सध्या अनेक सेलिब्रिटीच्या घरी गुड न्यूज ऐकू येत आहे. 2020 मध्ये अनेक सिंगल स्टेटस असणाऱ्यांनी लग्न केले तर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या घरी नवा पाहुण येणार असल्याची न्यूज शेअर केली. करिना कपूर खान पुन्हा आई होणार आहे तर अनुष्का शर्माही लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. या सगळ्यात दीपिका आणि रणवीर कधी गुड न्यूज देणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. यासंबंधी दीपिकाला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला असता आता दीपिकाने खुद्द याबाबत खुलासा केला आहे. दीपिकाने कुटुंब कधी वाढवणार याबाबत अगदी स्पष्टपणे या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आतापर्यंत दीपिका गरोदर असल्याच्या वावड्या खूप वेळा निर्माण झाल्या होत्या. पण आता दीपिकाने याबाबत स्वतः सांगितले आहे.
2020 मध्ये लहान वयातच केला या कलाकारांनी जगाला अलविदा
मुलाचा जन्म ही मोठी जबाबदारी
दीपिका आणि रणवीर हे दोघेही स्वतःच्या करिअरमध्ये खूपच गढलेले आहेत. दोघेही सध्या चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये व्यग्र आहेत. दोघांकडेही काही प्रोजेक्ट आहेत. तसंच दीपिकाने सांगितले की मानसिकरित्या दोघेही मुलाला जन्म देण्यासाठी अजूनही तयार नाहीत. मुलाची जबाबदारी घेणं हा खूप मोठा निर्णय असल्याचे दीपिकाने म्हटलं आहे. तसंच मुलाला जन्म देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मानसिक तयारी असणं अत्यंत गरजेचे आहे असं दीपिकाला वाटते आणि अजूनही मुलाला जन्म देण्याइतकी मनाची तयारी आपली झाली नसल्याचे दीपिकाने स्पष्ट केले आहे. दोघेही जोडीदार व्यवस्थित जेव्हा जबाबदारी पेलू शकतात तेव्हाच मुलाला जन्म देता येऊ शकतो असंही दीपिकाने सांगितले आणि सध्या दोघेही यासाठी तयार नसल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे किमान सध्या तरी दीपिकाकडून ही गुड न्यूज (Good News) चाहत्यांना मिळेल असं वाटत नाही. दीपिकाने याबाबत अगदी स्पष्ट मत सांगितले आहे.
Bigg Boss14: राखी सावंतच्या कथित नवऱ्याने राहुल महाजनच्या ‘त्या’शब्दावर व्यक्त केला राग
सध्या करिअरमध्ये व्यग्र
दीपिकाने 2007 मध्ये ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्याच चित्रपटापासून दीपिकाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि आता दीपिका ए लिस्टर अभिनेत्यांमधील यादीमध्ये गणली जाते. दीपिकाने वेळोवेळी वेगवेगळे विषय निवडत आणि अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. लवकरच शाहरूखसह पुन्हा एकदा दीपिका ‘पठाण’ चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तर सध्या दीपिका शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून या चित्रपटात तिच्यासह सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे हे दोघेही दिसणार आहेत. या चित्रीकरणादरम्यान दीपिकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. तर रणवीर सिंह आणि दीपिकाचा 83 हा चित्रपट कोरोनामुळे रखडला असून पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. याशिवाय रणवीर सिंह सध्या रोहित शेट्टीच्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. यामुळेच दीपिका आणि रणवीर इतक्यात तर आई – बाबा होणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दोघांनीही लवकर द्यावी असं वाटत आहे. त्यामुळे इतर सेलिब्रिटींप्रमाणे आता दीपिका आई कधी होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला दोन वर्ष झाली असून दोघेही आपल्या सोशल मीडियावर एकमेकांबद्दल नेहमीच प्रेम व्यक्त करताना दिसतात. तर दीपिकाच्या त्रासदायक काळातही रणवीर तिच्यासह कायम उभा राहिला आहे.
बॉलीवूडचे सुपरहिट चित्रपट जे पाहिल्यावर वाटतं लग्न असावं तर असं
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक