ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
दीपिका पादुकोणच्या स्मितहास्याला मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान

दीपिका पादुकोणच्या स्मितहास्याला मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान

ओम शांती ओममधून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री दीपिका पादूकोण दिवसेंदिवस यशाची शिखरं गाठत आहे. पहिल्याच चित्रपटात तिने तिच्या गोड स्मितहास्याने चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. मात्र आता हेच हास्य जगभरात गौरवले जाणार आहे. दीपिका पादुकोनच्या स्मितहास्य असलेला स्टॅच्यू आता अथेंस एअरपोर्टची शोभा वाढवणार आहे. दीपिका पादुकोण हे नाव फक्त भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. यापूर्वीदेखील दीपिकाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकवेळा गौरवण्यात आलेलं आहे. नुकतंच अथेंस इंटरनॅशन एअरपोर्टवर एक कॅंपेन घेण्यात आलं. ज्यामध्ये  दीपिकाला दी ‘ऑथेंटिक स्माईल ऑफ पीपल ऑफ दी वर्ल्ड’ने गौरवण्यात आलं. दीपिकाचे हास्य गॉड गिफ्टेड आहे असं नेहमीच म्हटलं जातं. सर्वजण नेहमीच तिच्या हास्याचं कौतुक करत असतात. ऑथेंटिक स्माईल कॅंपेन तेव्हा करण्यात आलं होतं जेव्हा कोविड 19 च्या लॉकडाऊननंतर जनजीवन पुन्हा पूर्ववत सुरू झालं. हे कॅंपेन प्रवाशांचे वेलकम करण्यासाठी घेण्यात आलं होतं. या कॅंपेनमधील खास गोष्ट ही की यात भारतातून दीपिका पादूकोणची निवड करण्यात आली. यासाठी अथेंस एअरपोर्टच्या गॅलरीत दीपिकाचा संगमरवरी पुतळा तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये दिपिका साडी, टिकली अशा भारतीय वेशात स्मितहास्य करताना दिसत आहे.

अथेंस एअरपोर्टवर जगभरातील काही निवडक लोकांचे स्मितहास्यातील पुतळे ठेवण्यात आले आहेत. हे अशा लोकांचे पुतळे आहेत जे ऑथेंटिक स्माईल म्हणजे प्रामाणिक स्मितहास्यासाठी जगात लोकप्रिय आहेत. जगभरातील अशा  निवडक लोकांमध्ये दिपिकाचे नाव समाविष्ट होणं ही भारतासाठी नक्कीच मानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे या पुतळ्यांवर त्या व्यक्तीचे नाव लिहिलेले नसून तिथे त्यांचे प्रोफेशन आणि देश नोंदवण्यात आलेले आहेत. शिवाय तो पुतळा कोणत्या घटकापासून तयार केलेला आहे हे देखील या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहे. दिपिकीच्या पुतळ्याजवळ लिहिलेलं आहे की, ‘भारतीय बॉलीवूड अभिनेत्री स्माईल इट एथेंस इंटरनॅशन एअरपोर्ट. ग्रे मार्बल, 2020 ए. डी.’

अथेंस एअरपोर्टने या स्टॅचूचा फोटो काढून त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामुळे जगभरातून दीपिकाचे कौतुक होताना दिसत आहे. दीपिकाचा हा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यावर लाईक्स आणि शुभेच्छाचा पाऊस पडत आहे. दीपिकासोबत अनेक पुतळे एथेंस एअरपोर्टवर ठेवण्यात आले आहेत. मात्र त्याची नावे कळू शकली नाहीत. यातील काही पुतळे लाकडाचे तर काही पांढऱ्या संगमरवरी दगडाचे आहेत. दिपिकाच्या पुतळ्यावरही तिचे नाव लिहीलेले नसले तरी तिच्या स्मितहास्यामुळे चाहत्यांना तिला ओळखणं सहज शक्य आहे. बॉलीवूडमधून दीपिकाने प्रेक्षकांच्या मनावर अशी काही छाप सोडली आहे की तिचे हास्य न ओळखणं शक्यच नाही. 

दीपिका मागच्या वर्षी छपाक या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या छपाकला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सध्या दीपिका शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ चर्तुवेदी आणि अनन्या पांडे झळकणार आहे. त्याचप्रमाणे दीपिका आणि रणवीर सिंहची एकत्र भूमिका असलेल्या 83 ची चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलं होतं. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी

Bigg Boss 14 : राहुल वैद्यने सोडला शो,फॅन्सनी व्यक्त केली नाराजी

ADVERTISEMENT

हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन

08 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT