ADVERTISEMENT
home / मनोरंजन
dimpy-ganguly-and-hubby-rohit-welcome-their-third-baby-a-boy-first-pic-reveal-in-marathi

डिंपी गांगुली झाली तिसऱ्यांदा आई, मुलाच्या जन्मानंतर भावुक पोस्ट

राहुल महाजनची (Rahul Mahajan) पूर्व पत्नी आणि बिग बॉसची (Bigg Boss) माजी स्पर्धक डिंपी गांगुली (Dimpy Ganguly) पुन्हा एकदा आई झाली आहे. आपल्या सोशल मीडियावरून डिंपीने गोंडस मुलाला जन्म दिल्याचे सांगितले आहे आणि याशिवाय आपल्या बाळाचा जन्म हा कसा झाला याची भावुक पोस्टही केली आहे. तर 27 जुलैला आपला मुलगा अर्थात रिशान गांगुली रॉय याचा जन्म झाल्याचे डिंपीने अगदी आनंदाने सांगितलं आहे. यापूर्वी डिंपीला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि दुबईस्थित डिंपीला पुन्हा एकदा मुलगा झाला आहे. डिंपीने दुबईतील प्रसिद्ध उद्योगपती रोहित रॉय (Rohit Roy) याच्याशी लग्न केले असून तिला मुलगी रियाना (Riyana) आणि मुलगा आर्यन (Aaryan) अशी दोन मुलं आहेत आणि आता तिसरा मुलगा रिशानच्या येण्याने आपण अधिक आनंदी झाल्याचेही डिंपीने सांगितले आहे. 

बाळाच्या जन्मानंतर डिंपी झाली भावुक

डिंपीने रिशानला जन्म दिल्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. डिंपीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, ‘आपण हे करून दाखवलं! अत्यंत नैसर्गिक असा कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय झालेला वॉटर बर्थ. आतापर्यंतचा हा माझ्या आयुष्यातील सर्वात जागृत, सशक्त तरीही अत्यंत नम्र आणि तितकाच आव्हानात्मक असा अनुभव होता. मी तुम्हाला आता हे डोळे झाकून सांगू शकते की आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेली सर्वात आश्चर्यकारक भेट म्हणजे निरोगी शरीर. आपण आपल्या शरीरावर विश्वास ठेवला आणि आदर केला तर नक्कीच चमत्कार घडू शकतात! याआधीही माझ्या दोन मुलांचे जन्म हे अत्यंत नैसर्गिक होते , पण मला कधीच असं वाटलं नाही की, कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय हे घडू शकते. तथापि मला याची अजिबातच कल्पना नव्हती की, तुमच्या मनाची शक्ती तुमच्या बाळाला एकट्यानेही जन्म देण्यासाठी इतकी सामर्थ्यशील ठरते. आमच्या मुलाला सुरक्षितपणे या जगात आणल्याबद्दल बर्थिंग टीमचे आभार मानावे तितके कमी आहेत. या अनुभवाने माझे आयुष्य पूर्णतः बदलून गेले आहे आणि अत्यंत उत्तम आणि कायम पाठिंबा देणारा असा जोडीदार मला लाभला आहे, यापेक्षा अधिक मी काहीच मागितले नव्हते. बाबांनी खूपच जास्त प्रेम आम्हाला दिले. तुझ्याशिवाय मी करूच शकले नसते. आम्ही आमच्या या लहानशा बाळाच्या खूपच जास्त प्रेमात आहोत…ओळख करून देत आहोत…रिशान गांगुली रॉय 27.07.2022 ’ तर तिने आपल्या सोशल मीडिया स्टोरीमध्ये आपली दोन्ही मुलं नव्या भावाला पहिल्यांदा भेटताना किती उत्सुक आहेत याचाही फोटो पोस्ट केला आहे. मात्र बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. 

डिंपी कोण आहे?

डिंपी गांगुलीने एका रियालिटी शो मध्ये सहभागी होत अभिनेता राहुल महाजन याच्यासह लग्न केले होते. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. राहुल महाजनवर आपल्याला मारत असल्याचा आणि त्रास देत असल्याचा आरोप करत तिने त्याच्यासह घटस्फोट घेतला. मात्र 2015 मध्ये डिंपीने दुबईतील प्रसिद्ध उद्योगपती रोहित रॉय याच्याशी लग्न केले. डिंपी सध्या मनोरंजनाच्या झगमगत्या दुनियेपासून दूर असली तरीही आपल्या चाहत्यांशी ती सोशल मीडियाद्वारे जोडलेली राहते. डिंपीच्या बाळाच्या जन्मानंतर अनेकांनी कमेंट्स केल्या असून तिचे अभिनंदन केले आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
28 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT