ADVERTISEMENT
home / मनोरंजन
दिया मिर्झाने वाहिली श्रद्धांजली

माझं बाळ राहिलं नाही…. दिया मिर्झाची ती पोस्ट चर्चेत

अभिनेत्री दिया मिर्झाची (Dia Mirza) ती पोस्ट सध्या खूपच जास्त चर्चेत आहे. तिच्या खूप जवळची व्यक्ती दगावल्याचे दु:ख तिने या पोस्टमधून व्यक्त केले आहे. त्यामुळे अनेकांना ती कोणाबद्दल बोलतेय असा धक्का बसेल. पण दिया मिर्झाची तरुण भाची आता या जगात राहिली नाही. हे सांगणारी आणि तिला श्रद्धांजली वाहणारी ही पोस्ट आहे. तिच्या फारच जवळ असलेली तिची भाची तिच्यासाठी खूप खास आणि तिच्या जीवाचा तुकडा होती असे या पोस्टमधून दिसत आहे. दरम्यान, हैदराबाद काँग्रेस लीडर फिरोज खान यांची मुलगी तानिया काकडे आहे. जाणून घेऊया काय आहे दिया आणि तिचे नाते आणि ही संपूर्ण घटना 

अपघातात निधन

अभिनेत्री दिया मिर्झा हिने तानिया काकडेची ही पोस्ट केल्यानंतर अनेकांना सुरुवातीला धक्का बसला होता. कारण तानिया कोण? हे कळायला काहीही मार्ग नव्हता. तानिया ही फिरोज खान यांची मुलगी आहे हे कळल्यानंतर या नात्याचा उलगडा झाला. फिरोज खान यांची तानिया सावत्र मुलगी असून फिरोज यांच्याशी दियाचे नाते असल्यामुळे तिचे तानियाशी नाते आहे. त्यामुळेच तिने ही खास पोस्ट तिच्या भाचीच्या स्मरणार्थ केली आहे. तिने यात लिहिले आहे. 

माझं बाळ, माझी भाची, माझी जान प्रकाशात निघून गेली आहे. ती जिथे कुठे असेल तिला तिथे शांतता मिळावी. आनंद मिळावा. तू कायम आमच्या ओठांवर हसू आणलेस  ते कायम तसेच आमच्या मनात राहील ओम शांती.. 

दियाने ही पोस्ट केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या भाचीसाठी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तानिया ही सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह होती. असेही तिच्या पोस्टवरुन दिसून येते. 

ADVERTISEMENT

तानिया होती खूपच सुंदर

तानियाच्या पोस्ट पाहिल्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध होती असे दिसून येत आहे. कोणत्याही टीनएजरप्रमाणे तिला स्टायलिंग, जिमींगची आवड होती असे दिसून येत आहे. एखाद्या मॉडेलप्रमाणे असणारी तिची ही भाची मॉडेलिंगही करावी असे दिसून येत आहे. प्रवास हा तिच्या फारच आवडीचा असावा. कारण ती वेगवेगळ्या ठिकाणी गाडीने प्रवास करताना मित्रांसोबत फिरताना दिसत आहे. त्यामुळे तानियाचे आयुष्य हे खूप आनंदाचे भरलेले असे दिसून येते. 

कार अपघातात निधन

दिया मिर्झाने पोस्ट टाकल्यानंतर खूप जणांना ही कोण ? असा प्रश्न पडला होता. त्यामुळे अर्थात तानियाच्या नावाचा शोध सुरु झाला. तानियाच्या निधनाविषयी कोणतीही माहिती सुरुवातीला नव्हती. पण त्यानंतर असे कळले की, कार अपघातात तिचे निधन झाले आहे. हैदराबाद येथे तिच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात ती जागीच ठार झाली. तर गाडीतील अन्य तीन जणांना हैदराबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही ठिकाणी तिच्या अपघाताची दृश्ये दिसत आहेत. तिच्या गाडीचे फोटो अनेक ठिकाणी व्हायरल झाले आहे. पण तिचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. 

दरम्यान दिया मार्फत अनेकांनी तिच्या भाचीला श्रद्धांजली वाहिली आहे. 

02 Aug 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT