ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
diy lavender scrub for body

पार्लरप्रमाणे लव्हेंडर स्क्रब तयार करण्यासाठी या गोष्टींचा करा वापर, जाणून घ्या फायदे

पार्लरमध्ये जाणं तिथे निरनिराळ्या ट्रिटमेंट करणं कोणाला नाही आवडणार…पण बऱ्याचदा वेळ आणि खर्चामुळे सतत पार्लरमध्ये जाणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. अशा वेळी आपण स्वतःच स्वतःची काळजी घ्यायला हवी. दिवसभरात थोडासा वेळ काढून स्वतःचे लाड पुरवायला हवेत. डेली रूटिनमध्ये अंघोळी व्यतिरिक्त नियमित चेहरा,हात, पाय स्वच्छ ठेवले तरी तुम्हाला खूप फ्रेश वाटू शकतं. यासाठी तुमच्याकडे एक छान बॉडी स्क्रब असणं गरजेचं आहे. पार्लरमध्ये वापरण्यात येणारं लव्हेंडर स्क्रब घरीच तयार करायचं असेल तर फॉलो करा या टिप्स

लव्हेंडर बॉडीस्क्रब नेमकं कसं असतं

diy lavender scrub for body

पार्लरमध्ये सध्या मीठ आणि साखर या दोन घटकांपासून बनवण्यात येणारे स्क्रब खूप लोकप्रिय आहेत. कारण त्यामधील खरखरीतपणामुळे तुमची त्वचा लवकर स्वच्छ होते, त्वचेवरील डेडस्कीन निघून जाते. याशिवाय त्वचेला योग्य पोषणही मिळते. त्वचेवरील टॅनिंग जाण्यासाठी आजकाल पार्लरमध्ये या प्रकारचे स्क्रब मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

काय आहे हॉट टॉवेल स्क्रब, जाणून घ्या फायदे

लव्हेंडर स्क्रबचे फायदे

बॉडी स्क्रबमध्ये लव्हेंडर ऑईल आणि आणि सैधव वापरण्यात येतं. सैंधवमध्ये अॅंटि इनफ्लैमटरी घटक असतात. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. त्वचा मॉईस्चराईझ होते. त्वचा मुळापासून स्वच्छ होण्यासाठी आणि त्वचेला टवटवीतपणा येण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. यात लव्हेंडर ऑईलचा वापर केलेला असल्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. शिवाय त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होतात. 

ADVERTISEMENT

कसा बनवाल लव्हेंडर बॉडी स्क्रब

घरच्या घरी लव्हेंडर बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत अवश्य जाणून घ्या.

साहित्य –

  • एक चमचा सैंधव
  • एक चमचा लव्हेंडर पावडर
  • पाच चमचे नारळाचे तेल
  • एक चमचा ऑलिव्ह ऑईल
  • एक चमचा व्हिटॅमिन आईल
  • काही थेंब लव्हेंडर ऑईल
  • एक काचेचे बरणी

कॉफी मास्क आणि स्क्रबने कमी होतात त्वचेच्या आणि केसांच्या या समस्या

बॉडीस्क्रब बनवण्याची पद्धत

ADVERTISEMENT

एका भांड्यात मीठ आणि लव्हेंडरची पावडर मिसळून घ्या. त्यात सर्व प्रकारचे तेल मिक्स करा. सर्व साहित्य एकजीव करा आणि काचेच्या बरणीत भरून ठेवा. 

कसा कराल वापर

लव्हेंडर स्क्रब वापरणं अतिशय सोपं आहे. यासाठी तुम्हाला थोडं स्क्रब हातावर घेऊन अलगद ते  तुमच्या हात पाय अथवा शरीरावरील कोणत्याही भागावर चोळायचं आहे. सक्युर्लर मोशनमध्ये मसाज केल्यास त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. दहा मिनीटांनी तुम्ही साध्या पाण्याने त्वचा धुवू शकता.  विशेष म्हणजे या स्क्रबने मसाज केल्यावर तुमच्या शरीराला छान लव्हेंडर तेलाचा सुंगध आणि चमक येते. 

गव्हाच्या कोंड्यापासून बनवा फेस आणि बॉडी स्क्रब, त्वचा होईल चमकदार

ADVERTISEMENT
13 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT