दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्काराची दरवर्षी कलाकारांसह सर्व प्रेक्षकही आतूरतेने वाट पाहत असतात. यंदा रविवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी 2022 रोजी हा महोत्सव पार पडला. चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार आणि चित्रपटांना काही कॅटगरीमध्ये हे पुरस्कार दिले जातात. यंदा दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपटसृष्टी उद्योगामध्ये सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल गौरवण्यात आलं. तर यावर्षीचा सर्वोकृष्ट अभिनेता ठरला रणवीर सिंह आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला क्रिती सेनॉन हिने… रणवीरला ‘83’ चित्रपटातील अभिनयासाठी हा पुरस्कार मिळाला तर क्रिती सेनॉनला तिच्या ‘मिमी’ चित्रपटातील अभिनयासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार विजेत्यांची यादी
मुंबईतील ताज लॅंड्स अॅंड एंडमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी उपस्थित होते. यावर्षी या कलाकारांनी चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठित समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावला आहे.
चित्रपट उद्योग सर्वोत्कृष्ट योगदान – आशा पारेख
फिल्म ऑफ दी इअर – पुष्पा – दी राईज
सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंह
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सेनॉन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – केन घोष
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सतिश कौशिक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लारा दत्ता
सर्वोत्कृष्ट खलनायक – आयुष शर्मा
समीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपट – सरदार उधम
समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिद्धार्थ मल्होत्रा
समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कियारा अडवाणी
पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिमन्यू दासानी
पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राधिका मदन
बेस्ट डेब्यू – अहान शेट्टी
सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय फिचर फिल्म – अनदर राऊंड
सर्वोत्कृष्ट वेबसिरिज – कॅंडी
सर्वोत्कृष्ट वेबसिरिज अभिनेता – मनोज वाजपेयी
सर्वोत्कृष्ट वेबसिरीज अभिनेत्री – रविना टंडन
टेलीव्हिजन सिरिज ऑफ दी इअर – अनुपमा
टीव्ही मालिका सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहीर शेख
टीव्ही मालिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रद्धा आर्या
मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता टीव्ही मालिका – धीरज धूपर
मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेत्री टीव्ही मालिका – रुपाली गांगुली
सर्वोत्कृ्ष्ट लघूपट – पौली
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – विशाल मिश्रा
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर
अधिक वाचा –
छत्रपती महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान गायले गायक दिव्य कुमारने
माधुरी दीक्षितच्या ‘या’ साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क, काय आहे खासियत
अखेर ही मराठी मालिका होणार बंद, कलाकार भावूक
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक