पायाच्या टाचांना भेगा पडल्यामुळे पायाचे सौंदर्य कमी होते. हिल्सचे फूटवेअर, पैजण अशा पायांमध्ये शोभून दिसत नाहीत. बऱ्याचदा यासाठी तुम्ही नियमित पेडिक्युअर करता पण तरिही तुमच्या पायाच्या टाचांना सतत भेगा पडतात. यामागे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असणं हे मुख्य कारण असू शकतं. मानवी शरीराला पोषक आहाराची गरज असते. आहारातून मिळणारे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स असे पोषक घटक अनेक शारीरिक क्रिया सुरळीत होण्यासाठी गरजेचे असतात. जर तुमच्या शरीरात जर एखाद्या पोषक मुल्याची कमतरता असेल तर त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर लगेच दिसू लागतात. पायांच्या टाचांना भेगा पडणं हे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्स कमी असल्याचं लक्षण आहे.
कोणत्या व्हिटॅमिन्सच्या अभावामुळे पडतात पायाच्या टाचांना भेगा
पायाच्या टाचांना भेगा पडल्या की तुम्हाला त्यामागे वातावरणातील बदल कारणीभूत आहे असं वाटू लागतं. कारण बऱ्याचदा थंडीतील कोरड्या वातावरणात हाता-पायाची त्वचा फुटण्यासोबत पायाच्या टाचांना भेगा पडतात. पण जर योग्य निगा राखूनही टाचा फुटत असतील तर आहारात व्हिटॅमिन्स वाढवण्याची गरज असू शकते.
व्हिटॅमिन बी 3 –
व्हिटॅमिन बी 3 तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि मेंदू निरोगी राहण्यासाठी गरजेचं आहे. जर तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 3 ची कमतरता असेल तर विस्मरण, स्मरणशक्ती कमी होणे, जुलाब होणे, हातापायाला सतत खाज येणे आणि पायाच्या टाचा फुटणे असे त्रास होतात. यासाठी योग्य आहार घ्या. यासाठी नियमित मासे, मटर, ब्रोकोली, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, मशरूम, राजमा आहारात समाविष्ट करा. यासोबतच जाणून घ्या निरोगी जीवनशैलीसाठी ‘व्हिटॅमिन बी 6’ आहे गरजेचं (Benefits of Vitamin B6 In Marathi)
व्हिटॅमिन सी –
त्वचेच्या आणि केसांच्या संपूर्ण आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचं आहे. दातांचे आरोग्य बिघडण्यामागेही व्हिटॅमिन सी ची कमतरता कारणीभूत असू शकते. केसांची मुळे कमजोर होणे, केसांत जखम होणे, हिरड्यांना जखम होणे, पायाच्या टाचा फुटणे, थकवा, त्वचेच्या समस्या आणि केस गळणे ही व्हिटॅमिन सीची कमी असल्याचं लक्षण आहे. यासाठी रंगीत फळं, आंबट फळं, बेरीज, हिरवी मिरची अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन ई –
रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, रक्ताभिरसण योग्य पद्धतीने होण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ईची गरज असते. पण जर तुमच्या शरीरात पुरेसं व्हिटॅमिन ई नसेल तर तुम्हाला त्वचा आणि केसांच्या समस्या जाणवतात. स्नायू कमजोर असणं, त्वचा कोरडी पडणं, केस पांढरे होणं, सुरकुत्या येण, जखमा लवकर भरून न येणं, टाचा फुटणं हे याचंच एक लक्षण असू शकतं. आहारात व्हिटॅमिन ईचं प्रमाण वाढवण्यासाठी बदाम, पालक, सोयाबीन, शेंगदाणे, अॅव्हाकॅडो हे पदार्थ खा. यासाठी जाणून घ्या विटामिन ई चे फायदे (Vitamin E Benefits In Marathi)
यासोबत वाचा व्हिटॅमिन D पुरेपूर मिळाले तर तुम्ही कायम राहाल निरोगी (Vitamin D Benefits In Marathi)
थोडक्यात आहारातील पोषक घटकांच्या अभावामुळे शारीरिक समस्या, सौंदर्य समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच संतुलित आणि पोषक आहार घेणं गरजेचं आहे.