ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
धनत्रयोदशी साजरी करण्यामागील कथा आणि पूजा विधी

धनत्रयोदशी साजरी करण्यामागील कथा आणि पूजा विधी

दिवाळी आता अगदी काहीच दिवसांवर आली आहे. तुमची दिवाळीची तयारी झाली असेलच किंवा सुरु ही असेल. तुम्ही दिवाळीची इतकी सगळी तयारी करता पण तुम्हाला दिवाळीच्या सगळ्या दिवसांचे महत्व माहीत आहे का? तुम्हाला माहीत नसेल तर आज आपण धनत्रयोदशीबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत. धनत्रयोदशी, धनतेरेस अशा नावाने हा दिवस ओळखला जातो. या दिवशी धन्वंतरी पूजनासोबतच लक्ष्मी आणि कुबेराची पूजाही केली जाते. हा दिवस साजरा का केला जातो या बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती आधी जाणून घेऊया. तसंच तुम्ही धनतेरस कोट्स (Dhanteras Quotes In Marathi) ही शेअर करू शकता

DIY: दिवाळीला घरी स्वतः तयार करा हे ‘आयुर्वेदिक उटणे’

म्हणून साजरी केली जाते धनत्रयोदशी

Instagram

धनत्रयोदशी संदर्भात अनेक दंतकथा सांगिल्या जातात. त्यापैकी काही दंतकथा आपण पाहुयात.

ADVERTISEMENT

दंतकथा 1:

असूरांसोबत ज्यावेळी इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांचा शाप निवारणासाठी समुद्र मंथन केले त्यावेळी या समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. याला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. 

दंतकथा 2 :

Instagram

लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते ती अशी की, एकदा भगवान विष्णू मृत्यूलोकी जात होते. त्यावेळी लक्ष्मींनी त्यांच्यासोबत जाण्याचा आग्रह केला.  त्यांनी लक्ष्मीला मी सांगीन तसे वागशील तरच मी तुला घेऊन जाईन, असे सांगितले. त्यावेळी माता लक्ष्मी तयार झाली आणि दोघे भूमंडलावर पोहोचले. भगवान विष्णून यांनी या पुढे तू आता मी परत येईपर्यंत येऊ नकोस असे लक्ष्मी यांना सांगितले आणि ते दक्षिण दिशेकडे जाऊ लागले. लक्ष्मींनी विष्णू यांनी दिलेला शब्द मोडला. त्यांचा पाठलाग करता करता त्या एका शेतात पोहोचल्या तेथील पिवळ्या फुलांनी त्याचे मन मोहित केले. त्यांनी त्याचा श्रृंगार केला. त्यानंतर त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेथे उस तोडून त्यांनी खाल्ला. भगवान विष्णू परत येत असताना त्यांना लक्ष्मी शेतात दिसल्या. शेतातल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची कमाई तोडून खाताना पाहिल्यामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले. त्यांनी लक्ष्मी मातेला श्राप देत ते क्षीरसागरात निघून गेले. 12 वर्षांचा शेतकऱ्याकडे राहण्याचा हा श्राप होता. त्यामुळे लक्ष्मी माता शेतकऱ्याकडे राहू लागली. लक्ष्मी मातेच्या वास्तव्यामुळे त्याच्या घरात सुख-समाधान, पैसा-अडका, संपत्ती सगळे काही आले. 12  वर्षानंतर जेव्हा लक्ष्मी मातेला घेण्यासाठी भगवान विष्णू आले त्यावेळी शेतकरी लक्ष्मी मातेला जाऊ देत नव्हता. त्यावेळी त्यांनी लक्ष्मी ही चंचल असते ती एका ठिकाणी कधीच थांबू शकत नाही. असे सांगितले. पण तरीदेखील शेतकरी लक्ष्मी मातेला सोडत नव्हता. अखेर लक्ष्मीने शेतकऱ्याला ‘उद्या तेरसचा दिवस आहे. उद्या घर स्वच्छ कर. रात्रीच्या वेळी तुपाचा दिवा लाव एका तांब्याच्या भांड्यात पैसे ठेवून तू त्याची पूजा कर. तुला मी त्यावेळी दिसणार नाही. पण माझ्या पुजेमुळे तुझ्या घरात अखंड संपत्ती राहील.’ त्या दिवसापासून धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. वर्षभर कोणतेही आर्थिक संकट येऊ नये. घरात पैसा- अडका असावा यासाठी ही पूजा केली जाते. 

या दिवाळीला चंदनतेलाने करा ‘अभ्यंगस्नान’

ADVERTISEMENT

दंतकथा 3:

Instagram

एकदा यमराजाने एक कथा सांगितील. एक हंस नावाचा राजा शिकार करत असताना दुसऱ्या राज्याच्या सीमेत जाऊन पोहोचला. दुसऱ्या राज्याच्या राजाने हंस राजाचे स्वागत करत त्याचे आदरातिथ्य केले. त्याचदिवशी हेमराजाला पुत्र झाला. षष्ठीच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचे भविष्य सांगितले, राजाच्या पुत्राचा सोळाव्या मृत्यू होईल… म्हणजेच लग्नाच्या चौथ्यादिवशी तो मरेल. हे ऐकून राजा व्याकूळ झाला त्याने आपल्या पुत्राला मृत्यू येऊ नये म्हणून एका गुहेत लपवून ठेवलं. विधीवत सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे राजपुत्राचा वयाच्या सोळाव्या वर्षी हंस राजाच्या मुलीशी विवाह झाला. त्याचे प्राण घेण्यासाठी यमराज तिथे गेले. लग्नाच्या चौथ्या दिवशी त्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यावेळी एवढ्या आनंदाच्या दिवशी अनर्थ कोसळलेला पाहून यमराजालाही दु:ख झाले. असा प्रसंग कोणावरही येऊ नये म्हणून त्यांनी धनत्रयोदशीपासून पाच दिवस जो दीपदान करेल  त्याला अपमृत्यू येणार नाही. असे सांगितले म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो. 

कशी कराल पूजा

  •  धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. उत्तम आरोग्य मिळावे यासाठी धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती आणून त्याची पूजा करतात.
  • घरी अपमृत्यू येऊ नये म्हणून घराबाहेर यमराजाच्या नावाने एक दिवा लावला जातो. म्हणून संध्याकाळी दाराबाहेर दिवा लावा
  • याच दिवशी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. असे म्हणतात की, या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. काही जण धणे-गूळ आणि पैसे ठेवून लक्ष्मीची पूजा करतात. 

यंदा धनत्रयोदशी साजरी करण्याआधी त्यामागचे महत्व जाणून घ्या आणि इतरांनाही ते सांगा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
21 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT