ADVERTISEMENT
home / आरोग्य
कोरोनाच्या काळात हे टच पॉईंट नियमित करा सॅनिटाईझ

कोरोनाच्या काळात हे टच पॉईंट नियमित करा सॅनिटाईझ

कोरोना व्हायरसची दुसरी लाट आणि संशोधनानुसार या पुढे येणाऱ्या लाटांची भीती आता लोकांच्या मनात पक्की झाली आहे. वास्तविक पहिल्या लाटेनंतर जन जीवन पुन्हा सुरळीत झाल्यावर सर्व काही नीट होईल अशी आशा लोकांना होती. मात्र पुन्हा अचानक आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे भीतीचं वातावरण अधिकच वाढलं आहे. ज्यामुळे या पुढील काळात अधिक सावध राहणं गरजेचं झालं आहे. कोरोना पासून वाचण्यासाठी हात सतत धुण्यासोबत गरजेचं आहे घरातील टच पॉईंट स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवणे.

कारण कुरिअर, भाजी अथवा वाणसामाणाच्या निमित्ताने अनेक वस्तू सतत घरात येत असतात. या दरम्यान तुमचा हात अनेक टचपॉईंटवर लागतो. ज्यामुळे तुमचं घर स्वच्छ आणि निर्जंतूक असलं तरी कोरोनाच्या संक्रमणाचा धोका वाढतो. बाहेरून घरात आल्याबरोबर तु्म्ही तुमचा फोन, पर्स, किल्ल्या सॅनिटाईझ करता. अंघोळ करून वापरलेले कपडे गरम पाण्यात अथवा साबणाच्या पाण्यात भिजत ठेवता. पण यासोबतच प्रत्येकवेळी बाहेरून घरात आल्यावर अथवा घरात एखादी नवी वस्तू  आल्यावर तुम्ही तुमच्या घरातील टच पॉईंट स्वच्छ आणि निर्जंतूक करायला हवे.

दरवाज्याचे नॉब

घरातून बाहेर जाताना अवथा घरात येताना, तसंच घरात एखादी नवीन वस्तू घेताना तुम्ही नकळत दरवाज्याच्या नॉबवर हात ठेवता. मुख्य दरवाजा, बेडरूमचा दरवाजा आणि बाथरूमचा दरवाजा या काळात तुम्ही आवर्जून वापरता. त्यामुळे कोरोना संक्रमण टाळण्यासाठी तुम्ही घरी आल्यावर सर्व दरवाज्यांचे नॉब सॅनिटाईझ करायला हवे.

स्वीचबोर्ड

घराची बेल दाबताना, टिव्ही, फ्रीज, मोबाईल अशा अनेक वस्तू वापरण्यासाठी दिवसभरात अनेकदा तुम्ही स्वीचबोर्डला हात लावता. घरातीस रिमोटही तुम्ही नियमित वापरत असता. त्यामुळे बाहेरून घरी आल्यावर अथवा वापर झाल्यावर स्वच्छता करताना स्वीचबोर्ड  आणि टिव्ही अथवा इतर वस्तूंचे रिमोटही सॅनिटाईझ करायला हवे. वास्तविक घरातील स्वीचबोर्ड ही अशी एक गोष्ट आहे जिथे तुम्ही वारंवार स्वच्छता करत नाही. मात्र या काळात तुम्ही त्याचा वापर मात्र सतत करत असता. स्वीच बोर्ड स्वच्छ करण्याआधी पॉवर ऑफ करायला विसरू नका. त्यानंतर अॅंटि बॅक्टेरिअल सोल्यूशनने तुमच्या घरातील सर्व स्वीच सॅनिटाईझ करा. त्यानंतर तुम्ही स्वच्छ कापड फिरवून  ते कोरडे करू शकता. 

ADVERTISEMENT

नळ

बाहेरून घरात आल्यावर  अथवा कुरिअर घेतल्यावर तुम्ही सर्वात आधी जाता आणि नळाखाली हात स्वच्छ धुता. मात्र त्याआधी तुम्ही तुमच्या वॉश बेसिनचा नळ सुरु करण्यासाठी त्याच्या टॅबला हात लावता. त्यामुळे हात धुतल्यावर तुम्ही तो टॅबही साबणाने स्वच्छ करायला हवा. कारण जर तसं नाही केलं तर तुमचा हात पु्न्हा नळाला लागून तुम्हाला कोरोना संक्रमण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 

घरातील सर्व टचपॉईंट स्वच्छ आणि निर्जंतूक करण्यासाठी तुम्ही मायग्लॅमचे नॅचरल सॅनिटाईझर गुणधर्म असलेली वाईपआऊट श्रेणीतील उत्पादने वापरू शकता. या प्रॉडक्टचा परिणाम त्वरीत आणि प्रभावी होतो. यासाठीच मायग्लॅमचे  प्रॉडक्ट वापरल्यानंतर ते तुम्हाला कसे वाटले आणि  त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – 

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

काय आहे कोविड सोमनिया, कशी कराल यातून स्वतःची सुटका

लहान मुलांमध्ये कोरोनाव्हायरसची कोणती लक्षणे पाहावी, मुलांचे संरक्षण कसे करावे

कोरोनाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण, काय करायला हवं

ADVERTISEMENT
03 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT