त्वचेची निगा राखण्यासाठी योग्य स्कीन केअर फॉलो करायला हवं. उन्हाळ्यात तर त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. मात्र असं असूनही बऱ्याचदा स्कीन केअरमध्ये टोनर्सचा विचार केला जात नाही. त्वचा स्वच्छ करणे, मॉईस्चराईझ करणे यासोबतच ती टोन करणेही तितकेच गरजेचं असतं. एकतर टोनर्स खूप अप्रतिम असतात, शिवाय त्यामुळे तुमच्या त्वचेचा पी एच बॅलन्स राखला जातो. उन्हाळ्यात त्वचेला थंडावा आणि मऊपणा येण्यासाठी टोनर्सचा वापर फायदेशीर ठरतो. जर तुम्ही त्वचेवर फक्त नैसर्गिक घटकांचा वापर करत असाल तर तुम्ही घरीच काही टोनर्स तुमच्या त्वचेसाठी बनवू शकता.
गुलाब पाणी हे अप्रतिम टोनर आहे. कारण यामुळे गुलाब जितकं सुंदर असतं तितकंच गुलाबपाणी तुमच्या त्वचेला सुंदर बनवतं. म्हणूनच अनेक सौंदर्य उपचारांमध्ये गुलाब पाण्याचा वापर केला जातो. उन्हाळ्यात गुलाबपाण्यामुळे तुमची त्वचा मऊ, हायड्रेट आणि फ्रेश राहते.
बनवण्याची पद्धत
ग्रीन टी देखील तुमच्या त्वचेसाठी अतिशय उत्तम ठरते. कारण त्यामध्ये असलेले अॅंटि ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करतं. त्वचा मॉईस्चराइझ करण्यापासून त्वचेवरील अतिरिक्त तेल काढण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी ग्रीन टीचा वापर होतो.
बनवण्याची पद्धत
कडुलिंबाचा वापर त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. सहाजिकच त्यातील औषधी गुणधर्म तुमची त्वचा सुरक्षित आणि निर्जंतूक ठेवतात. कडुलिंबामधील अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे तुमच्या उन्हाळ्यात त्वचेवरील तेलकटपणामुळे येणारे घामोळे आणि रॅशेस कमी होतात.
बनवण्याची पद्धत
काकडी तुमच्या त्वचेला हायड्रेट आणि मऊ ठेवण्यास मदत करते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे खाण्यासोबतच उन्हाळ्यात काकडीचा वापर तुम्ही टोनरप्रमाणे करू शकता. काकडीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन्स सी आणि इतर गुणधर्मांमुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते
बनवण्याची पद्धत
यासोबतच तुम्ही ऑर्गेनिक हारवेस्टचं व्हिटॅमिन सी टोनर त्वचेसाठी वापरू शकता. कारण यामध्ये शंभर टक्के नैसर्गिक आणि सेंद्रिय घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. अकाई बेरी आणि डेझी फ्लॉवर्सचा अर्क यात वापरण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेची मोकळी छिद्रे बंद होतात आणि त्वचेचा पी एच बॅलन्स राखला जातो. यामध्ये पेराबेन, मिनरल्स अथवा प्राण्यांच्या घटकांचा वापर करण्यात आलेला नसून हे टोनर सर्व प्रकारच्या त्वचेसाठी आणि पुरूष आणि महिला दोघांसाठी उपयुक्त आहे. तेव्हा या उन्हाळ्यात हे टोनर वापरा आणि त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक