ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सारा अली खानच्या चित्रपटावर कोरोना संकट, चित्रपटाचं शूटिंग बंद करण्याची मागणी

सारा अली खानच्या चित्रपटावर कोरोना संकट, चित्रपटाचं शूटिंग बंद करण्याची मागणी

जगभरात भितीचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या #corona virus मुळे आता बॉलीवूड इंडस्ट्रीदेखील संकटात आली आहे. या व्हायरसच्या इनपेक्शनपासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणी चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली आहेत. ज्याचा परिणाम चित्रपटांतून मिळणाऱ्या कमाईवर होणारच आहे. मात्र एवढंच नाही तर आता काही ठिकाणी चित्रपटाचं शूटिंगदेखील बंद करण्याची मागणी केली जात आहे. वाराणसीच्या चंदौली जिल्ह्यातील खरौजा गावात सध्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात सारा अली खानची प्रमुख भूमिका आहे. मात्र आता या गावातील ग्रामस्थांनी सुरक्षेच्या कारणासाठी चित्रपटाचं शूटिंग बंद करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे हळूहळू कोरोना व्हायरसच्या संकटाचा फटका संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीवर पडायला सुरूवात झाली आहे. 

सारा अली खानच्या या चित्रपटावर कोरोना संकट

अतरंगी रे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदौली गावात गेल्या काही दिवसांपासून सतत चित्रपटाच्या टीम आणि कलाकारांची येणं जाणं सुरू आहे. तर एकीकडे संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत आहे. या व्हायरसपासून गावाचं रक्षण करण्यासाठी काही सुरक्षेचे नियम लावणं गावकऱ्यांसाठी गरजेचं झालं आहे. ज्यामुळे नेहमी शूटिंग आणि कलाकारांना पाहण्यासाठी उत्सुक असलेले गावकरी अतरंगी रे च्या शूटिंगमुळे भयभीत झाले आहेत. ग्रामस्थांना चित्रपटसृष्टीतील या लोकांच्या गावात येण्या-जाण्यामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची भिती वाटू लागली आहे. ज्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगला बंद करण्याची मागणी आता गावकरी करू लागले आहेत. तर दुसरीकडे सारा आपल्या चित्रपटाच्या यशासाठी पूजा- अर्चना करताना दिसत आहे.

गावकऱ्यांनी केली सुरक्षेसाठी शूटिंग बंद करण्याची मागणी

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गावात जवळजवळ एक हजार लोकांची गर्दी दररोज होत आहे. शिवाय दररोज या चित्रपटाच्या टीममधील निरनिराळी माणसे त्यांच्या कामानिमित्त शहरातून गावात येत – जात आहेत. अशा परिस्थितीत गावातील लोकांच्या सुरक्षेसाठी काहीच योजना करण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेची योग्य काळजी या काळात घेणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी कोणतीच व्यवस्था करण्यात न आल्याने गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या गावात निर्माण झाला आहे. राज्यातील शाळा आणि कॉलेज सुरक्षेसाठी पुढील आठवडाभर इतर सूचना येईपर्यंत बंद करण्यात आलेल्या आहेत. मात्र चित्रपटांच्या शूटिंगबाबत कोणतीच घोषणा प्रशासन करत नाही आहे. ज्यामुळे गावकऱ्यांना आता याबाबत स्वतःच काहीतरी पावले उचलावी लागणार आहेत. ज्यासाठी त्यांनी प्रसाशनाकडे या चित्रपटाचं शूटिंग तात्पुरतं बंद करण्याची मागणी केली आहे. खरंतर असं झाल्यास चित्रपटाचं आर्थिक नुकसान नक्कीच होणार आहे. कारण चित्रपटाच्या शूटिंगसाठी कलाकारांच्या तारखा घेतलेल्या असतात. शिवाय शूटिंगच्य सेटअपवर भरमसाठ खर्च करण्यात येत असतो. त्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी वेळेत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणं प्रत्येक निर्मात्यासाठी गरजेचं असतं. ‘अतरंगी रे’चं शूटिंग मध्येचं बंद करण्यात आलं तर या सर्व गोष्टींचा परिणाम चित्रपटावर होऊ शकतो. मात्र कोरोनाचं संकट हे कोणत्याही आर्थिक संकटापेक्षा जीवघेणं संकट आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सध्या हे शूटिंग बंद करणंच सर्वांसाठी फायद्याचं ठरणार आहे. मात्र अजूनही याबाबत प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

आता Corona Virusवर बनणार चित्रपट,नावही झाले रजिस्टर

ADVERTISEMENT

Corona Virus: अफवांना बळी पडून असे वागत असाल तर वाचा

‘या’ अभिनेत्रींप्रमाणेच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी

 

15 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT