ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
बिग बजेट असणार धनुषचा ‘दी ग्रे मॅन’ एका सीनसाठी करोडो रूपये खर्च

बिग बजेट असणार धनुषचा ‘दी ग्रे मॅन’ एका सीनसाठी करोडो रूपये खर्च

सुपरस्टार धनुष हॉलीवूडपटातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. सध्या त्याच्या दी ग्रे मॅन ( The Gray Man) ची चांगलीच चर्चा सुरू आहे. मार्वल मुव्हीजच्या ‘अॅव्हेंजर एंडगेम’ चं दिग्दर्शन केलेले रूसो ब्रदर्स याही चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अॅंथनी आणि रूसो या दोघांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि प्रॉडक्शनची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे यासाठी नेटफ्लिक्सने रूसो ब्रदर्सनां दोनशे डॉलर्स म्हणजेच जवळजवळ सोळाशे करोड रूपये दिलेले आहेत. चित्रपटातील अनेक सीन्स हे जगभरातील बेस्ट लोकेशन्समध्ये शूट करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर एका सीनसाठी चक्क 319 कोटी खर्च करण्यात आले आहेत. हा चित्रपट धनुषचा पहिला हॉलीवूडपट आहेच. पण नेलफ्लिक्सचाही हा पहिलाच महागडा चित्रपट असणार आहे. 

चित्रपट निर्मितीसाठी लागले 1600 कोटी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘दी ग्रे मॅन’साठी नेटफ्लिक्सने रूसो ब्रदर्संना सोळाशे कोटी दिलेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मितीसाठी रूसो ब्रदर्संनी भरमसाठी पैसे खर्च केलेले आहेत, पण एवढंच नाही तर त्यासाठी रूसो ब्रदर्संनी कष्ट आणि मेहनतही खूप घेतली आहे. रूसो ब्रदर्सने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अक्षरशः जीव ओतून काम केलेलं आहे. एका सीनच्या शूटिंगसाठी तर जवळजवळ एक महिना लागला होता. ज्यामध्ये मोठ्या गन, प्रागच्या ओल्ड टाऊन क्वार्टरमध्ये फिरणाऱ्या ट्रामसोबत हॉलीवूड अभिनेता रायन गॉस्लिंगला पूर्ण सेनेनिशी लढताना दाखवण्यात आलं आहे. या सीनमध्ये  रायन एका दगडाच्या बेंचसोबत बांधला गेलेला असतो. हा असा सीन आहे जो सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. या सीनसाठी चाळीस मिलियन डॉलर म्हणजेच 319 करोड रूपये खर्च करण्यात आले आहेत. दिग्दर्शक अॅंथनी रूसोच्या मते हा चित्रपट एका चित्रपटाच्या आत आणखी एक चित्रपट असा अनुभव देणारा असेल.

धनुषचं होतंय कौतुक

दी ग्रे मॅन नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. अमेरिकेत तो काही चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात हॉलीवूड अभिनेता रायन गॉस्लिंग, क्रिस इवांस, आना दे अर्मास आणि रेगे जॉन पेज यांच्या सह साऊथ हिरो धनुषदेखील मुख्य भूमिकेत असणार आहे. धनुषचा हा हॉलीवूड डेब्यू आहे. त्यामुळे सहाजिकच चाहत्यांना धनुषचा हा पहिलाच हॉलीवूड चित्रपट पाहण्यात नक्कीच उत्साह असणार आहे. त्याच्या सहकलाकारांनाही या चित्रपटातील कामाबद्दल धनुषचं कौतुक केलं आहे. अजूनही चित्रपट ओटीटीवर 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
19 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT