बॉलीवूडसाठी 2020 हे वर्ष अतिशयच कठीण असल्याचं दिसून येत आहे. मोठ्या मोठ्या कलाकारांची लागोपाठ एक्झिट झाली आहे. एका दुःखातून सावरत नाही तोपर्यत दुसऱ्या कोणाच्या तरी मृत्यूची बातमी येत आहे. सध्या कोणता दिवस कसा उजाडेल हे सांगत येत नाही. आता अजून एका अभिनेत्री, मॉडल आणि गायिका असणाऱ्या दिव्या चौकसेच्या निधनाची बातमी आली आहे. दिव्या गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत होती. 29 वर्षीय दिव्याने मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आपल्या जन्मठिकाणीच शेवटचा श्वास घेतला. दिव्याची मावस बहीण सौम्या अमिश वर्माने फेसबुक पोस्ट करून तिच्या निधनाची बातमी दिली. पण तत्पूर्वी मरणाच्या 18 तास आधी दिव्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपली परिस्थिती काय आहे याचा एक मेसेज केला होता. तेव्हाच दिव्याने स्पष्ट केले होते की तिची अवस्था अत्यंत वाईट असून आता ती जास्त वेळ जगू शकणार नाही.
KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल
दिव्याचे शेवटचे शब्द – ‘कृपया काहीही प्रश्न विचारू नका’
दिव्याने मरणापूर्वी साधारण 18 तास आधी आपल्या अकाऊंटवरून इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. त्यामध्ये तिने आपले शेवटचे शब्द लिहिले. ‘मी जे काही सांगणार आहे त्यासाठी शब्द नक्कीच पुरणार नाही. कितीही शब्द असले तरीही आता ते अपुरेच पडत आहेत. मला गायब होऊन महिने लोटले आहेत आणि अनेक मेसेज येत आहेत. पण आता ती वेळ आली आहे की मी तुम्हा सर्वांना सांगेन की माझा मृत्यू जवळ आला आहे. हा हे खरं आहे, मात्र मी कणखर आहे. या आयुष्यासाठी ज्यात संघर्ष नाही, त्यामुळे मला कोणतेही प्रश्न विचारू नका. केवळ देवाला माहीत आहे की तुम्ही सर्व माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात.’ मात्र त्यानंतर दिव्याची प्राणज्योत मालवली. वयाची तिशीही न गाठलेल्या दिव्याला कॅन्सरमुळे आपले प्राण गमवावे लागले. कॅन्सरशी देत असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
अभिनेत्री अंजुम फकिहने दिली प्रेमाची कबुली ‘हा’ आहे नवा क्रश
insta screenshot
दिव्याची कारकीर्द
दिव्या 2011 मध्ये मिस युनिव्हर्स या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये तिने ‘है अपना दिल तो आवारा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 2018 मध्ये दिव्याने पटियाले दी क्वीन या गाण्यातून गाण्याच्या क्षेत्रात पदार्पण केले. दिव्याच्या निधनानंतर तिच्याबरोबर काम केलेल्या अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यामध्ये साहील अहमद, अंजुम फाकीह, निहारिका रायजादा यांचा समावेश आहे. दिव्या ही मूळची भोपाळमधील असून तिचा जन्म हा वकिली कुटुंबीय असणाऱ्या घरात झाला होता. भोपाळमध्ये तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले तर दिल्लीतून पदवी प्राप्त केली होती. तसंच तिने लंडनमधील बेडफोर्डशायन युनिव्हर्सिटीमधून अभिनयाचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. मात्र तिला जास्त प्रसिद्धी मिळू शकली नाही. पण दिव्या सोशल मीडिया इन्फ्लुअर होती. त्यामुळे तिला फॅन फॉलोईंगही भरपूर होता. ती केवळ अभ्यासातच हुशार नव्हती तर तिला डान्स आणि अभिनयात असणाऱ्या गोडीमुळेच तिने अभिनयामध्ये करिअर करायचं ठरवलं होतं. मात्र कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने तिला ग्रासले आणि तिची लहान वयातच कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.
कधी काळी या 5 चित्रपटांना दिला होता ऋतिक रोशनने नकार