ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
diwali-fashion-2021

दिवाळीचा लुक अधिक सुंदर करण्यासाठी 5 टिप्स

‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ म्हणत सर्वांनीच आपल्या घरी दिवाळीची तयारी सुरू केली असणार. दिवाळी म्हटलं की दिव्यांची रोषणाई, नातेवाईकांचे येणेजाणे, नवीन कपडे आणि बरंच काही. दिवाळीमध्ये प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. अंगाला दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुगंधी उटणे लाऊन एकमेकांच्या घरी दिवाळीचा फराळ करायला जाणे आणि दिवाळीच्या शुभेच्छा देणं यामध्ये काही वेगळीच मजा आहे. दिवाळीची माहिती सर्वांनाच असते.  दिवाळीच्या दिवशी तुम्हालाही फॅशनेबल आणि स्टायलिश दिसायचे असेल तर काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुम्हीही दिवाळीच्या दिवशी या टिप्सचा वापर करा आणि दिसा अधिक आकर्षक!

दिवाळीसाठी परफेक्ट आऊटफिट 

दिवाळीमध्ये अधिकांश लोक हे पारंपरिक आणि एथनिक कपड्यांची निवड करतात. तुम्ही दिवाळीसाठी साडी नेसू शकता. तुम्हाला साडीमुळे ग्लॅमरस आणि स्टायलिश लुक मिळतो. दिवाळी सणाला तुम्हाला जर सुंदर आणि आकर्षक कुल हवा असेल तर त्यासाठी रफल साडी, नेट साडी अथवा खणाच्या साडीसारखे चांगले आणि वेगळे पर्यायही तुमच्याकडे उपलब्ध आहेत. तसंच तुम्ही दिवाळीला इंडोवेस्टर्न साडीचा पर्यायही निवडू शकता. तुम्हाला अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्येही याचा लाभ घेता येईल.

हे रंग वापरा 

Instagram

फेस्टिव्ह सीझन आणि विशेषतः दिवाळी आहे तर गडद रंग वापरायला हवेत. पिवळा, लाल आणि भगव्या रंगाचे कपडे या सणाला अधिक उठावदार दिसतात. तसंच दिवाळीच्या वेळी हे रंग शुभदेखील मानले जातात. या रंगामुळे तुमचा लुक अधिक सुंदर दिसून येतो. तसंच तुम्ही गडद निळा, हिरवा या रंगाचाही वापर करू शकता. या गडद रंगांमुळे अधिक आकर्षक दिसता येते. या रंगांमुळे दिवाळीच्या सणाला अधिक गहरा रंग चढतो. 

हेअर स्टाईल 

फेस्टिव्ह सीझनमध्ये कपड्यांसह तुमची हेअरस्टाईलदेखील तितकीच महत्त्वाची आहे. एथनिक लुकसाठी महिला आपल्या हेअरस्टाईलवरदेखील लक्ष देतात. तुम्हाला घरच्या घरीदेखील दिवाळीसाठी काही खास हेअरस्टाईल्स करता येतील. तुमची साधीशी हेअरस्टाईलदेखील तुमचा लुक अधिक आकर्षक करू शकते. दिवाळी पूजा अर्थात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही मेस्सी पोनी अथवा ओपन वेव्ह हेअरस्टाईल करून तुमचा लुक अधिक सुंदर करू शकता. 

ADVERTISEMENT

मेकअप 

कोणत्याही महिलेच्या सौंदर्यात मेकअप नेहमीच चार चांद लावतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. तुम्ही सध्या POPxo मेकअप कलेक्शनमधील मिनी लिपस्टिक्सचा वापरदेखील यासाठी करू शकता. सध्या मिनिमल मेकअप लुक अधिक ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे स्टनिंग लुक मिळविण्यासाठी तुम्ही या दिवाळीला बीबी क्रिम, ब्लशर, काजळ, मस्कारा आणि न्यूड लिपस्टिक्सचा वापर करू शकता.

दागिने 

एथनिक कपड्यांसह तुम्ही पारंपरिक अथवा तुम्हाला आवडतील असे ऑक्सिडाईज्ड दागिनेही वापरू शकता. तुम्ही तुमच्या कपड्यांप्रमाणे दागिन्यांची निवड करा. शरारा वापरणार असाल तर जड झुमक्यांचा वापर करा. साडी वापरणार असाल तर त्यासह चोकर नेकपिसची स्टाईल कॅरी करा. इंडोवेस्टर्न साडी असेल तर मोठे कानातले घाला. 

वर दिलेल्या पाच टिप्सचा वापर करून तुम्हीही तुमची दिवाळी अधिक स्टायलिश आणि आकर्षक करा. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT