चेहऱ्यापासून पायापर्यंत तुमचं व्यक्तिमत्त्व दुसऱ्याला आकर्षित करत असतं. त्यामुळे जितकी काळजी आपण चेहऱ्याची करत असतो तेवढीच काळजी आपण आपल्या पायांचीही करायला हवी. अन्यथा आपल्या पायाला भेगा पडतात आणि आपली पावलं अतिशय रूखरूखीत होतात आणि त्यामुळे आपल्याला त्रास तर होतोच पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे दिसायला ते अतिशय खराब दिसतं. कितीतरी वेळा इतकी वाईट परिस्थिती येते की, त्यातून रक्तदेखील येऊ लागतं. खरं तर पायाच्या भेगांचा त्रास हा उन्हाळ्यापेक्षा थंडीच्या दिवसांमध्ये जास्त जाणवतो. थंडीमुळे भेगा अधिक वाढतात आणि त्यातून रक्त येण्याचीही शक्यता असते. शिवाय यामुळे पायाला खूप त्रास होऊन दुखायलादेखील लागतं. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नक्की यावर काय उपाय करायचा हे लक्षात येत नाही. घरच्या घरी इलाज करायचा की डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा याचाही विचार करावा लागतो. तुम्हाला तर हा त्रास नको असेल तर तुम्ही वेळच्या वेळी काळजी घ्यायला सुरुवात करायला हवी. आम्ही तुम्हाला काही एक्सपर्ट टीप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमच्या पायांना भेगा पडल्या असल्यास, त्या भरतील आणि तुमचे पाय सुंदर दिसतील.
कोणाताही ऋतू असला तरीही पायांच्या भेगांची अडचण कायम असते. उन्हाळ्यात आपल्या पायाला घाम येत असतो, तर पावसाळ्यात आपली पावलं पाण्याने सतत भिजत असतात. हिवाळ्यात आपली पावलं कोरडी पडतात. पायाला भेगा पडणं ही अर्थातच एक सामान्य समस्या आहे. पायांच्या भेगांचं पहिलं लक्षण म्हणजे पावलांच्या आसपासची त्वचा सुकी व्हायला लागते आणि त्यानंतर ती कडक व्हायला लागते आणि त्याठिकाणी भेगा पडायला लागतात. या गोष्टींना कॉलस (Callouses) म्हणून संबोधलं जातं. पायांना भेगा पडण्यामागेदेखील बरीच कारणं असतात आणि ही कारणं जाणून घेणंही गरजेचं आहे.
वाचा – त्वचा आणि सौंदर्यजतनासाठी बाबा रामदेव यांचे पतंजलि प्रोडक्ट्स
आम्ही तुम्हाला काही घरगुती सोपे उपाय सांगणार आहोत, जेणेकरून तुमच्या पायांच्या भेगा कमी होतील आणि तुम्हाला बरं तर वाटेलच शिवाय तुमचे पाय जास्त मऊ, मुलायम आणि सुंदर दिसतील.
पेट्रोलियम जेली हा वॅसलीनचा एक उत्तम प्रकार मानला जातो. पायाला भेगा पडल्या असता हे लावल्यावर पाय अतिशय मऊ मुलायम होतात. लिंबाच्या रसामध्ये वॅसलीन घालून रोज रात्री भेगा पडलेल्या ठिकाणी लावून हलकासा मसाज करावा त्यामुळे लवकरच भेगा मिटतात. दुसरा उपाय म्हणजे एक चमचा वॅसलीनमध्ये तुम्ही अर्धा चमचा बोरीक पावडर घालून व्यवस्थित ती मिक्स करून घ्यावी. त्यानंतर हे मिश्रण तुम्ही पायाच्या भेगांना लावावे यामुळे तुमच्या पायाच्या भेगा निघून जाऊन तुम्हाला आराम मिळेल.
वाचा – वजन घटवण्यासाठी उत्कृष्ट आहेत हे बाबा रामदेवचे घरगुती उपाय
कोरड्या त्वचेला मॉईस्चराईज करण्यासाठी नारळाच्या तेलासारखा दुसरा चांगला पर्याय नक्कीच नाही. हे डेड स्किन हटवून त्याच्या अगदी आतपर्यंत जाऊन मुलायमपणा निर्माण करते. तुम्हाला जर मुलायम आणि चमकदार तळपाय हवा असेल तर रोज रात्री पायांच्या तळव्यांना नारळाचं तेल लावून मग मोजे घालून झोपावे. याचा चांगला परिणाम तुम्हाला लवकरच जाणवेल.
विटामिन ई कॅप्सूल तुम्हाला कोणत्याही केमिस्टच्या दुकानामध्ये आरामात अतिशय स्वस्त दरामध्ये मिळते. रात्री झोपण्यापूर्वी ही कॅप्सूल फोडून त्यातील तेल काढा आणि ते तेल आपल्या पायांना लावून थोडा वेळ मसाज करा. हे तेल तुमच्या त्वचेला पोषण देते आणि तुमच्या कोरड्या त्वचेला मुलायम बनवते. या तेलामुळे तुमच्या पायांच्या भेगा लवकरच मिटतील आणि पाय मऊ होतील.
तिळाचं तेल हे पायांच्या भेगा मिटवायचं काम करते. या तेलामध्ये अनेक पोषक तत्वांसह अँटीबॅक्टेरियल गुणदेखील आहेत. यामुळे त्वचेला आराम मिळतो. त्वचा दुरुस्तीसाठी तिळाचं तेल हा सर्वात चांगला पर्याय आहे. रात्री झोपायच्या आधी तिळाचं तेल लावून पायाला मसाज करावा आणि सकाळी कोमट पाण्याने पाय धुवावेत. असं केल्यामुळे तुमचे पाय अतिशय मुलायम राहतात.
लिंबाच्या रसामध्ये आम्लिय गुण असतात, जे त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यास मदत करतात आणि ग्लिसरीन हे त्वचेला अधिक नरम आणि चमकदार बनवण्यासाठी उपयोगी असते. या दोघांचं मिश्रण तुम्ही तुमच्या पायांना लावल्यास, पायांच्या भेगा जलदरित्या निघून जातात. यासाठी एक चमचा ग्लिसरीन, एक चमचा लिंबाचा रस आणि तुम्हाला हवं असल्यास, गुलाब पाणीदेखील वापरू शकता. या सर्वांचं मिश्रण करून तुम्ही पायाला लावून ते थोडा वेळ सुकू द्यावं. सुकल्यानंतर रात्रभर पायात मोजे घालून झोपा. सकाळी उठल्यानंतर तुमचे पाय कोमट पाण्याने धुवून टाका. काही दिवसातच तुमच्या पायांच्या भेगा जाऊन तुमचे पाय अतिशय मऊ आणि मुलायम झालेले तुम्हाला आढळतील.
मोहरीच्या तेलानेदेखील तुम्ही या समस्येवर तोडगा काढू शकता. तुम्ही आंघोळीला जाण्यापूर्वी केवळ 30 मिनट्स आधी तुमच्या पायांच्या भेगांना हे तेल लावून व्यवस्थित मालिश करून घ्या. मग आंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा मोहरीचं तेल पायाला लावा.
मेण आणि नारळाची पेस्ट पायांच्या भेगांना लावल्यास, तुम्हाला खूपच आराम मिळतो. त्यासाठी तुम्हाला थोडसं मेण आणि त्यावर मोहरी अथवा नारळाचं तेल घालून व्यवस्थित वितळवून घ्यायची गरज आहे. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यानंतर पायांच्या भेगांना लावून घ्या. रात्री हे मिश्रण तुम्ही पायांना लावलंत तर तुम्हाला त्याचे जास्त चांगले परिणाम दिसतात.
वाचा – त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया
मध हे नैसर्गिक अँटिसेप्टिक असल्याचं म्हटलं जातं. हे तुमच्या पायांच्या भेगा अतिशय जलद भरतं. तुम्हाला केवळ मध आपल्या पायांच्या भेगांमध्ये लावून साधारण 15 ते 20 मिनिट्स तसंच पाय ठेवायचे आहेत आणि मग 20 मिनिट्स झाल्यावर त्यामध्ये पाय बुडवून ठेवायचे आहेत. असं केल्यामुळे तुमच्या पायाच्या भेगा निघून जाऊन पाय अगदी मऊ होतील.
पायांच्या भेगा लवकरात लवकर भरण्यासाठी कोरफड जेल कमालीचे काम करते. यासाठी तुम्हाला तुमचे पाय पाण्याने धुवून घेतल्यानंतर अगदी स्वच्छ आणि कोरडे करायचे आहेत. त्यावर कोरफड जेल लावा आणि रात्रभर हे जेल तसंच राहू द्या. मोजे घालून झोपा. लवकरच तुमच्या पायाच्या भेगा भरू लागतली.
प्यूमिक स्टोन अर्थात झांवां दगड हा अतिशय टणक असतो. त्यामुळे तुमची डेड स्किन यामुळे लगेच निघून जाते आणि त्वचा अतिशय निरोगी आणि मऊ होते. या दगडाने तुम्ही दर एक दिवसाआड तुमच्या पायांच्या भेगा साफ करू शकता. मात्र दगड वापरल्यानंतर मॉईस्चराईज करायला अजिबात विसरू नका.
पायांवर भेगा पडल्यास अथवा एखादा घाव झाल्यास, आंब्याची पानं वाटून त्यावर लेप लावावा. यामुळे घाव लवकर भरला जातो आणि पायांच्या भेगांवरही आराम मिळतो.
लव्हेंडर ऑईलने पायांच्या भेगांवर मसाज केल्यास, ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत नाही. त्याशिवाय तेलामध्ये असणारे अँटी इन्फ्लेमेटरी गुण हे त्यातील बॅक्टेरिया मारून टाकतात.
तुमच्याजवळ फार कमी वेळ असेल आणि तुम्हाला घरच्या घरी उपाय करता येण्यासारखे नसतील तर तुम्ही क्रॅक हील क्रीमचादेखील वापर करू शकता. तसं तर बाजारामध्ये अनेक प्रकारची क्रॅक क्रीम्स उपलब्ध आहेत. मात्र त्वचारोगतज्ज्ञ काही क्रीम्स वापरण्याचा सल्ला देतात. ती क्रीम्स खालीलप्रमाणे –
तुम्हाला आपल्या पायांच्या भेगांसाठी एखादा आयुर्वेदिक उपाय हवा असेल तर तुम्ही पतंजलि क्रॅक हील क्रीमचा वापर करू शकता. यामध्ये मोहरीचं तेल, कायाकल्प तेल, देशी मेण, भीमसैनी कापूर, कोरफड इत्यादी गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्या मिश्रणामुळे पायांच्या भेगांमध्ये जाऊन त्या मिटवण्यासाठी जास्त चांगल्या प्रकारे मदत करते आणि याच्या वापरामुळे पाय अधिक सुंदर आणि मुलायम होतात.
रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय तुम्ही कोमट पाण्याने साफ करून घ्या आणि मग चांगल्या कपड्याने तुमचे पाय पुसून कोरडे करा. त्यानंतर आता तुमच्या पायांच्या भेगांवर हे पतंजलि क्रॅक हील क्रीम लावा आणि 15 मिनिट्स पाय तसेच ठेवा. त्यानंतर मोजे घालून तुम्ही झोपा. तुमच्या पायांच्या भेगा भरेपर्यंत असं रोज करा.
पतंजलि क्रॅक हील क्रीमची किंमत – 60 रुपये आहे.
You Might Like This: