ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
5-ingredients-to-make-regular-sabji-tastier-in-marathi

Cooking Tips: वापरा हे 5 मसाले, बनवा चविष्ट भाजी

घरामध्ये अनेकदा सगळ्यांच्या तोंडून एकच प्रश्न असतो, आज जेवायला काय आहे? आता घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला अर्थात आईला रोज नक्की काय बनवायचं हा प्रश्न सतावणं नक्कीच योग्य आहे. तर घरात लहान मूलं असतील तर त्यांच्यासाठी काही ना काहीतरी चविष्ट आणि वेगळं असंच बनवायला लागतं. मग अशावेळी एखाद्या पदार्थाचा स्वाद बिघडला तर सगळा मूडच निघून जातो. पण तुम्हाला माहीत आहे का या सगळ्या समस्यांचे मूळ आहे ते म्हणजे मसाला! मसालाच भाजीला चांगला रंग, रूप आणि आस्वाद आणून देऊ शकतो. त्यामुळे भाजीमध्ये असे कोणते साधे मसाले वापरले की, भाजी अधिक चविष्ट होते याच्या काही टिप्स (Tips For How To Make Tasty Sabji With Masala) आपण या लेखातून जाणून घेऊया. 

कसूरी मेथी (Kasoori Methi)

आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची भाजी तयार होत असते. भाजी एकच असली तरी वेगवेगळ्या मसाल्याने त्याचा स्वाद आपल्याला बदलता येतो. यासाठी सर्वात महत्त्वाचा मसाला ठरतो तो कसूरी मेथी. तुम्हाला पंजाबी पद्धतीची भाजी (Punjabi Sabji) बनवायीच असेल तर तुम्ही कसूरी मेथीचा वापर करून त्याचा स्वाद भाजीला आणू शकता. याचा सुगंध अत्यंत तेज असतो आणि पदार्थांमध्ये मिक्स केल्यानंतर संपूर्ण भाजीचा स्वाद बदलून जातो. तुमच्या बेचव भाजीला अथवा आमटीला एक मस्त सुगंध, स्वाद आणि फ्लेवर आणण्याचे काम कसूरी मेथी करते. मात्र ही अति वापरू नये. अगदी जराशी कसूरी मेथी हातावर घेऊन ती चुरगळावी आणि मग भाजी शिजताना ही त्यात मिक्स करावी. त्यानंतर लागणारा भाजीचा आस्वाद हा अप्रतिम असतो. 

गरम मसाला (Garam Masala)

अनेक मसाले एकत्र करून गरम मसाला घरातही तयार करण्यात येतो. तसं तर मांसाहारी पद्धतीच्या जेवणामध्ये याचा जास्त उपयोग केला जातो. मात्र त्याचा अर्थ असा नाही की, शाकाहारी पदार्थांमध्ये याचा वापर होत नाही. भाजी अथवा आमटीमध्येही याचा उपयोग केल्यास, त्याचा स्वाद अधिक चांगला लागतो. रोज मुळमुळीत भाजी वा डाळ खाऊन तुम्ही कंटाळत असाल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर करावा. हा मसाला खूपच स्ट्राँग असतो आणि त्यामुळे याचा वापर तुम्ही योग्य अंदाजाने करावा लागतो. साधारण 4-5 व्यक्तीच्या खाण्यात केवळ पाव चमचा गरम मसाला वापरणे योग्य ठरते. 

आलं – लसूण पेस्ट (Ginger – Garlic Paste)

तुम्ही तुमच्या साध्या जेवणाला स्वादिष्ट बनवू इच्छित असाल तर तुम्ही भाजीमध्ये आलं – लसूण पेस्टचा वापर करू शकता. आलं – लसूण पेस्टमुळे भाजीचा स्वाद अधिक वाढतो याची कोणीही हमी देऊ शकतं. आलं आणि लसूण तुमच्या पदार्थांमध्ये एक ताजेपणा आणते. केवळ आलं – लसूण पेस्टच नाही तर तुम्ही आलं आणि लसूण ठेचून जरी फोडणी दिली तरीही भाजीचा स्वाद अधिक चांगला येतो. मात्र आलं – लसूण पेस्ट अथवा अथवा आलं – लसूण ठेचून घातलेली असो ही अजिबात जळू देऊ नका. या गोष्टीची काळजी मात्र तुम्ही नक्की घ्या.  

ADVERTISEMENT

मोठी वेलची (Badi Elaichi)

आपल्या भारतीय पदार्थांमध्ये अनेक मसाले आहेत, जे खाण्याचा स्वाद अधिक वाढवतात. यामध्येच मोठी वेलची (Big Cardamom) हादेखील मसाला अप्रतिम ठरतो. मसाला कढी अथवा भाजीमध्ये याचा वापर केल्यास, अत्यंत चांगला स्वाद मिळतो. ही वेलची तोडूनदेखील तुम्ही घालू शकता. विशेषतः पंजाबी मसाला अथवा पंजाबी भाज्यांमध्ये याचा अधिक उपयोग करण्यात येतो. 

कडीपत्ता (Curry Leaves)

दाक्षिणात्य पदार्थांमध्ये कडिपत्त्याचा अधिक प्रमाणात उपयोग केला जातो. कोणताही पदार्थ असो अगदी अनेक पक्वांनांमध्येही त्यांच्याकडे कडिपत्ता वापरण्यात येतो. कडिपत्ता केवळ स्वादिष्ट नसतो तर यामध्ये शरीराला फायदा होणारे अनेक घटक असतात. कडिपत्त्याचे अनेक फायदे आहेत. पदार्थांमध्ये एक वेगळा स्वाद आणि सुगंध आणण्यासाठी याचा उपयोग होतो. एका पॅनमध्ये तेल तापवून त्यात कडिपत्ता भाजून घ्यावा आणि मग याचा ग्रेव्ही अथवा भाजीसाठी उपयोग करावा. या भाजीचा एक वेगळाच स्वाद लागतो. तसंच तुम्ही फोडणीसाठीही याचा उपयोग करून घेऊ शकता. याशिवाय कडिपत्ता सुकवून त्याचा पदार्थांवर गार्निशिंगसाठीही वापर करता येतो. याची चव अप्रतिम लागते. 

हे असे 5 घटक अथवा साहित्य आहेत, ज्यामुळे तुमची नेहमीच भाजी अधिक चविष्ट होते. तुमच्याजवळही अधिक कोणता चांगला मसाला असेल तर नक्की आमच्यासह याची रेसिपी आणि टीप शेअर करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
11 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT