कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रातही सर्वच सावट पसरले होते. मात्र आता पुन्हा एकदा नव्याने मनोरंजन क्षेत्र उभे राहात आहे. याच आठवड्यापासून ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ हा रियालिटी शो पुन्हा एकदा जोरदार चालू झाला आहे. आजकाल रियालिटी शो मध्ये मराठमोळे स्पर्धक खूपच पुढे जाताना दिसतात. अशीच या शो मध्ये आपल्या लावणी नृत्याच्या जोरावर रूतुजा जुन्नरकर आणि आशिष पाटीलने बाजी मारत सर्व परीक्षकांचं मन जिंकलं. मात्र विशेषतः मन जिंकलं ते रेमो डिसुझाचं. रेमोच्या स्ट्रीट डान्सर चित्रपटातील गाणं घेऊन त्यावर या दोघांनीही लावणी सादर केली आणि तिन्ही परीक्षक लावणी संपता संपताच टाळ्या वाजवायला उभे राहिले होते.
सुपरस्टार असूनही सलमान खानचे 10 चित्रपट झाले होते सुपर डुपर फ्लॉप
गुरू – शिष्य जोडीची कमाल
या शो मध्ये गुरू शिष्य जोडी आपल्या डान्सने परीक्षकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या टॉप 12 मध्ये चर्चेत असणारी मराठमोळी जोडी म्हणजे आशिष पाटील आणि रुतुजा जुन्नरकर. आपल्या महाराष्ट्रातील लावणी या नृत्यप्रकाराकडे काही लोक अजूनही चांगल्या नजरेने पाहत नाहीत. मात्र हा नृत्यप्रकार अप्रतिम असून त्यालाही योग्य दर्जा मिळवून देण्याचं काम ही गुरू – शिष्याची जोडी करत आहे. तसंच रुतुजाला तिच्या आईवडिलांचाही खूपच पाठिंबा मिळाला असून तिची या शो मध्येही वाहवा होत आहे. आशिष पाटील हा ‘लावणी किंग’ म्हणून प्रसिद्ध आहे. आशिषचा हात लावणीमध्ये कोणीही धरू शकत नाही अशी त्याची ख्याती आहे आणि तो नेहमीच कमाल लावणी नृत्य सादर करतो. यावेळीही रेमो डिसुझासमोर या दोघांनी असं काही नृत्य सादर केलं की रेमो डिसुझाने दोघांनाही आपल्या पुढील चित्रपटात लावणी नृत्य सादर करण्याचा प्रस्ताव दिला. यापेक्षा मोठे कोणत्याही नृत्य कलाकाराचे स्वप्न नसते. रेमो डिसुझाने अनेक नृत्यदिग्दर्शकांना संधी दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांना नेहमी पाठिंबाही दिला आहे. आता आशिष आणि रुतुजाचा डान्स पाहून रेमोने त्यांना ही संधी देऊन त्यांचा सन्मानच एक प्रकारे वाढवला आहे.
अभिनेत्री मिताली मयेकरच्या बिकिनी फोटोने सोशल मीडियावर वाढला हॉटनेस
रेमोच्या चित्रपटात काम करण्याचे स्वप्न पूर्ण
रुतुजाने यावेळी रेमोच्या चित्रपटात काम करण्याचं आपलं गेल्या कित्येक वर्षापासूनचे स्वप्नं होते असं सांगितलं. रेमो परीक्षक असणारा रियालिटी शो बघत आपण मोठे झालो आहोत आणि नेहमी रेमो आपल्याला चित्रपटात काम करशील का असं स्वप्नं आपल्याला दिसत असे असंही तिने सांगितलं आणि अजूनही रेमोने आपल्याला दिलेल्या या संधीचा आपल्याला विश्वास बसत नसल्याचंही यावेळी रुतुजाने सांगितलं. रेमोने आतापर्यंत ज्यांना ज्यांना आपण चित्रपटात संधी देऊ असं सांगितलं होतं त्यांचं स्वप्नं पूर्ण केलं आहे आणि आजही अनेक नृत्य दिग्दर्शक हे रेमोबरोबर काम करत असल्याचंही दिसून येत आहे. आता या कोरोनानंतर जेव्हा रेमो आपल्या नव्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार असेल तेव्हा या गुरु शिष्याच्या जोडीला त्यात नक्की संधी मिळेल आणि ही नक्कीच त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. इतकंच नाही तर आशिष आणि रुतुजाची लावणी आता मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार ही नक्कीच त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी असून मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी अभिमानाची बाब आहे असं म्हणावं लागेल.
KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल