दिवाळी हा सण सगळ्यांसाठीच खास असतो. गिफ्टचा वर्षाव, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, दिवाळीचा फराळ आणि सगळ्यांना भेटून मजा करणे हे खासच असते. लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा यासारखे दिवस आपल्याला अधिक जवळ आणतात. तसंच ओल्या नारळाच्या करंज्या, चिवडा, खुसखुशीत शंकरपाळे, चकलीची भाजणी घेऊन चकलीची रेसिपी तयार करण्याचा खास बेत हे सर्वच खास असते. यावर्षी दिवाळीला एकमेकांना काय गिफ्ट्स द्यायचे असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुमची दिवाळी अधिक स्टायलिश आणि आकर्षक करण्यासाठी यावर्षी स्पेशल गिफ्ट्स तुम्ही आपल्या भावाबहिणीला नक्कीच देऊ शकता. तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी अथवा पाडव्याला खास नवरा – बायकोच्या नात्यासाठीही या गिफ्ट्सचा वापर करता येऊ शकतो. या दिवाळीच्या शुभेच्छा देताना द्या काही खास गिफ्ट्स!
हिरा है सदा के लिए!
भाऊबीज अथवा पाडव्याच्या दिवशी हिऱ्याचे दागिने गिफ्ट म्हणून मिळाले तर कोणाला आवडणार नाहीत? असा माणूस विरळाच असेल अगदी लहानशी अंगठी जरी असेल तरी नक्कीच तुमचा आनंद गगनात मावणार नाही. तुम्हीही यावर्षी तुमच्या बहिणीला, आईला अथवा बायकोला दिवाळीसाठी काही खास घेणार असाल तर तुम्ही कॅरेटलेनच्या (CaratLane) ब्लूम फेस्टिव्हलमधून खरेदी करू शकता. या फेस्टिव्ह सीझनसाठी (Festive Season) पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ घालून दागिने डिझाईन करण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या दागिन्यांचे डिझाईन्स आणि 14कॅरेट सोन्यामध्ये दागिने करून मिळतील. अंगठी, कानातले, पेंडट्स आणि ब्रेसलेट अशा अनेक डिझाईन्सचा यामध्ये समावेश आहे. साधारण 13 हजारापासून याची रेंज सुरू होते. त्यामुळे तुम्हाला खिशाला परवडतील आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचे मनाला भावतील असे दागिने नक्कीच मिळतील.
वाराणसीच्या कलाकुसरीचे सांस्कृतिक दागिने
धनत्रयोदयी म्हटलं की आपल्याला यादिवशी नक्कीच सोन्याचे दागिने अगदी पूर्वपरंपरागत घेण्यासाठी दुकानात जाण्याची सवय असते. पण सध्या वाढलेले सोन्याचे भाव पाहता नक्कीच बोबडी वळते. पण तुम्हाला यावर्षी सोन्याचे दागिने घ्यायचे असतील आणि काही गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही रिलायन्सच्या (Reliance Jewellery) कास्यम कलेक्शनचा (Kaasyam Collection) नक्कीच भाग होऊ शकता. वाराणसीच्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मंदिर, वास्तुशास्त्रावरून प्रेरित होऊन या दागिन्यांचे डिझाईन्स करण्यात आले आहे. काशी विश्वनाथ दुर्गा कुंद मंदिर, रत्नेश माधव मंदिर, रामनगर किल्ला, तुलसी घाट, बनारसी साडी या सगळ्या डिझाईन्सचा वापर करून हे कलेक्शन करण्यात आले आहे. तुम्हाला यावर्षी वेगळ्या दागिन्यांसाठी घडणावळ करायची असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
भावासाठी घड्याळाचा उत्तम पर्याय
आपला भाऊ हा आपल्यासाठी नेहमीच खास असतो. त्याला जर यावर्षी काही खास आणि लक्झरीयस (luxurious) गिफ्ट तुम्हाला द्यायचे असेल तर तुमच्यासाठी Tata CLiQ Luxury मधील रॅडोचे घड्याळ (Rado – HyperChrome Chronograph Watch for Men) हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. नव्या टेक्निक आणि पद्धतीचे आणि तितकेच स्टायलिश असे हे घड्याळ नक्कीच तुमच्या भावाच्या मनगटावर शोभून दिसेल. तुम्हाला अगदी पाडव्यासाठी आपल्या नवऱ्याला काही खास द्यायचं असेल तर तुम्ही याचा नक्कीच विचार करू शकता. तुम्ही यावर्षी काही खास बजेट अथवा सेव्हिंग्ज केले असतील तर हा उत्तम पर्याय आहे.
धनत्रयोदशीची #ShubhShruwat
धनत्रयोदशीला धन अर्थात दागिन्यांचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दिवाळी सुरू होते आणि अनेक जण गिफ्टिंगसाठी सोन्याची खरेदी करतात. या धनत्रयोदशीसाठी दस्सानी ब्रदर्सचे शुभशुरवात हे नवे कलेक्शन आले आहे. हिरे, सोने आणि रंगीत खड्यांचे एथनिक आणि ट्रेंडी असे हे कलेक्शन असून यामध्ये कुंदन आणि मोत्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. तुम्हाला रॉयल दागिन्यांची आवड असेल तर तुम्ही दिवाळीसाठी याची खरेदी करू शकता. तुमच्या बहिणीला, बायकोला अथवा आईला गिफ्ट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. लाल, हिरवा, निळा, पिवळा आणि गुलाबी या पाच रंगाच्या खड्यांमध्येही दागिने उपलब्ध होतील.
सौंदर्य आहे महत्त्वाचे
दिवाळीमध्ये सुंदर दिसणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुगंधी उटणे आपण दिवाळीमध्ये अंगाला आणि चेहऱ्याला लावतो. उटणे लावण्याचे फायदेही आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या बहिणीला अथवा तुमच्या पत्नीला शरीराचे अधिक चांगले पोषण व्हावे यासाठी L’Occitane चे स्पेशल गिफ्ट हँपरदेखील देऊ शकतका. Tata CLiQ Luxury मधून तुम्हाला हे गिफ्ट सेट नक्कीच विकत घेता येईल. यामध्ये अलमंड शॉवर ऑईल, बदामाचा स्क्रब, बदामाचे तेल, अलमंड मिल्क कॉन्सन्ट्रेट, अलमंड शँपू आणि अलमंड कंडिशनरचा समावेश आहे. यामुळे त्वचा अधिक चांगली राखण्यास मदत मिळते आणि तुमची बहीण आणि बायको नक्कीच या गिफ्टमुळे अधिक आनंदी होईल.
या अशा विविध गिफ्ट्सने करा तुमची दिवाळी अधिक खास आणि आकर्षक! दिवाळीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक