ADVERTISEMENT
home / मनोरंजन
दिव्यांका त्रिपाठी

लठ्ठपणावरुन सतत बोलणाऱ्यांची दिव्यांकाने केली बोलती बंद

 अभिनेत्री म्हटली की, तिची फिगर कशी असावी हे प्रेक्षक ठरवतात. त्यामुळे अनेकदा पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्रींनाही आपल्या दिसण्याचे दडपण येते. इतर कोणत्याही सामान्य स्त्रीप्रमाणे त्यांच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. त्यांनाही अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कधी कधी त्यांचेही वजन कमी होते किंवा वाढते. त्यांच्याही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्याही कधी कधी खराब दिसतात. म्हणून त्यांना ट्रोल करणे हे फार चुकीचे आहे. केवळ सोशल मीडियावर त्या आहेत म्हणून त्यांना कसेही कमेंट करायला खूप जणांना आवडत असेल. अशांसाठी दिव्यांका त्रिपाठीची (Divyanka Tripathi) पोस्ट खूप महत्वाची आहे. तिच्या लठ्ठपणावरुन तिला सतत ट्रोल करणाऱ्यांना तिने चांगलेच उत्तर दिले आहे. आणि तिने तिचा एक मुक्त डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

तुमची मानसिकता बदला

 दिव्यांकाने तिचा डान्स व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावर अनेक वाईट कमेटं होत्या. तिचा पोटाचा घेर वाढलेला आहे. तू जाड दिसत आहेस. अशा काही कमेंट वाचून तिने याचे कॅप्शन एडिट केले आहे. तिने त्यात म्हटले आहे. 

अनेकांच्या कमेंट वाचून मला माझी ही पोस्ट डिलीट करायची इच्छा होत होती. पण मी असे केले नाही. हो, माझे पोट तुम्ही ठरवलेल्या आदर्श महिलेसारखे सपाट नाही. मी प्रेग्नंट नाही. मी जाड नाही. पहिल्या वेळी मला हा व्हिडिओ डिलीट करण्याची खूप इच्छा झाली. पण मी तसे केले नाही. तुम्हाला जर वाटत असेल एखादी व्यक्ती कशी हवी तर त्या आधी तुम्ही तुमची मानसिकता बदला. 

मी जाड नाही तरी देखील मला अशा कमेंट्सना सामोरे जावे लागते. मला याचे अधिक वाईट वाटते की, ज्यांचे वजन खरंच जास्त आहे त्यांना तुम्ही अशाच वाईट कमेंट करुन हैराण करत असाल. लाज वाटायला हवी जे असे कमेंट्स करतात. 

ADVERTISEMENT

इतकेच नाही तर दिव्यांकाने त्या सगळ्यांना ब्लाॅक देखील केले आहे. जर तुम्हाला अशा काही कमेंट्स दिसल्या तर ज्या जितक्या वाईट आहे त्यांच्याहून अधिक मी वाईट आहे हे विसरु नका. 

आहे एकदम बिनधास्त

सासबहू मालिकांमधून दिव्यांका जरी दिसली असली तरी देखील ती एकदम बिनधास्त आहे हे तिने खतरों के खिलाडीमधून दाखवून दिले होते. खतरों के खिलाडीमध्येही तिने आपले स्किल दाखवले होते. तिने अगदी बिनधास्त या खेळात अनेक टास्क केले होते. तिचे कौतुक रोहित शेट्टीने देखील केले होते. त्यामुळे तिच्या आयुष्यात ती बिनधास्त असणे स्वाभाविक आहे. आता तिने ही जी पोस्ट केली आहे. त्यामुळे तिचा बिनधास्तपणा चांगला दिसून येतो. 

दिव्यांका असते ॲक्टिव्ह

दिव्यांका ही हॅपी गो लकी गर्ल आहे हे तिच्या पोस्टवरुन चांगलेच दिसून येत आहे. कारण ती तिच्या आयुष्यातील खास क्षण ती तिच्या पोस्टमधून शेअर करत असते. त्यामुळे तिचा चाहता वर्गही चांगला आहे. तिच्या फोटोला लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात. पण तिचे लग्न झाल्यापासून तिच्यात झालेले बदल अनेकांनी खूप चुकीच्या पद्धतीने घेऊन तिला ट्रोल केले आहे. 

त्यामुळे दिव्यांकाने योग्य वेळी अशांना उत्तर देणे गरजेचे होते आणि तिने ते केले आहे. त्यामुळे तिला अनेकांनी सपोर्ट केला आहे.

ADVERTISEMENT
27 Jul 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT