दयाबेन म्हटली की आठवतो तो म्हणजे तिच्या स्टाईलचा फक्त गरबा. अरे हालो म्हणत सगळ्यांना गरब्यामध्ये दमवून सोडणाऱ्या दयाबेनचा सध्या एक नवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी चक्क एका वेगळ्याच गाण्यावर थिरकताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.हा व्हिडिओ चक्क कोळी डान्स प्रकारातील असून अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत आणि शेअर करत त्याला ट्रेडिंगमध्ये आणले आहे. नेमका हा व्हिडिओ काय आहे? आणि दयाबेन गरबा सोडून कोळी डान्स का करतेय जाणून घेऊया.
आमीर खानला साकारायचा आहे विश्वनाथन आनंद, लवकरच येणार बायोपिक
दयाबेन कोळी गीतावर नाचते तेव्हा
दिशा वकानीचा हा व्हिडिओ ‘दर्या किनारी’ या गाण्यावर आहे. या गाण्यामध्ये तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. एरव्ही गुजराती साडी आणि टिपटॉप रेडी असणारी दिशा यामध्ये एकदम हॉट अशा लुकमध्ये दिसत आहे. आता या व्हिडिओबद्दल सांगायचे झाले तर दिशाच्या करीअरच्या सुरुवातीचा हा तिचा व्हिडिओ आहे. तिने एका म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. या अल्बममध्ये तिने पिवळ्या रंगाची चोळी घातली आहे. दिशाला अशा रुपात फारच कमी जणांनी पाहिल्यामुळे खूप जणांना धक्का बसला असेल. पण दिशाने या आधी अनेक व्हिडिओमध्ये नाटकांमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे दिशाचा हा व्हिडिओ जुना आहे जो अचानक ट्रेंडमध्ये येऊ लागला आहे. दिशाच्या या व्हिडिओचे व्ह्यूज आणि कमेंट्स यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मीम्सचा पाऊस
दिशाचा हा व्हिडिओ घेऊन आता अनेक जणांनी यावरही मीम्स करायला सुरुवात केली आहे. दयाबेनला अशा रुपात पाहिल्यानंतर जेठालालची नेमकी काय प्रतिक्रिया येईल हे देखील यामध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच या गाण्याचा उपयोग हा केवळ मीम्ससाठी ही होऊ लागला आहे. या पूर्वी हे गाणं खूप जणांनी ऐकले आहे. पण यामध्ये दयाबेन आहे याचा विश्वासही कोणाला बसणार नाही. पण आता दयाबेनच्या मीम्समध्ये आणि तिच्या कमबॅकच्या मागणीसाठी वाढ झाली आहे यात काही शंका नाही
मोनालिसाचं घराचं स्वप्नं पूर्ण, आनंदाने झाली व्यक्त
तीन वर्ष प्रतिक्षेची
दयाबेन अर्थात दिशा वकानीने मालिकेतून ब्रेक घेऊन आता तीन वर्षे झाली आहेत. मॅटर्निटी सुट्टीवर गेलेली दया काही काळाने परत येईल अशी अपेक्षा होती. पण ती मालिकेच्या नियमानुसार सुट्टीवरुन परत आलेली नाही. तिने अद्याप मालिका जॉईन केलेली नाही. मुलीच्या संगोपनासाठी तिने ही सुट्टी वाढवून घेतली होती. पण आता दयाबेनला या मालिकेतून जाऊन तीन वर्षे झाली आहेत. ती या मालिकेत परत येणारे अनेक मीम्स या आधी व्हायरल झाले आहेत. शिवाय ती परतण्याच्या अनेक बातम्या देखील आतापर्यंत पसरल्या आहेत. पण अद्याप या मालिकेत ती काही आलेली नाही. त्यामुळे आता ती या मालिकेत लोाकांना परत कधी दिसेल हा प्रश्नच आहे.
दरम्यान दिशाचा व्हिडिओ जो सध्या व्हायरल होत आहे तो पाहण्यास काहीच हरकत नाही.
पहिल्या पत्नीच्या अफेअरबद्दल बोलणे नाही रुचले शिल्पाला, दिली ही प्रतिक्रिया