कधी कधी मालिका रंजक वळणावर आल्या की, त्या पाहण्याची इच्छा होते. आता झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेतील व्हिलन अर्थात डॉक्टररुपातील खूनी आता पकडला जाणार आहे. पोलिसाच्या हाती आता सगळ्या गोष्टी लागल्या असून देवीसिंगच्या मुसक्या कधी पकडल्या जातील याची प्रतिक्षा आता सगळेच जण करत आहेत. आता एकदाचा देवी सिंग म्हणजेच नाव बदलून झालेला डॉ. अजित सिंहचा पर्दाफाश होणार आहे. मालिका ही संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे या मालिकेचा टीआरपीदेखील वाढला आहे.
अलिबागकरांवरुन विधान करणे आदित्यला पडले महाग, मनसेने दिला इशारा
मालिकेला आले रंजक वळण
देवमाणूस ही मालिका अगदी पहिल्या दिवसापासून रंजक वळणावर आहे. एकामागोमाग एक आपल्या फायद्यासाठी खून करणारा कंपाऊडर पण डॉक्टर बनून लोकांना गंडवणाऱ्या देवी सिंगची माहिती मिळवण्यासाठी आलेल्या पोलिसाला आता देवी सिंग कोण ते कळले आहे. पोलिसाशी नाते असताना आता आपल्या फायद्यासाठी आणि पोलीस तपासापासून दूर जाण्यासाठी आता अजितकुमार तिची साथी डिंपल हिच्यासोबत विवाह करण्यास तयार झाला आहे. येत्या एपिसोडमध्ये त्यांचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी लगीनघाई पाहायला मिळत आहे. डिंपलची आजी म्हणजेच सरु आजी हिला देखील या डॉक्टरांबद्दल संशय असून तिलाही हा विवाह होऊ द्यायचा नाही. त्यामुळे ती हा विवाहसोहळा तोडण्यासाठी टपून बसली आहे.
मलायका अरोराला पुन्हा व्हायचंय आई, आता हवी गोंडस मुलगी
कसा पकडला जाईल देवी सिंग
देवी सिंग कसा पकडला जाईल याची उत्सुकता खूप जणांना लागली आहे. तो लवकरात लवकर पकडला जावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक प्रोमोमध्ये तो पकडला गेला हे दाखवले जात आहे. पण त्याला नेमकं कसं पकडलं जाणार याची उत्सुकता लागली आहे. या मालिकेत पोलिसांच्या हाती सबळ पुरावे लागले आहेत. ज्याच्या बळावर त्याची अटक ही अगदी निश्चित झाली आहे.
अभिनेत्री पूजा सावंत पडली प्रेमात, ‘पिकबू’ लाडाचे नाव
देवी सिंगच्या रुपात साकारला उत्तम व्हिलन
या मालिकेतील या भामट्या चोराची आणि खोट्या डॉक्टरांची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने साकारली आहे. या आधी ‘लागीर झालं जी’ मालिकेमध्ये भैय्यासाहेबांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेमुळेच त्याला हा नवा रोल साकारण्याची संधी मिळाली. त्याने ही भूमिका ही अगदी उत्तम वठवली आहे. त्याच्या अभिनयाची तारीफ करु तेवढी कमीच आहे. त्याच्या अभिनयामुळे त्याचा राग अनेकांना आल्यावाचून राहणार नाही. एखाद्या गुन्हेगाराची मानसिकता काय असू शकते याचा उत्तम अभिनय त्याने यामध्ये केला आहे. ही मालिका सत्य घटनेवर आधारीत असून या मालिकेत दाखवताना त्याला थोडे नाटकी वळण देण्यात आले आहे. पण अजित आणि डिंपलची ही जोडी एकेकाळी फारच प्रसिद्ध होती. पोलिसांनी त्यांच्या अशाच मुसक्या आवळल्या होत्या.
आता काहीच दिवसांवर या मालिकेचा शेवट आला आहे. त्यामुळे ही मालिका आतापासून तिचा शेवट होईपर्यंत पाहायला मुळीच विसरु नका.