ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
datta-jayanti-quotes-in-marathi

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा | Gurudev Datta Quotes, Wishes And Status In Marathi

दत्तजयंती (Datta Jayanti) अर्थात मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. या दिवशी दत्त जयंती साजरी करण्यात येते. अवधूतचिंतन दत्त दिगंबर यांचा अवतार या दिवशी प्रकट झाला, असे पूर्वानुपार मानण्यात येते. यावर्षी 18 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी होणार आहे. दत्त दिगंबर अर्थात दत्त हा विष्णूचा सहावा अवतार आपल्या हिंदू धर्मात मानण्यात येतो. गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर या दत्ताच्या स्थानाच्या ठिकाणी यादिवशी मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. पालखी सोहळा आणि अनेक कार्यक्रमांची या दिवशी रेलचेल असते. सध्या कोरोना व्हायरसमुळे अर्थातच काही निर्बंध असल्याने एकमेकांच्या भेटीने उत्सव साजरे होत नाहीयेत. पण तरीही या डिजीटल माध्यमांमुळे आपण सर्वच सोहळे हे सोशल मीडिया माध्यमातून साजरे करत आहोत. आजकाल अनेक सणांना वेगवेगळ्या शुभेच्छाही (Datta Jayanti Shubhechha In Marathi) फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे देण्यात येतात. दत्त जयंतीचे असेच काही विशेष कोट्स (Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi), दत्त जयंतीच्या शुभेच्छा (Datta Jayanti Wishes In Marathi) तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. 

Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi | दत्त जयंती कोट्स मराठीत

Datta Jayanti Quotes In Marathi
Gurudev Datta Jayanti Quotes In Marathi

दत्त जयंतीसाठी काही खास कोट्स (Datta Jayanti Quotes In Marathi). अनेक गावांमध्येही आजही दत्त जयंती म्हणजे खूपच मोठा सोहळा असतो. तसंच दत्तांचे अनेक भक्त आहेत. कोणत्याही संकटातून दत्ताची भक्ती आपल्याला नक्की वाचवेल असा विश्वासही भक्तांना असतो. दत्तगुरू योग्य वाट आपल्याला दाखवतात अशी भक्तांची आस आहे. अशाच भक्तांसाठी दत्त जयंती कोट्स. 

1. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन 

मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

2. श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!

3. शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार – दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

4. गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. गुरू तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते – दत्त दिगंबर

ADVERTISEMENT

6. गुरूदेव दत्त!

7. दत्तगुरू म्हणावे की स्वामी, समर्थ म्हणावे की नृसिंह सरस्वती 
औदुंबर की कल्पतरू, दीन दुःखितांचा कैवारू 

8. भीती कशाची जेव्हा दत्त उभा पाठिशी!

9. जीवन आणि समाधी म्हणजे दत्तगुरूंची कुशी 

ADVERTISEMENT

10. आई पण तेच आणि वडीलही तेच, चराचरात वसणारे अदृश्य सांगातीही तेच – दिगंबरा दिगंबरा!

Datta Jayanti Wishes In Marathi | दत्त जयंतीच्या शुभेच्छा

Datta Jayanti Wishes In Marathi
Datta Jayanti Wishes In Marathi

दत्ताच्या जन्माच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया यांच्या घरी पाहुण्यांचे रूप घेऊन आलेले ब्रम्हा, विष्णू आणि महेशच आहेत हे अत्री ऋषींनी ओळखले आणि त्यामुळे त्यांची नावे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी ठेवली. त्यातील दत्त हा विष्णूचा अवतार तर चंद्र हा चंद्रलोकामध्ये निघून गेला आणि दुर्वास ऋषी तपश्चर्येसाठी पुढे अरण्यात निघून गेला. दत्त या तिघांचेही एक रूप म्हणून तिथेच राहिले आणि त्यांना एकच धड पण तीन शिरे अर्थात तीन तोंडे आणि सहा हात असल्याने त्यांना दत्तात्रेय असे नाव मिळाले. देवाच्या आशीर्वादाने झाला म्हणून दत्त आणि अत्री ऋषींचा मुलगा अर्थात अत्रेय म्हणजे दत्तात्रेय. अशा दत्ताच्या जन्माच्या दिवशी खास शुभेच्छा (Datta Jayanti Wishes In Marathi). 

1. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा. 

2. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

ADVERTISEMENT

3. आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर, आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी 

4. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः

5. दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!

6. ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले – दत्तगुरू जयंतीच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

7. चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे 
घुमटामधूनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले, मला हे दत्तगुरू दिसले – दत्त दिगंबर 

8. ज्याच्या मनी गुरू विचार, तो नसे कधी लाचार
ज्याच्या अंगी गुरू भक्ती, त्याला नाही कशाचीही भीती – दत्तगुरू जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

9. ज्याच्या हृदयात गुरू मूर्ती, त्याची होईल जगभरात किर्ती
जो करेल गुरूची पूजा, त्याच्या आयुष्यातील दुःख होईल वजा – श्रीदत्त दिगंबरा

10. त्रिमूर्ती हा अवतार, दत्तरूपी साकार, त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर 
होता साक्षात्कार घडतो चमत्कार, गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार

ADVERTISEMENT

Datta Jayanti Status In Marathi | दत्त जयंती स्टेटस मराठीत

Datta Jayanti Status In Marathi

सध्या एकमेकांना भेटून सोहळा साजरे करता येत नाहीत. पण एकमेकांना शुभेच्छा नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यामातून पाठवता येतात. तसंच व्हॉट्स अपवर तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करत स्टेटसही ठेऊ शकता. असेच काही स्टेटस खास दत्त जयंतीसाठी (Datta Jayanti Status In Marathi)

1. अवधूतचिंतन श्री गुरूदेवदत्त – दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका 
पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका – दत्त दिगंबर 

3. सृष्टीचे सर्जन, अनोखे दर्शन, त्रिमूर्तीस वंदन – गुरुदेव दत्त!

ADVERTISEMENT

4. निर्माता – संचालक आणि हो पालक, दुर्गुण संहारक, गुरूदेव दत्त

5. स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा, शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

6. काही मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय
आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय – दत्तगुरू दत्तगुरू श्रीदत्तगुरू 

7. माणसाने माणसाला ‘माणूस’ म्हणून समजून घेतलं ना की अध्यात्माची खरी सुरूवात होते – दत्त दिगंबर

ADVERTISEMENT

8. वाणी असे मधुर, बुद्धी असे सतेज
चित्त असे एकाग्र, सद्गुरू दर्शन – दत्त दिगंबर

9. निराकर गुरु गुरु रे निर्गुण
गुरु सृष्टीकर गुरु विश्वंभर, गुरु विन नोहे साधू मुनीजन – दत्त दिगंबर 

10. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा 
नेति नेति शब्द न ये अनुमाना 
सुरवर-मुनिजन योगी समाधी न ये ध्याना

Datta Jayanti Shubhechha In Marathi | दत्त जयंती शुभेच्छा मराठीत

Datta Jayanti Shubhechha In Marathi
Datta Jayanti Shubhechha In Marathi

दत्त जयंतीच्या शुभेच्छा मराठीतून (Datta Jayanti Shubhechha In Marathi) खास तुमच्यासाठी. दत्त जयंती म्हटली की एक वेगळा उत्साह असतो. आपल्याकडे अनेक ठिकाणी दत्तांची मंदिरे आहेत आणि याठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी खास कार्यक्रमही करण्यात येतात. अशा दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा. 

ADVERTISEMENT

1. दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी 

दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. श्री दत्त जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

3. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! श्री दत्तगुरु जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय
सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी 
लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गाय – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

5. भक्तांसाठी नेहमीच धावत येतात अवधूतचिंतन – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

6. जय गुरुनाथा, तूच या अभाग्याचा एकमेव त्राता – जय गुरुनाथा 

7. सर्व कणाकणांतही मिळे तुझे रूप, तुझे नाम घेता विसरतो तहान भूक – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

ADVERTISEMENT

8. भाव भक्ती ठेऊनी अंतःकरणी, लीन सदा तुझेच चरणी 

अंतरीच्या माझ्या कर दूर ही व्यथा – जय गुरुनाथा 

9. जपतो नाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

दे पाप मुक्ती सत्वर या पामरा – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

10. घेता तुझे नामा ठेविता मी माथा – जय गुरुनाथा – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अधिक वाचा – आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha)

Datta Jayanti Message In Marathi | दत्त जयंतीचे संदेश

Datta Jayanti Message In Marathi
Datta Jayanti Message In Marathi

लोकांच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठीच दत्ताचा अवतार झाला. गुरूचे स्थान आपल्या आयुष्यात खूपच महत्त्वाचे आहे आणि दत्तांना आपल्याकडे सर्वसाधारणतः देवांमध्ये पहिला गुरू मानण्यात येते. दत्तांनी दिलेले संदेश आजही भक्त अवलंबतात. असेच काही दत्त जयंतीचे संदेश (Datta Jayanti Message In Marathi).

1. सर्वांना दत्त जयंतीच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा!

ADVERTISEMENT

2. दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा!

3. दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!

4. दत्त जयंतीचा सुखकर आणि मंगलमय दिन आपणा सर्वांसाठी सुख आणि समृद्धी समाधान घेऊन येवो!

5. दत्त माऊली माझे आई, पहिला ठाव घ्यावा बाई – दिगंबरा दिगंबरा 

ADVERTISEMENT

6. दिगंबरा दिगंबरा..
श्री दत्तगुरु दिगंबरा..
विश्वंभर औदुंबरा..
दयाघना हे करूणाकरा..!!

7. नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

8. सकल पालनहारा..
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!! – दिगंबरा दिगंबरा 

9. अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः।
स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् ।।
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा …!!

ADVERTISEMENT

10. श्री गुरुदेव दत्त – स्वामी समर्थ!

अधिक वाचा – गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Datta Jayanti Sms In Marathi | दत्त जयंतीसाठी पाठवा एसएमएस

Datta Jayanti Marathi SMS
Datta Jayanti Marathi SMS

आजकाल सोशल मीडियाचे जग जास्त जवळ आले आहे. तर सध्या कोरोनाच्या परिस्थितीतही आपल्या उत्सवाच्या शुभेच्छा एसएमएसद्वारे देणे जास्त योग्य आहे. दत्त जयंतीचे काही एमएमएस (Datta Jayanti Marathi Sms) खास तुमच्यासाठी. 

1. दत्त येऊनी उभा ठाकला, भावे साष्टांगेसी प्रणिपात केला 
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्ममरणाचा फेरा चुकवीला – दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

2. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! कृपा करा दयाघना –  दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

3. दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक, असंहारक त्रिभुवनतारक –  दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4. आत्मसुखाचा मोक्ष लुटाया, अमोल ठेवा हाती धरा 
दत्तचरण माहेर सुखाचे, दत्तभजन भोजन मोक्षाचे –  दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांनादत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

6. दत्त नामाचा करूया गजर, श्रीदत्त नाम कायम असू दे ओठावर –  दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

7. दत्त परब्रम्ह – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

8. आपण सर्वांना दत्त जयंतीच्या मंगलमय आणि हार्दिक शुभेच्छा!

9. दत्तात्रय हरे कृष्णा उन्मत्तानंद दायका
दिगंबरा मुनीबाला पिशाचा ज्ञानसागरा – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

ADVERTISEMENT

10. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त 
अभाग्यासी कैसी न कळे ही मात 
पराही परतली तेथे कैचा हेत
जन्ममरणाचा पुरलासे अंत – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

स्वामी समर्थ कोट्स, जीवनाचे सार समजून देणारे कोट्स (Swami Samarth Quotes In Marathi)

दत्त दिगंबर हे आपल्या सर्वांचे गुरुदैवत आहे. यावर्षी दत्त जयंतीला तुम्ही दत्त जयंती कोट्स (Datta Jayanti Quotes In Marathi) वापरून नक्की शुभेच्छा द्या! जय गुरुदेव दत्त! 

17 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT