प्रियांका चोप्रा आणि निकचं लग्न अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलंय. नवरा आणि नवरी आपल्या कुटूंबासह जोधपूरला पोहचले देखील. एवढंच नाही तर लग्नाच्या विधींना सुरूवातही झाली आहे. प्रियांकाच्या हातांवर तर निकच्या नावाची मेंदीही काढून झाली आहे. आता या हॉलिवूड गाठलेल्या देसी गर्लचं लग्न साध सुधं नक्कीच नसणार.
काय आहे खास गोष्ट?
आम्ही तुम्हाला पक्की बातमी दिली होती की, प्रियांका आणि निकच्या लग्नाला द रॉक- ड्वेन जॉन्सन भारतात येणार आहे. भारी ना? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानेवारी 2019ला अमेरिकेतील व्होग युएस या प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रियांकाचा फोटो झळकणार आहे. यापूर्वी सोनम-आनंद आहुजाच्या लग्नानंतरही व्होगने त्यांचे फोटो प्रसिद्ध केले होते.
लग्नात काय घालणार?
फक्त इतकंच नाही बरं … तर त्याआधी आपल्या या देसी गर्लने मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या ख्रिश्चन वेडिंग आऊटफीटबाबत मनमोकळेपणाने सांगितलं आहे. प्रख्यात डिझायनर राल्फ लॉरेन यांनी डिझाईन केलेला वेडिंग गाऊन ती लग्नात परिधान करणार आहे. ही गोष्ट इतकी खास का आहे माहिती आहे का तुम्हाला? कारण जिच्यासाठी राल्फने अप्रतिम वेडिंग गाऊन डिझाईन केलाय अशी प्रियांका पहिलीच सेलिब्रेटी आहे. त्याआधी त्याने कधीच कुठल्याच सेलिब्रेटीसाठी वेडिंग गाऊन डिझाईन केला नव्हता. प्रियांकाच्या आधी राल्फने फक्त त्याच्या लेकीसाठी आणि भाचीसाठीच वेडिंग गाऊन डिझाईन केला होता. मासिकात असंही म्हटलयं, की राल्फने प्रियांकाचा वेडिंग गाऊन बनवण्याआधी प्रियांकाचे बरेच स्केचेच बनवले आणि त्यानंतरच प्रियांकाला शोभेल अशी डिझाईन फायनल केली… हे खरंच भारी आहे ना?
निकचे बाबा लावणार लग्न
अजून एक गंमत, प्रियांका- निकचा ख्रिश्चन विवाहाचे विधी त्याचे वडील वडील पॉल केविन जोनास सिनियर स्वतः करणार आहेत.
रिसेप्शनचे खास पाहुणे
लग्नानंतर मुंबई आणि दिल्ली इथे रिसेप्शन होणार असून रिसेप्शनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी दिल्लीत झालेल्या विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शनलाही मोदींनी हजेरी लावली होती. त्यामुळे यावेळी प्रियांका आणि निकला भेट द्यायला नरेंद्र मोदी जाणार का? हे लवकरच कळेल.
फोटो सौजन्यः Instagram