ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
Different Ways You Can Use Your Old Toothbrush In Marathi

नका फेकू जुना टुथब्रश, असा करा पुन्हा वापर

दातांच्या आरोग्यासाठी नियमित दोन वेळ दात घासणं  खूप गरजेचं आहे. त्याचसोबत दंत वैद्य सांगतात की, दात निरोगी राहण्यासाठी तुम्ही वापरत असलेला टुथब्रश कमीत कमी तीन महिन्यांनी नियमित बदलायला हवा. नवीन टुथब्रश खरेदी केल्यावर तुम्ही तुमच्या जुन्या टुथब्रशचं काय करता. बरेच जण जुना टुथब्रश कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देतात. मात्र हा जुना टुथब्रश तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतो. घरातील अवघड आणि किचकट जागा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या टुथब्रशचा वापर करू शकता. यासाठीच जुना टुथब्रश वापर झाल्यावर फेकून न देता असा वापरा.

दातांच्या स्वच्छतेसाठी वापरत असलेला टुथब्रश योग्यवेळी बदला, नाहीतर…

हेअर ब्रश स्वच्छ करण्यासाठी

केसांचे कंगवे आणि हेअर ब्रश सतत वापरून खराब होतात. जर ते वेळीच स्वच्छ केले नाही तर ते वापरल्यामुळे केसांमध्ये इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. केसांमध्ये कोंडा झाला तर तो लवकर कमी होत नाही. यासाठीच हेअर ब्रश, कंगवे नीट स्वच्छ करायला हवेत. हेअर ब्रश अथवा कंगवा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तुमचा जुना टुथब्रश वापरू शकता. 

आरोग्य उत्तम राहण्यासाठी नेमके किती वेळ घासावेत दात

ADVERTISEMENT

नखं स्वच्छ करण्यासाठी

स्वच्छ आणि मजबूत नखं तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. मात्र यासाठी नखं नियमित स्वच्छ करायला हवे. नखांच्या खाली क्युटिकल्स वाढल्यामुळे अथवा नखांमध्ये मळ साचल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. शिवाय त्यामुळे तुमची नखं घाणेरडी आणि बेढब दिसतात. यासाठी दररोज अंघोळ करताना नखं स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तुमचा वापरलेला टुथब्रश वापरू शकता.

दागिने स्वच्छ करण्यासाठी

सोन्या चांदीचे दागिने खूप महाग आणि नाजूक असतात. बराच काळ तसेच ठेवल्यामुळे अथवा नियमित अंगावर परिधान केल्यामुळे दागिने काळे पडतात. त्यांच्या बारीक कलाकुसरीमध्ये घाण, धुळ साचून राहते. यासाठी तुम्ही ते नेहमी जुन्या टुथब्रशने स्वच्छ करू शकता. कोमट पाण्यात सौम्य साबण, रिठा  टाका आणि त्यात दागिने बुडवून ठेवा. काही वेळाने तुम्ही ते टुथब्रशच्या मदतीने घासून काढले तर ते पुन्हा लखलखीत होतात.

तुम्ही दररोज करता का जीभ स्वच्छ, फॉलो करा या सोप्या टिप्स

कि बोर्ड स्वच्छ करण्यासाठी

कंम्युटर अथवा लॅपटॉप दिवसभर वापरल्यास बाहेरील वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या कि बोर्डमध्ये धुळ, माती साचून राहते. दर दोन दिवसांनी जर कि बोर्ड स्वच्छ केला तर तो जास्त खराब होणार नाही. कि बोर्डमधील अवघड जागा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरातील जुना टुथब्रश वापरू शकता.

ADVERTISEMENT

हेअर डाय करण्यासाठी

जर तुमचा हेअर डाय ब्रश खराब झाला असेल अथवा नवीन विकत आणण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही यासाठी टुथब्रशचा वापर करू शकता. पाठीमागील आणि कानाजवळी छोटे छोटे केस तुम्ही आरामात या ब्रशने रंगवू शकता.  

08 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT