ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘लय भारी’ निशिकांत कामतचे निधन, रितेशने केले ट्विट

‘लय भारी’ निशिकांत कामतचे निधन, रितेशने केले ट्विट

पाच दिवसांपूर्वी हैदराबादमधील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलेले चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामतचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. आज सकाळपासूनच आधी अफवा पसरली. त्यानंतर रितेश देशमुखने निशिकांत अजूनही मृत्यूशी झुंज असल्याचे ट्विट केले. मात्र आता पुन्हा रितेशने ट्विट करून आपण मित्र गमावला असल्याचे सांगितले. पाच दिवसांपूर्वी हैदराबादमधील गचीबोवलीमधील एआयजी रूग्णालयात क्रॉनिक लिव्हर डिसिझ आणि अन्य संक्रमणांमुळे निशिकांची प्रकृती खालावली असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असली तरीही स्थिर आहे असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.  निशिकांत लवकरच बरे होतील अशी आशा रुग्णालयातील डॉक्टरांनीही व्यक्त केली होती. सकाळपासूनच निशिकांतची कामत गेल्याच्या अफवा पसरल्या आणि  त्यामुळे सगळीकडे एकच बातमीने धुमाकूळ घातला. पण आता निशिकांतची ही झुंज अपयशी ठरली असल्याचे समजत आहे. 

यकृतासंबंधित आजाराने ग्रस्त

लिव्हर सिरोसिसमुळे निशिकांत कामत यांची तब्बेत खालावली. गेल्या कित्येक दिवसांपासून निशिकांत यकृतासंबंधित या आजाराने ग्रस्त आहेत. अचानक तब्बेत खालावल्याने हैदराबादच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पाच दिवसांपासून निशिकांतचा जीव वाचविण्यासाठी गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट, हेपेलॉजिस्ट आणि इतर डॉक्टरांनीही अनेक प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. आधी निशिकांतच्या प्रकृतीकडून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरीही नंतर मात्र निशिकांतची तब्बेत खालावत गेली अखेर निशिकांतची प्राणज्योत मालावली.

अखेर बॉलीवूडच्या या सेलिब्रिटी जोडीने घेतला घटस्फोट, मुलाला दोघंही सांभाळणार

‘दृष्यम’ सारख्या दर्जेदार चित्रपटांचे केले होते दिग्दर्शन

निशिकांत कामत हे नाव चित्रपटसृष्टीला नक्कीच नवं नाही. ‘मुंबई मेरी जान’, ‘दृष्यम’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ अशा एकाहून एक तुफान यश मिळवलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन निशिकांत काम यांनी केले. 2005 मध्ये  ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटासह दणक्यात चित्रपटसृष्टीत पदार्पण करून निशिकांतने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. इतकंच नाही तर 2006 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निशिकांत कामतच नाव आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला जॉन अब्राहमचा रॉकी हँडसम या चित्रपटात निशिकांतने नकारात्मक भूमिकाही साकारली आहे. त्याशिवाय भावेश जोशी सुपरहिरो, फुगे और ज्युली 2 या चित्रपटातही त्यांनी काम केले . सध्या निशिकांत ‘दरबदर’ या चित्रपटावर काम करत होते, हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार होता. आता निशिकांत बरं होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत. बऱ्याच जणांनी या अफवेमुळे निशिकांतला श्रद्धांजली देखील वाहिलेली सोशल मीडियावर दिसून आले. मात्र अजूनही निशिकांत लढा देत असल्याचे आता समोर आले आहे. पण आता खरंच निशिकांत आपल्यात नसल्याचं समोर आलं आहे. 

ADVERTISEMENT

Good News: अभिनेत्री पूजा बॅनर्जी होणार आई, लॉकडाऊनमध्येच केलं लग्न

चित्रपटसृष्टीवर शोककळा

निशिकांत कामतची मूर्ती लहान पण किर्ती महान अशी ख्याती आहे. कमी बोलणारा पण आपल्या कामातून व्यक्त होणारा असा दिग्दर्शक चित्रपटसृष्टीमध्ये आहे. यावर्षी चित्रपटसृष्टीवर अनेक संकटं आली असून आता निशिकांतच्या जाण्याच्या अफवेने सगळीकडेच हाहाःकार माजला आहे. आपल्या दिग्दर्शनाने अनेकांचं लक्ष निशिकांतने वेधून घेतलं होतं. केवळ दिग्दर्शनच नाही तर अभिनयातही निशिकांतने ठसा उमटविला होता. त्यामुळे निशिकांतचं नाव माहीत नाही असा एकही मराठी माणूस नसेल. खुर्चीला खिळवून ठेवणारा असा ‘लय भारी’ आणि ‘डोंबिवली फास्ट’ चित्रपट निशिकांतने दिग्दर्शित केला. 

श्वेता तिवारी- अभिनव कोहली वाद, मुलाला अखेर भेटण्याची दिली परवानगी

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा   

ADVERTISEMENT

 

17 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT