home / मनोरंजन
daagdi-chaawl-2-teaser-out-makarand-deshpande-as-arun-gawali-in-marathi

‘दगडी चाळ’ चित्रपटाचा 2 भाग लवकरच, ऑगस्टमध्ये होणार प्रदर्शित

डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव, बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिनहूड (Robin Hood), म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’ (Daddy). बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या ‘दगडी चाळ’मधील (Daagdi Chaawl) ‘चुकीला माफी नाही’, असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. नुकतीच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली असून मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chaawl 2)  हा चित्रपट येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की. ही इज बॅक! (He Is Back!) अशी टॅगलाईन देत याचा टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

संगीता अहिर निर्मात्या  

संगीता अहिर यांनी यापूर्वी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर संगीता अहिर यांनी ‘दगडी चाळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्या ‘दगडी चाळ’चा सिक्वेल घेऊन सज्ज झाल्या आहेत. चित्रपटाच्या घोषणेबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ”आज आम्हाला ‘दगडी चाळ २’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. ‘दगडी चाळ’ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याचा आमचा मानस आहे.” आता ‘दगडी चाळ 2’ मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मकरंद देशपांडेची अप्रतिम भूमिका 

पहिल्या दगडी चाळीमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या अभिनेता मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) याने सर्वांची मनं जिंकली आहेत. तर आता दुसऱ्या भागामध्ये नक्की काय कथा असणार आहे आणि मकरंद देशपांडेचे या चित्रपटात कसे काम असेल याकडे सध्या प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्या चित्रपटात अंकुश चौधरी (Ankush Choudhary) याचीही महत्त्वाची भूमिका होती. तर या चित्रपटाच्या कथेची आणि दगडी चाळीतील वातावरण तसंच, डॅडी अर्थात अरूण गवळी यांच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी दाखविण्यात येणार आहेत याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. तर काही वेळातच या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. नुसत्या टीझरमुळेही आता चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

20 Jun 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text