ADVERTISEMENT
home / Care
DIY Hacks: जाणून घ्या आपल्या केसांसाठी फर्मेंटेड राईस वॉटर वापरण्याचे फायदे

DIY Hacks: जाणून घ्या आपल्या केसांसाठी फर्मेंटेड राईस वॉटर वापरण्याचे फायदे

आपण आपल्या जेवणापासून जर तांदळाचे पाणी वाचविले तर आपल्या सौंदर्य उपचारांसाठी ते कामाला येऊ शकते का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो आणि त्याचे उत्तर होय असे आहे. पण हे नक्की कसे शक्य झाले याची एक लहानशी गंमत आहे. ती तुम्ही सर्वप्रथम ऐकायला हवी.

चीनचा प्राचीन गाव हुआंगलुओ, जे “लॉंग हेअर व्हिलेज” म्हणून देखील ओळखले जाते कारण गुआंग्शीच्या या स्वायत्त प्रदेशातील याओपासून महिलांना त्यांच्या लांब, काळ्या आणि चमकदार केसांसाठी ओळखले जाते. या भागातील बहुतेक महिलांचे केस 1.4 मीटरपेक्षा जास्त लांब आहे. आता आपण आश्चर्यचकित व्हाल की या महिला कोणत्या शँपू, कंडिशनर किंवा हेअर मास्क वापरत आहेत. पण प्रत्यक्षात ते फक्त फर्मेंटेड राईस वॉटर आहे. होय हे खरं आहे! याओमधील महिला वर्षानुवर्षांपासून आपल्या केसांवर तांदळाचे पाणी लावत आहेत. असे दिसून आले आहे की तांदूळ शिजवल्यानंतर आपण जे व्हाईट लिक्विड काढून टाकून टाकतो ते आपल्या केसांसाठी लाभदायक आहे. याबाबत आम्ही सरीना आचार्य, आर्टिस्टिक हेड – हेअर, Enrich यांच्याकडून अधिक जाणून घेतले. 

कसे वापरावे फर्मेंटेड राईस वॉटर (How to use fermented rice water)

कसे वापरावे फर्मेंटेड राईस वॉटर (How to use fermented rice water)

Freepik

ADVERTISEMENT

आपल्याला आवश्यक आहे: 

1 कप तांदूळ + 1 कप पाणी +1 वाटी आणि पाणी साठवण्यासाठी एक जार.

कसा करावा वापर 

  • घाण किंवा कोणतीही अशुद्धता दूर करण्यासाठी साधारण एक मिनिट तांदूळ चांगल्यापैकी धुवून घ्या. 
  • नंतर एक वाटी घ्या, त्यात आपले स्वच्छ तांदूळ आणि पाणी घाला व चांगले मिसळा. 
  • तांदूळ सुमारे 12-24 तास भिजवून ठेवा आणि नंतर गाळून घ्या. 
  • हे तांदळाला फर्मेंट होण्यास व त्या सर्व अमेझिंग व्हिटॅमिन्स पाण्यात विसर्जित करण्यास मदत करेल. 
  • आता हे राईस वॉटर जारमध्ये साठवण्यास तयार आहे. 
  • हे खराब होण्यापासून टाळण्यासाठी आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

फर्मेंटेड राईस वॉटर वापरण्यासाठी स्टेप्स: (How to use Fermented Rice Water Step by Step)

फर्मेंटेड राईस वॉटर वापरण्यासाठी स्टेप्स: (How to use Fermented Rice Water Step by Step)

ADVERTISEMENT

Freepik

1. आपले टाळू स्वच्छ करण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा.

2. तुम्ही फर्मेंटेड राईस वॉटर आपल्या केसांमधून स्वच्छ धुवा आणि काही मिनिटांसाठी आपल्या टाळूमध्ये हळूवारपणे मालिश करा.

3. फर्मेंटेड राईस वॉटर आपल्या केसांवर आणि टाळूवर 10 मिनिटे तसेच ठेवा.

ADVERTISEMENT

4. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि आपले केस पूर्णपणे स्वच्छ करा.

फर्मेंटेड राईस वॉटर वापरण्याचे फायदे:

तांदळाच्या पाण्यातील INOSITOL खराब झालेल्या केसांमध्ये जाते व केसांना आतून दुरुस्त करते. आपल्या केसांवर तांदळाचे पाणी वापरण्याचे इतर फायदे म्हणजे – 

1. चमकदार आणि सुपर ग्लॉसी स्ट्रँड्स.

2.  केसांमध्ये अजिबात गुंतागुंत होत नाही.

ADVERTISEMENT

3. रंगवलेल्या केसांसाठी ठरते अप्रतिम

4. केसांच्या वाढीस उत्तेजन देण्यात मदत करते

DIY हॅक्स (DIY Hacks)

आता आपण काही पोस्ट वॉश DIY हॅक्स बद्दल बोलूया!! स्वच्छ धुल्यानंतर, आपल्या केसांना हेअर पॅकने ट्रीट करा – कसे कराल ते जाणून घ्या:

1. एक सोपा DIY हेअर पॅक जो कोणीही बनवू शकतो तो म्हणजे केळ्याने. एक पिकलेले केळे घ्या आणि ते मॅश करा. त्यात दोन चमचे मध घाला. केळीतील सिलिका केस अधिक चमकदार बनविण्यास आणि केस मुलायम करण्यास मदत करेल. तर मधात मॉईस्चर टिकवून ठेवण्याचे गुणधर्म असतात. डॅमेज रिपेअर आणि केसांच्या पोषणासाठी हा एक उत्तम उपाय आहे. आपल्या फ्रिजमध्ये काही घटक उपलब्ध होतातच. घरी उत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी काही अन्य DIY हॅक्स म्हणजे दही, मध आणि ऑलिव्ह ऑईल. हे सामान्य घटक केसाचे पोषण करण्यासाठी, केसांची दुरुस्ती करण्यासाठी आणि कंडिशन करण्यासाठी लावले जाऊ शकतात.

ADVERTISEMENT

2. केसांमध्ये कोणतेही उरलेले उत्पादनाचे बिल्ड-अप तर नाही याची खात्री करण्यासाठी आपण मास्क वापरल्यानंतर नेहमी आपल्या केसांना शॅंपू आणि कंडिशन करा.

3. स्ट्रँड्सद्वारे मास्क लावल्यानंतर केस विंचरून घ्या. ओले केस हाताळताना नेहमीच रुंद-दात असलेला कंगवा वापरा. आपण ते तसेच सोडण्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी लावले आहे याची खात्री करण्यासाठी मास्कला केसांच्या टोकापर्यंत विंचरा. टोकांवर लक्ष केंद्रित करा कारण ते सर्वात कोरडे असतात. आपल्या केसांचे टोक आपल्या केसांचा सर्वात नाजूक भाग असतात, म्हणून नेहमी आपला मास्क आपल्या केसांच्या टोकाकडे अधिक व्यवस्थित लागला आहे की नाही याची खात्री करून घ्या. 

या सोप्या हॅक्स नक्की ट्राय करा आणि आपल्या केसांची अशीच सोप्या पद्धतीने काळजी घेऊन केस घरच्या घरी अधिक चमकदार करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
11 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT