अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर यांच्या दसवी या चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा आवडली. गंमत म्हणजे या ट्रेलरमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचा उल्लेख केल्याचे प्रेक्षकांच्या लगेच लक्षात आले. चित्रपटाचे ट्रेलर ऑनलाइन प्रदर्शित झाल्यानंतर काहीच तासांतच दीपिका पदुकोणनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर यावर प्रतिक्रिया दिली.
दसवीचे आगळेवेगळे कथानक

अलीकडे अभिषेक बच्चनचे विविध विषयांवर येणारे चित्रपट बघून आपल्याला लक्षात येते की अभिषेक किती उत्तम अभिनेता आहे. अभिषेकने इतक्या वर्षांत केलेल्या विविध भूमिका तो अभिनयाच्या बाबतीत अष्टपैलू आहे याची आपल्याला खात्री पटवून देतात. त्याच्या दसवी या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमधून देखील हेच दिसतेय की हा एक इंटरेस्टिंग चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अभिषेक बरोबर यामी गौतम आणि निम्रत कौर या देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तुरुंगातून दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीची कथा या चित्रपटात आपल्याला बघायला मिळेल. चित्रपटाच्या कथेव्यतिरिक्त या ट्रेलरमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते दीपिका पदुकोणच्या उल्लेखाने! या ट्रेलरमध्ये एक विनोदी सीन आहे जिथे अभिषेकला एका वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करण्यास सांगितले जाते. त्या वाक्यात अभिषेक दीपिकाचे नाव घेतो असे ट्रेलरमध्ये दाखवले आहे.
दसवी एका सत्यघटनेवर आधारित चित्रपट
दसवी हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. यातील प्रमुख पात्र गंगाराम चौधरी हा एक बढाईखोर मुख्यमंत्री असतो ज्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्यामुळे तुरुंगवास भोगावा लागतो. पण केवळ आठवीपर्यंतच शिक्षण घेतल्याने तो तुरुंगातूनच दहावीची बोर्डाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतो असे काहीसे हे कथानक आहे हा अंदाज आपल्याला ट्रेलर बघून लावता येतो..
दसवीच्या ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चनने गंगाराम चौधरी हे पात्र साकारले आहे. या पात्राच्या तोंडी एक संवाद आहे. ज्यात अभिषेक बच्चनला एका वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करण्यास सांगण्यात येते. त्यातले वाक्य असे आहे की “रणवीर लव्ह्ज दीपिका.” त्यावर अभिषेकचे पात्र उत्तर देते की, “एव्हरीवन लव्ह्ज दीपिका.” दीपिकाला जेव्हा तिचा विशेष उल्लेख झालाय हे कळले तेव्हा तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी टाकून छान प्रतिक्रिया दिली आणि दसवीच्या टीमचे आभार मानले.
दीपिकानेही शेअर केले ट्रेलर

दीपिकाने या संवादावर प्रतिक्रिया देत तिच्या इंस्टाग्राम स्टोरीतून हे ट्रेलर पुन्हा शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिले की, “तुमच्या या प्रेमाबद्दल धन्यवाद टीम दसवी. तुम्हाला खूप शुभेच्छा.” दीपिका आणि अभिषेकने यापूर्वी ‘खेलें हम जी जान से’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अभिषेकचा हा आगामी चित्रपट तुषार जलोटा यांनी दिग्दर्शित केला असून तो 7 एप्रिलला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी दीपिकाचा गहराईयाँ हा चित्रपट आला होता. यात तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी, धारिया करवा आणि अनन्या पांडे हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. दीपिकाचा शाहरुख खानबरोबरचा पठाण हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत असेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक