home / मनोरंजन
स्वप्नील जोशी नव्या भूमिकेत

स्वप्नील जोशी दिसणार नव्या भूमिकेत, ‘अश्वत्थ’ चित्रपटाची घोषणा

चित्रपटांचा आता कुठे आनंद थिएटरमध्ये जाऊन घेता येतोय. त्यामुळे चित्रपटांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपटांचीही या काळात चांगलीच कमाई झाली आहे. आता त्यामध्ये आणखी एका चित्रपटाची भर लवकरच पडणार आहे. कारण या नव्या वर्षात मराठीतील सगळ्यात आवडीचा स्टार, चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अश्वत्थ’ २०२२ च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार असून स्वप्नील जोशीने या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

 भगवत गीतेशी संबंध

‘अश्वत्थ’चा टीझर भगवत गीतेतील एका लोकप्रिय अशा श्लोकाच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. संस्कृतमधील या श्लोकाचा अर्थ असा –जेव्हा मनुष्य योगारूढ होतो तेव्हा तो आपला उद्धार स्वतःच करतो आणि स्वतःच आत्मबलाच्या सामर्थ्यावर ऊंची गाठतो. त्याने आपल्या आत्म्याचे अधःपतन होवू देता कामा नये. मनुष्य स्वतःच स्वतःचा बंधू असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो.चौखूर उधळलेल्या घोड्याच्या पृष्ठभूमीवर सादर होणाऱ्या या श्लोकानंतर टीझरमध्ये मराठी शब्द उधृत होतात. ते आहेत, “मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो तो अश्वत्थ.” या टीझरच्या माध्यमातून चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक या चित्रपटाच्या एकूण कथेबद्दल उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे.

जीव लावणारं कुणी असलं तर, होतोच आपण प्रेमात लागिरं

लोकेश गुप्ते यांचा आणखी एक प्रयत्न

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक लोकेश गुप्तेने याने केले आहे. वेगवेगळ्या विषयांना धरुन त्यांनी आतापर्यंत चित्रपटांचे दिग्दर्शन केलेेले आहे.  एबी आणि सीडी, एक सांगायचंय,ऋुणानुबंध, डेटभेट आणि मुंगळा यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनी निर्माण केले आहे आणि आता या नव्या चित्रपटामुळे त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे . टीझरमध्ये मकरंद देशपांडेचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे यात मकरंदसुद्धा आहे का, याबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. चित्रपटासाठी थोडी जास्त वाट पाहावी लागणार आहे. कारण या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. 

स्वप्नील एक उत्तम कलाकार

विविध प्रयोग करत स्वतःच्या सशक्त अभिनयाने चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांच्या माध्यमातून आज स्वप्नील जोशी घराघरात पोहोचला आहे. ‘रामायण’, ‘कृष्ण’, ‘हद कर दी’, ‘दिल विल प्यार’, ‘तू तू मैं मैं या गाजलेल्या मालिकांपासून दुनियादारी, मोगरा फुलला, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे अगणित गाजलेले चित्रपट स्वप्नीलच्या नावावर आहेत. अलीकडेच आलेल्या ‘समांतर’ या वेबसिरीजमध्ये स्वप्नीलची प्रमुख भूमिका होती आणि तिचे दोन्ही सिझन गाजले होते. या पार्श्वभूमीवर स्वप्नीलच्या या नवीन चित्रपटाबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.

 दरम्यान, तुम्ही याचा ट्रेलर पाहिला नसेल तर नक्की बघा.

कोणाच्या आठवणीने व्याकूळ झाली सारा अली खान, शेअर केले फोटो

05 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text