थोड्या प्रमाणात खाणं चुकीचं नाही. पण दररोज प्रत्येक पदार्थासोबत तुम्ही भरपूर केचप घेत असाल तर आताच ही सवय थांबवा.
अॅसिडिटी
टोमॅटो केचप हा एक आंबट पदार्थ आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील अॅसिडिटी वाढू शकते. जर तुम्हाला सतत पोटात दुखत असेल, पोट जड होत असेल, मळमळ जाणवत असेल तर हा तुम्ही अती प्रमाणात केचप खाण्याचा दुष्परिणाम असू शकतो. छातीत जळजळ आणि अॅसिडिटी होऊ नये असं वाटत असेल तर केचपचे प्रमाण आहारातून कमी करा.
यासाठी जेवावे केळीच्या पानावर, मिळतात अनेक फायदे
किडनीच्या समस्या
टोमॅटो केचपमध्ये अख्खे टोमॅटो वापरले जातात. टोमॅटोच्या बिया पोटात विरघळत नाहीत. जरी केचपमधील बिया काढून टाकलेल्या असल्या तरी त्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढू शकते. केचप खूप खाण्यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. मूत्राशयातून याचा योग्य निचरा न झाल्यामुळे त्याचा ताण तुमच्या किडनीवर येतो. सहाजिकच टोमॅटो आणि केचप अती प्रमाणात खाणाऱ्या लोकांना किडनीच्या समस्या जाणवतात.
भजी, पुरी तळल्यावर पुन्हा वापरू नका उरलेलं खाद्यतेल
फूड अॅलर्जी
काही लोकांना अन्नपदार्थांत वापरल्या जाणाऱ्या रंगाची अॅलर्जी असते. केचपचा रंग दाट आणि लालसर दिसावा यासाठी त्यात फूड कलर वापरण्यात आलेले असतात. या रंगामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या अथवा सर्दी, खोकला, पित्त अशा समस्या होऊ शकतात.
फक्त ‘कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी’च नाही हाडांसाठी आहे या गोष्टींचीही गरज