कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. दररोज नवीन आव्हान आणि त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना यात शासकीय मंडळी व्यस्त आहेत. लॉकडाऊन पाळण्यासाठी सर्वांना सुरक्षेसाठी घरातच राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र घरात असूनही या संकटामुळे आज देशातील प्रत्येक माणूस तणावाखील जीवन जगत आहे. सेलिब्रेटीजपासून सर्वसामान्यांप्रमाणे सर्वांनाच या संकटाची भिती वाटू लागली आहे. सेलिब्रेटीजदेखील सध्या घरात अडकून पडले असल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबियांची चिंता सतावू लागली आहे. अभिनेता अनिल कपूर यांच्या लहान मुलीला म्हणजेच रिया कपूरला सध्या मोठी बहीण सोनमची खूप आठवण येत आहे. तिने सोशल मीडियावरून तिच्या भावना व्यक्त देखील केल्या आहेत.
रियाने शेअर केला दोघींच्या बालपणीचा फोटो
रिया कपूरला सध्या तिच्या मोठ्या बहिणीची म्हणजेच सोनमची खूप आठवण येत आहे. रियाने सोनमचा आणि तिचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्या दोघी फारच क्यूट दिसत आहेत. या फोटोसोंबत रियाने शेअर केलं आहे की, ” तू प्रत्येक गोष्टीत माझी पार्टनर आहेस. तुझ्यावर नियंत्रण ठेवणं कठीण असलं तरी तूच माझी सर्वात जवळची, लाडाची, काळजी घेणारी आणि आवडती आयुष्यभराची मैत्रीण आहेस.” या फोटोत सोनमने रियाच्या खांद्यावर हात ठेवून तिला घट्ट पकडलं आहे. सोशल मीडियावर या फोटोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वांनी लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊसच या फोटोवर सुरू केला आहे. सोनमच्या पतीने म्हणजे आनंद आहूजाने तर या फोटोला ‘डबल ट्रबल’ अशी कंमेट दिली आहे. तर रिया आणि सोनमच्या आईने हार्ट इमोजीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोनमकडे खरंच आहे का गोड बातमी
सोनम कपूर काही दिवसांपूर्वीच तिचा पती आनंद आहूजा याच्यासोबत लंडनवरून भारतात परतली आहे. लॉकडाऊनमुळे दोघांनी कुटुंबियांपासून स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच सोनमचा स्वतःच्या सासूसोबत सोशल डिस्टंस ठेवत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती सासूला खालच्या मजल्यावर जाऊन भेटण्यापेक्षा वरच्या मजल्यावरून आणि खिडकीतूनच तिच्याशी संवाद साधताना दिसली होती. सोनमकडे यावरून गोड बातमी असण्याची देखील चर्चा रंगली होती. सोनम गरोदर असल्यामुळे कदाचित ती अशा पद्धतीने घरात आराम करत असेल आणि खाली उतरून सासूची बोलण्यापेक्षा खिडकीतून तिच्याशी बोलत असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र सोनमने अद्याप याबाबत कोणताच खुलासा केलेला नाही. मात्र आता रियाला सोनमची येत असलेली आठवण आणि तिने यासाठी सोशल मीडियावरून शेअर केलेला बालपणीचा फोटो यात या गोष्टींचा संकेत दडलेला असू शकतो.असं जर असेल तर सोनमच्या चाहत्यांना यातून नक्कीच आनंद होईल आणि पुढच्यावर्षी आणखी एका सेलिब्रेटीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होईल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा
अधिक वाचा –
अभिनेत्री श्वेता तिवारी झाली हेअर स्टायलिस्ट, घरातच कापले मुलाचे केस
कोरिओग्राफर फराहा खानची मुलगी अन्या लहान वयातच बनली अॅक्टिव्हिस्ट
वरूण-साराच्या ‘कुली नं 1’ चित्रपटाला कोरोनाचं ग्रहण