ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
deepika-padukone-saree-style

फॅशनेबल प्रिंट्स आणि डिझाईन्ससाठी फॉलो करा दीपिका पादुकोणची स्टाईल

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही लाखो दिलों की धडकन आहे. अर्थात हे वाक्य कधीही वाचलं तर अतिशयोक्ती नाही वाटणार. दीपिकाची फॅशन आणि दीपिकाची स्टाईल फॉलो करण्यासाठी अनेकांना आवडते. विशेषतः दीपिकाच्या साड्यांची स्टाईल ही अप्रतिम आहे. दीपिकाने नुकतेच बोल्ड शूट केले आहे. पण भारतीय साड्यांची बातच काही वेगळी आहे. नुकतेच दीपिकाने Liva द्वारे भारतातील पहिल्या नवीन-युगाच्या साडी ब्रँड नव्यासाचे उद्घाटन केले. नव्या तरूणाईला सतत काहीतरी आकर्षक आणि वेगळे हवे असते. त्यामुळे या कलेक्शनमध्ये इथरियल प्रिंट्स आणि आकर्षक शैली आहेत. प्रत्येक साडी आधुनिक ट्विस्टसह रंगीबेरंगी कथा सांगते. अनोखे बोल्ड डिझाईन्स आणि वैविध्यपूर्ण थीम शैलीला फॅशनशी एकरूप होण्यासाठी हे साडीचे डिझाईन करण्यात आले आहे. प्रसिद्ध डिझायनर अबीर आणि नानकी यांनी लिवाचे डिझाईन केले आहे आणि आपल्या स्टाईलने दीपिकाने त्याला चार चाँद लावले आहेत. आदित्य बिर्लाच्या या नव्या ब्रँडमध्ये दीपिकाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. मिनिमल मेकअप आणि नैसर्गिक रंग असणारी ही साडी दीपिकावर अधिक सुंदर दिसते आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. 

फॅशन आणि आराम दोन्ही असणारी साडी 

दीपिकाची स्टाईल अनोखी आहे. कोणत्याही तरूण मुलीला आपल्याला दीपिकाची स्टाईल फॉलो करायची आहे असं वाटलं तर नक्कीच त्यात काही वेगळं नाही इतकी सुंदर स्टाईल दीपिका करते. आधुनिक कपडेच नाही तर अगदी भारतीय साडीलाही एक वेगळी स्टाईल मिळवून देण्याचे काम दीपिकाने केले आहे. आपला कमनीय बांधा, अप्रतिम उंची यामुळे साडीमध्ये दीपिकाचे सौंदर्य हे अधिक आकर्षक आणि खुलून दिसते. “साड्यांना नवीन “कूल” समजणे आणि आधुनिक भारतीयांसाठी ती पसंतीची पोशाख बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. लिवाची नव्यासा साडीस (Navyasa by Liva) अशीच काहीशी दिसून येत आहे. विशेषतः तरुण पिढी आणि शहरी महिलांमध्ये साड्यांबद्दलची वेगळी धारणा असते. त्यांना साड्या आवडत नाही असं म्हटलं जातं. पण दीपिकाच्या या स्टाईल पाहून कोणालाही साडी ही आपल्या पेहरावाचा भाग असावी असं वाटल्याशिवाय राहणार नाही. 

तरल आणि सॉफ्ट साड्या 

भरजरी साड्या आणि जड साड्या या आपल्याकडे पूर्वापार चालत आल्या आहेत. पण तरूण मुलींना साडी नेसायची म्हटली की, त्याचे वजन झेपणे कठीण होते. तसंच साडी नेसण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते हा विचार करूनच साडी नेसली जात नाही. पण दीपिकाने नेसलेली ही साडी अगदी तरल, हलकी आणि दिसायलाही तितकीच आकर्षक आहे. नव्या डिझाईन्सच्या या नव्यासा साड्या निसर्गावर आधारित रंगावर बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही नव्या पिढीतील मुलींना यांचा रंग आणि याचे डिझाईन आवडणार नाही असं होणार नाही. तसंच कोणत्याही लग्नामध्ये अथवा समारंभात साडीच्या वजनामुळे लवकर कधी एकदा साडी सोडता येईल अशा स्वरूपाची भावना निर्माण होते, तीदेखील होणार नाही. फॅशनेबल, बोल्ड प्रिंट्सची तुम्हाला आवड असेल तर दीपिकाच्या या नव्या साड्यांबाबत तुम्हालाही माहिती असायला हवी. तसंच तुमच्या कॉलेजच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी ही साडी नेसून स्टाईलमध्ये जाणं तुम्हाला अधिक लक्षवेधी ठरवेल यात शंका नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
28 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT