ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
शुद्ध तुपापासून बनवा मॉईस्चराईझिंग क्रीम, राखा त्वचेची निगा

शुद्ध तुपापासून बनवा मॉईस्चराईझिंग क्रीम, राखा त्वचेची निगा

त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी स्किन केअर रूटिन फॉलो करणं गरजेचं आहे. कारण स्किन केअरमुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते. स्किन केअर साठी विविध प्रकारची उत्पादने सध्या बाजारात मिळतात. मात्र तुम्हाला त्वचेसाठी नैसर्गिक उपाय करायचे असतील तर तुम्ही घरीच स्किन केअरसाठी प्रॉडक्ट तयार करू शकता. शुद्ध तुपापासून तुम्हाला छान मॉईस्चराझिंग क्रीम बनवता येईल. कारण असे होममेड क्रीम वापरले तर तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होऊ शकतं. यासाठी जाणून घ्या त्वचेची निगा राखण्यासाठी घरीच तुपापासून हे क्रीम कसं बनवावं

तुपापासून बनवा मॉईस्चराझिंग क्रीम

तूपाचा वापर स्वयंपाकात नेहमीच केला जातो. तूप खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं यासाठी जाणून घ्या तूप खाण्याचे फायदे जाणून घ्या (Tup Khanyache Fayde) तुपामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेलाही नैसर्गिक चमक आणि मऊपणा मिळतो. सौंदर्य वाढविण्यासाठी चेहऱ्याला तूप लावण्याचे अनेक फायदे (Benefits Of Ghee For Skin In Marathi) आहेत. तुपापासून बनवावं क्रीम बनवून तुम्ही त्वचेची निगा राखू शकता. अभिनेत्री श्वेता कवात्रा हिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर या क्रिमची एक सोपी रेसिपी शेअर केली आहे. जी तिला डॉक्टर रेखाने सांगितली होती.

साहित्य –

  • शुद्ध तूप दोन चमचे
  • थंड पाणी 
  • कोणतंही इसेंशिअल ऑईल
  • काचेची डबी

कसं तयार कराल

  • एका भांड्यात घट्ट तूप घ्या आणि त्यात थेंब थेंब पाणी टाकत चांगलं फेटून घ्या.
  • तुप इतकावेळ फेटा की त्यातून छान क्रीम तयार होईल.
  • क्रीमचं टेक्चर तयार झालं की त्यात इसेंशिअल ऑईलचे काही थेंब टाका.
  • एका छोट्या काचेच्या डबीत क्रीम भरून ठेवा.

तुपाचे त्वचेवर होणारे फायदे

तुपामध्ये अनेक चांगले पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. तुपामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिड त्वचेसाठी पोषक ठरतात. तुपामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. त्वचेमधील कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळते आणि तुम्ही अधिक तरूण दिसू लागता. तुपामध्ये अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. त्वचेची इलास्टिसिटी वाढते ज्यामुळे त्वचा सैल पडत नाही. सनबर्नपासून त्वचेचं संरक्षण होतं आणि त्वचेचा दाह कमी होतो. यासाठी तुम्ही घरच्या घरी तयार होणारं हे क्रीम नक्कीच त्वचेसाठी वापरायला हवं. यासोबतच यंदा हिवाळ्यात ट्राय करा या बेस्ट कोल्ड क्रिम (Best Cold Creams For Face In Marathi)

16 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT