ना चाहू सोना चांदी… ना चाहू हिरा मोती…. म्हणूनच घालूया कॉपर ज्वेलरी. तुम्हालाही ज्वेलरी घालायला तुम्हाला आवडत असेल तर सध्या सुरु असलेला कॉपर ज्वेलरीचा ट्रेंड तुम्ही अगदी नक्कीच ट्राय करायला हवा. सध्या तुम्हाला सगळीकडे कॉपर ज्वेलरी पाहायला मिळतात. खूप जणांना इमिटेशन ज्वेलरीमधील गोल्ड किंवा सिल्व्हर ज्वेलरी आवडत नाही. अशावेळी तुम्हाला कॉपर ज्वेलरी या सुंदर दिसतात. याची चमक इतकी सटल असते की, त्यामुळे कोणत्याही साडीवर या ज्वेलरी चांगल्याच उठून दिसतात. कॉपर ज्वेलरीचे कोणकोणते प्रकार तुम्ही ट्राय करायला हवेत ते आता जाणून घेऊया.
झुमकी हा पर्याय एव्हरग्रीन असा पर्याय आहे. लग्नाचे कपडे असो किंवा कोणतेही फॅमिली फंक्शन असो झुमकी या कशावरही खूपच सुंदर दिसतात. त्यातच कॉपरमधील झुमकी या तुम्हाला मस्त असा रस्टी लुक देत असतात. त्यामुळे अशाप्रकारच्या रस्टी लुक देणाऱ्या कॉपर झुमकी तुम्ही अगदी नक्की ट्राय करायला हव्यात. हल्ली कॉपरमध्ये साड्या देखील मिळतात. या साड्यांवर किंवा तुमच्या कोणत्याही प्लेन साडीवर तुम्हाला मस्त अशा कॉपर ज्वेलरी घालता येतात.
तुम्ही साडी नेसणारे असाल तर तुम्हाला अगदी हमखास ट्रेंडी अशी ज्वेलरी घालणारे असाल तर तुम्ही कॉपरमध्ये मिळणारे नेकपीस ट्राय करायला हवेत. हे नेकपीस तुम्हाला चोकर आणि लाँग वेअर अशा दोघांमध्ये मिळतात. त्यामुळे तुम्हाला ते कशावरही घालता येतील. इतकेच नाही तर अगदी शर्ट पँट असा जरी तुमचा अटायर असेल तरी देखील तुम्हाला हे नेकपीस घालता येतात.
या नेकपीसमध्येही तुम्हाला विविध असे प्रकार मिळतात. ते देखील तुम्हाला ट्राय करता येतात. कोणत्या ज्वेलरी कशावर ट्राय करायच्या त्यासाठी हे छोटसं मार्गदर्सन
कॉपर ज्वेलरी हा ट्रेंड या लग्नाच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की ट्राय करायला हवा.