अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या यशाच्या यादीत आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. दीपिका बॉलीवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीच्या यादीत तिचं नाव टॉप लिस्टमध्ये आहे. आजच्या घडीला सर्वात जास्त ब्रॅंड वॅल्यू असण्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने जगभरातील सर्व सुपरस्टार्संना मागे टाकलं आहे. सध्या दीपिका पदूकोण देशातील नंबर वन सेलिब्रेटी बॅंड आहे. दीपिका अनेक मोठमोठ्या ब्रॅंडची ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे. अशातच फॅशन इंडस्ट्रीमध्ये आणखी एक यश तिने तिच्या नावावर केलं आहे.
BFO 500 च्या यादीत दीपिकाचा समावेश
दीपिकाच्या यशात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. कारण नुकताच BFO 500 म्हणजेच बिझनेस ऑफ फॅशन अॅंड हाईलायट्स 500 च्या यादीत दीपिकाचा समावेश झाला आहे. 2. 4 ट्रिलयन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या या फॅशन इंडस्ट्रीत जगभरातील अनेक सेलिब्रेटीजचा समावेश होत असतो. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाच्या ड्रेस सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे दीपिकाने फॅशन इंडस्ट्रीवर स्वतःची एक वेगळीच छाप टाकली आहे. महत्त्वाचं म्हणजे या यादीत सहभागी होणारी दीपिका एकमेव बॉलीवूड अभिनेत्री आहे. BOF 500 ने त्यांच्या वेबसाईटवर त्यांची फॅशन आयकॉन्सची यादी प्रदर्शित केली आहे. ज्यामध्ये दीपिकाचे नाव आणि तिची माहिती आहे. या यादीत दीपिकाने कान्स 2019मध्ये परिधान केलेला पोपटी रंगाचा ड्रेस असलेला फोटो अपलोड करण्यात आला आहे. यासोबतच दीपिका बॉलीवूडची एक सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रीआहे, एप्रिल 2019 मध्ये वोग मासिकातील कव्हरगर्ल असण्याबाबत अशा अनेक प्रकारची माहिती शेअर करण्यात आली आहे. दीपिकाला तिच्या इन्स्टा अंकाऊटवर प्रंचड फॉलोवर्स आहेत. लवकरच ती ‘छपाक’ आणि ’83’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दीपिकाच्या यशाचा ग्राफ
दीपिका पदुकोणने मागील वर्षी जवळजवळ 21 निरनिराळ्या उत्पादनांसाठी ब्रॅंड अॅंम्बेसेडरचं काम केलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या ब्रॅंडसाठी काम करणारी जगभरात दीपिका एकमेव सेलिब्रेटी ठरली आहे. दीपिकाच्या वाढत्या ब्रॅंड वॅल्यूप्रमाणेच तिने स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. फर्निचर आणि ब्युटी प्रॉडक्ट्स सोबतच ती आता योगर्टच्या बिझनेसमध्येदेखील गुंतवणूक करत आहे. व्यावसायिक सूत्रांनूसार दीपिकाच्या ज्या स्टार्ट अप बिझनेसमध्ये गुंतवणूक करते त्या बिझनेसची गुंतवणूक दीर्घ काळासाठी केलेली असते. दीपिका आजच्या घडीला एक लोकप्रिय ब्रॅंड आहे. शिवाय तिने तिच्या अॅक्टिंग करिअरमध्येदेखील तिने एक विशिष्ठ उंची गाठली आहे. मागच्या वर्षी 14-15 नोव्हेंबरला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने इटलीमधील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी खाजगी पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नानंतर एका कार्यक्रमात चुकीच्या पोझमुळे तिच्या बेबी बंपच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र दीपिकाने तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या चुकीच्या असल्याचं एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. यासाठी दीपिका म्हणाली की, ‘मी कधी ना कधी आई होणारच आहे. कोणत्याही विवाहीत महिलेवर किंवा जोडप्यावर आईवडील होण्यासाठी दबाव टाकणं चुकीचं आहे.’ दीपिका पुढे हेही म्हणाली की, ‘ज्या दिवशी महिलांना आई होण्याबाबतचा प्रश्न विचारणं सोडून दिलं जाईल त्या दिवशी आपल्या समाजात नक्कीच चांगला बदल घडून येईल.’ साहजिक सेलिब्रेटी ब्रॅंड नंबर वन दीपिकाचा फोकस सध्या कामावरच राहणार आहे. शिवाय तिच्या यशाच्या यादीत सतत भर पडत असल्यामुळे तिच्या करिअरचा ग्राफ दिवसेंदिवस उंचावत चालला आहे.
फोटोसौजन्य – इंन्स्टाग्राम
हे ही वाचा-
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
विकीने तीन महिन्यात कमी केलं तब्बल 13 किलो वजन
अभिनेता आनंद इंगळे साकारणार ‘सदानंद झगडे’
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आहेत सध्या ‘हे’ हॉट मोस्ट एलिजिबल बॅचलर्स