आपल्या त्वचेचे टेक्स्चर बऱ्याच कारणांनी खराब होते. काही वेळा अनुवंशिकता हे कारण असते. तर काही वेळा आपल्या त्वचेवर प्रदूषणाचा परिणाम होत असतो. तर काही वेळा आपल्या डाएटमुळे त्वचेचे टेक्स्चर खराब होते. त्वचेचे टेक्स्चर बऱ्याच पद्धतीने खराब होते. कोरडी त्वचा, संवेदनशील त्वचा यामुळे चेहऱ्यावर सतत लहान लहान पुळ्या येत राहतात. या पुळ्यांकडे दुर्लक्ष करणं नक्कीच शक्य नाही. यामुळे चेहऱ्यावर खाज येणे आणि इतर त्रास होणे आणि त्वचा अधिक संवेदनशील आणि खराब होते. तुमच्या त्वचेवर लहान लहान पुळ्या येत असतील तर त्याचा उपाय करणे सोपे आहे. आम्ही सांगितलेले DIY वापरून तुम्ही चेहऱ्यावरील पुळ्या कमी करू शकता. जाणून घेऊया हे सोपे DIY खास तुमच्यासाठी. हे वापरून तुम्ही खालील गोष्टींपासून सुटका मिळवू शकता.
- चेहऱ्यावर आलेल्या लहान पुळ्या
- मुरूमं
- व्हाईट हेड्स
- बंद झालेले पोर्स
- ब्लॅक हेड्स
त्वचेचे टेक्स्चर सुधारण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असते त्या सगळ्या गोष्टी या DIY मध्ये आम्ही समाविष्ट केल्या आहेत.
DIY 1 – कडिलिंबाचे टोनर
Shutterstock
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, त्वचेचे टेक्स्चर खराब होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॅक्टेरिया आणि चेहऱ्यावर लहान लहान पुळ्या येण्याची अनेक कारणं असतात. त्यासाठी सर्वात पहिले तुम्ही कडिलिंबाचे टोनर बनवा. हे तुमच्या त्वचेमधून अधिक सीबम कमी करते आणि त्यामुळे बॅक्टेरिया कमी होण्यास मदत मिळते.
साहित्य
- 20-25 कडिलिंबाची पाने
- 2 ग्लास पाणी
एका पॅनमध्ये पाणी घालून कडिलिंबाची पाने उकळून घ्या. हे तोपर्यंत उकळा जोपर्यंत पाणी अर्धे होत नाही. हे पाणी गाळून एका स्प्रे च्या बाटलीमध्ये भरून ठेवा आणि रोज त्याचा वापर टोनर म्हणून करा. यापेक्षा चांगला टोनर तुम्हाला मिळणार नाही. लक्षात ठेवा की, कडिलिंबाच्या पानाशिवाय यामध्ये दुसरे काहीही मिक्स करू नका. तसंच ही पानं तुम्ही व्यवस्थित धुऊन घ्या.
कोरड्या चेहऱ्यावर असतील मुरूमं, तर नक्की ट्राय करा ‘हे’ फेस वॉश (Best Face Wash For Pimples)
DIY 2 – पिलींग
Shutterstock
आता आम्ही जी पद्धत तुम्हाला सांगणार आहोत ती एखाद्या केमिकल पिलींगप्रमाणे आहे. पण हे पूर्ण सुरक्षित आणि ऑर्गेनिक आहे.
साहित्य
- 2 चमचे ऑर्गेनिक दही
- 2 चमचे दूध
- लिंबाचा रस
तुम्हाला साखरेशिवाय असे ऑर्गेनिक दही घ्यायचे आहे. ग्रीक योगर्टदेखील तुम्ही घेऊ शकता. दह्याच्या लॅक्टिक अॅसिडमध्ये लिंबाचे सायट्रिक अॅसिड आपल्याला मिक्स करायचे आहे. या तिन्ही गोष्टी एकत्र करून आपण आपल्या चेहऱ्यावर लावा. एका गोष्टीची काळजी घ्या कोणत्याही परिस्थितीत जर तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीची अलर्जी असेल तर त्याचा वापर करू नका. तुम्ही याचा वापर करून पाहा. हे तुमच्या त्वचेचे टेक्स्चर तर नीट करतेच. त्याशिवाय पिगमेंटेशनदेखील चांगले करते. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, तुमच्या त्वचेचे टेक्स्चर अधिक चांगले होईल आणि चांगला परिणामही दिसून येईल.
मुरूमांसाठी उत्कृष्ट क्रिम्स, वापरून समस्या करा दूर (Best Creams For Pimples In Marathi)
कडिलिंबाच्या टोनरचा वापर नको असल्यास
तुम्हाला जर कडिलिंबाचा टोनर बनवायचा नसेल तर तुम्ही अॅप्पल साईड व्हिनेगरचा वापरही करून घेऊ शकता. कापसावर तुम्ही अॅप्पल साईड व्हिनेगर घ्या आणि आपल्या त्वचेवर लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवा. एका गोष्टीची काळजी नक्की घ्या की, चेहरा धुताना तुम्हाला नेहमी थंड पाण्याचा वापरच करायचा आहे. तसंच तुम्ही तुमच्या त्वचेवर जर कोणतेही केमिकल ट्रीटमेंट केली असेल अथवा त्वचेच्या कोणत्याही समस्येवर तुम्ही उपचार करून घेत असाल तर हे DIY डर्मेटॉलॉजिस्टच्या सल्ल्यानंतरच वापरा.
त्वचेवर उठणारे पुरळ हेदेखील कोरोना संसर्गाचे लक्षण, तज्ज्ञांचे मत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक