ADVERTISEMENT
home / मेकअप
different types of face powder in marathi

कशी निवडावी फेस पावडर, जाणून घ्या विविध प्रकार

फेस पावडर हे मेकअपमधील एक महत्त्वाचं सौंदर्य प्रसाधन आहे. पूर्वी चेहऱ्यावर फक्त पावडर लावण्याची पद्धत होती. मात्र आता मेकअपचे इतके विविध प्रकार उपलब्ध आहेत की, मेकअप सेट करण्यासाठी फक्त फेस पावडरचा वापर केला जातो. फेस पावडर लावण्यामुळे चेहऱ्यावर घाम येत नाहीच, शिवाय चेहऱ्यावरील काळे डाग, व्रण झाकले जातात. एवढंच नाही आजकाल बाजारात विविध प्रकारच्या फेस पावडर मिळतात. यासाठीच जाणून घ्या फेस पावडरचे हे विविध प्रकार तसंच जाणून घ्या वांगसाठी मेकअप टिप्स | Face Makeup For Freckles In Marathi, बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड |Best Cruelty Free Makeup Brands In Marathi, नवरीसाठी मेकअप किटची यादी | Navricha Makeup Kit List

लूज पावडर (Loose Powder)

लूज पावडर ही एखाद्या डबीत अथवा बॉक्समध्ये मिळते. मेकअप सेट करण्यासाठी ब्रशच्या मदतीने तुम्ही लूज पावडर वापरू शकता. ज्यामुळे तुमचा मेकअप खूप वेळ टिकेल. लाइट कव्हरेज आणि नॅचरल लुकसाठी लूज पावडर लावणं फायद्याचं आहे. लूज पावडर तुमच्या चेहऱ्यावरील तेल आणि घाम शोषून घेते. ज्यामुळे मॅट आणि फ्रेश लुक तुम्हाला मिळू शकतो. तेलकट त्वचेच्या लोकांनी लूज पावडर लावणं जास्त फायद्याचं ठरेल.

बनाना पावडर (Banana Powder)

मेकअपची आवड असणाऱ्या महिलांकडे आजकाल बनाना पावडर असतेच. बनाना पावडर ही पिवळसर रंगाची एक अल्ट्रा फाइन, टोंड पावडर आहे. कन्सिलर आणि फाऊंडेशन सेट करण्यासाठी या पावडरचा चांगला फायदा होतो. जर तुमच्या चेहऱ्यावर लालसर डाग अथवा पुरळ असेल तर तुम्ही ते या पावडरमुळे झाकू शकता. डार्क सर्कल्स लपवण्यासाठी बनाना पावडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

कॉम्पॅक्ट पावडर (Compact Powder)

बाजारात प्रेस्ड पावडरदेखील सहज मिळतात, ज्यांना आपण कॉम्पॅक्ट असं म्हणतो. स्पंज अथवा ब्रशच्या मदतीने तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्यावर लावू शकता. लूज पावडरपेक्षा प्रेस्ड पावडर अधिक पिगमेंटेड असते. कारण यासाठी यामध्ये मेण अथवा सिलिकॉन वापरण्यात येतं. चांगलं कव्हरेज मिळण्यासाठी मेकअपमध्ये कॉम्पॅक्टचा वापर केला जातो. मेकअप न करताही तुम्ही फक्त कॉम्पॅक्ट अथवा प्रेस्ड पावडर चेहऱ्यावर लावू शकता. 

ADVERTISEMENT

मिनरल पावडर (Mineral Powder)

लूज आणि प्रेस्ड अशा दोन्ही स्वरूपात मिळणारी मिनरल पावडर ही पावडरच्या सूक्ष्म कणांपासून बनलेली असते. या पावडरमध्ये सिंथेटिक घटक नसतात. चांगलं कव्हरेज मिळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या पावडरमध्ये अॅंटि एनफ्लैमटरी गुणधर्म असतात ज्यामुळे चेहऱ्यावर एक सुरक्षित कवच तयार होतं. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्हाला बाजारात मिनरल पावडर विकत मिळतात.

पावडर फाउंडेशन (Foundation Powder)

तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही लूज अथवा प्रेस्ड पावडरऐवजी पावडर फाउंडेशन वापरू शकता.  कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेल निर्मिती जास्त काळ नियंत्रित केली जाते. तेलकट चेहऱ्यावर क्रीम अथवा जेल फाउंडेशन लावण्यापेक्षा हा चांगला पर्याय आहे. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्याला मॅट फिनिश लुक मिळतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT