Advertisement

मनोरंजन

दिया मिर्झाचं ‘काफिर’मधून वेबसिरिजमध्ये पदार्पण

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jun 6, 2019
दिया मिर्झाचं ‘काफिर’मधून वेबसिरिजमध्ये पदार्पण

तरूणाईमध्ये सध्या वेबसिरिज फारच लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे अनेक कलाकार डिजीटल माध्यमात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झादेखील लवकरच एका वेबसिरिजमधून झळकणार आहे. दिया मिर्झा काफिर या वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. दियासोबत या वेबसिरिजमध्ये मोहित रैनादेखील असणार आहे. ही वेबसिरीज दशहतवादावर आधारित असणार आहे. एका दहशतवाद्याला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार आणि वकिलाचा प्रवास यात दाखवला जाणार आहे. या वेबसिरीजचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. काफिर ही एका सत्य घटनेपासून प्रेरीत कहाणी आहे. या कहाणीत एका तरूण, पाकीस्तानी आणि दहशतवादाचा आररोप असलेल्या मातेचा खडतर प्रवास आहे. ट्रेलरमधील पाश्वसंगीत  आणि दियाचा अभिनय अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. ट्रेलर पाहूनच या वेबसिरिज बाबत उत्कंठा ताणली जात आहे.

दिया साकारणार दहशतवादी

काफिरच्या ट्रेलरमुळे या वेबसिरिज विषयी अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. या ट्रेलरमध्ये दिया एका दहशतवाद्याच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे. दियावर दहशहवाद्याचे आरोप करण्यात आलं आहे. अनेक वर्षांपासून ती तुरूंगात असल्याचं दिसत आहे. या ट्रेलरमधून दियाला मुलगी असल्याचं देखील दिसत आहे. काफिरमध्ये मोहित रैना पत्रकाराच्या भूमिकेत आहे. शिवाय त्याचे वकीलीचे शिक्षणदेखील पूर्ण झालेले आहे. दियाला न्याय मिळवून देण्यासाठी मोहित पुन्हा वकिली करण्याचा निर्णय घेतो.

काफिर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

काफिर 15 जूनला झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. काफिरचे दिग्दर्शन सोनम नायर यांनी केलं आहे तर या कहाणीचं लेखन भवानी अय्यरने केलेलं आहे.सिद्धार्थ मल्होत्रा या वेबसिरिजचे निर्माते आहेत.  दिया मिर्झा काफिरच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशी आव्हानात्मक भूमिका साकारत आहे. त्यामुळे ती तिच्या या भूमिकेबाबत आणि डिजीटल माध्यमातील पदार्पणाबाबत फारच उत्सुक आहे.

 

दिया मिर्झाचं पुनरागमन

दिया मिर्झाने रहना है तेरे दिल मै या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 2000 साली तिने मिस आशिया पॅसिफिक हा किताब जिंकला होता. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमधून दियाने काम केलं आहे. मात्र काही वर्षांपासून दिया चित्रपटसृष्टीपासून दूरावली होती. आता ती वेबसिरिजमधून आपलं नशिब ती आजमवणार आहे.

सूर्यवंशीमध्ये ‘बॅडमॅन’ साकारणार व्हिलनची भूमिका 

Taarak Mehta ka Ooltah Chashmah : तुम्ही पाहिला का दयाबेनच्या क्युट मुलीचा फोटो

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम