ADVERTISEMENT
home / Care
केस पांढरे झाले असतील तर पांढऱ्या केसांवर टाळा हे प्रयोग

केस पांढरे झाले असतील तर पांढऱ्या केसांवर टाळा हे प्रयोग

सुंदर केस ही महिलांची ओळख आहे. त्यातल्या त्यात केस काळेभोर असतील तर ते अधिक सुंदर दिसतात. वयपरत्वे किंवा काही कारणास्तव आता केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. हल्ली लहान मुुलांचेही केस पांढरे होतात. पांढरे केस हे कोणालाच आवडत नाही. केस पांढरे झाले की, सगळेच केसांवर काहीना काही प्रयोग करतात. पण पांढऱ्या केसांवर काही प्रयोग करणे हे त्रासदायक ठरु शकते. तुमचेही केस पांढरे झाले असतील तर तुम्ही काही प्रयोग करणे टाळायला हवे.जाणून घेऊया तुम्हीही पांढऱ्या केसांवर करत असाल कोणत्या चुका

त्वचेचा हा प्रकार असणाऱ्यांनी टाळा हे नैसर्गिक घटक

पांढरे केस काढणे

पांढरे केस काढणे

Instagra

ADVERTISEMENT

 खूप जणांना आरशासमोर उभे राहून पांढरा केस काढायची सवय झालेली असते. एकही पांढरा केस डोक्यात राहायला नको म्हणून खूप जण पांढरे केस काढत राहतात. जर तुम्ही ही चूक करत असाल तर अजिबात हे करु नका. कारण पांढरे केस काढल्यामुळे  केसांचे पोअर्स ओपन होतात. केसांना टक्कल पडण्याची शक्यता असते. तुम्ही जितके पांढरे केस काढाल तितके तुम्हाला डोक्याला टक्कल पडेल. शिवाय असे म्हणतात पांढरा केस ओढून काढल्यामुळे आजुबाजूचे केस दुखावले जातात. त्यामुळे पांढरे केस काढणे टाळा. 

तांदूळापासून बनवा हे सोपे फेस केअर किट

सतत रंग करणे

 खूप जणांना आपल्या केसांचा रंग पांढरा झाला आहे हे दाखवायलाही मुळीच आवडत नाही. त्यामुळे अशी लोक सतत केसांना रंग करत राहतात. केसांच्या रंगामध्ये निमोनिया असतो. त्यामुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना सतत रंग लावू नका. केसांना सतत रंग घालण्याची सवय ही स्काल्पसाठी हानिकारक ठरु शकते.  जर तुम्हाला सतत केसांना रंग लावायची सवय असेल तर ती बदला. कारण सतत रंग लावल्यामुळे आणखी केस पांढरे होण्याची शक्यता असते.  केसांना रंगवण्यासाठी तुम्ही मेेंदीचा उपयोग करत असाल तरी देखील ती मेंदी केसांना शुष्क करु शकते. त्यामुळे केसांना मेंदीचा वापरही त्रासदायक ठरु शकतो. 

हिट मशीनचा प्रयोग

हिट मशीनचा प्रयोग

ADVERTISEMENT

Instagram

कधीकाळी केसांवर काहीतरी करणे हे ठीक आहे. पण खूप जणांना केसांवर स्ट्रेटनर, कर्लर, हेअर ड्रायर वापरायची सवय असते. केसांना हिटचा प्रयोग केल्यामुळे केस तुटण्याची शक्यता ही अधिक असते. केस पांढरे झाल्यामुळे आधीच केस नाजूक झालेले असतात. काळ्या केसांच्या तुलनेत पांढरे केस जाड वाटत असले तरी देखील ते डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा केसांवर हिट मशीनचा अतिरिक्त उपयोग करणे टाळा. त्यामुळे इतर केसांचेही नुकसान होणार नाही.

वापरलेल्या लिंबाच्या साली फेकू नका, गृहिणींनी असा करून घ्या फायदा

दुर्लक्ष करु नका

आता पांढऱ्या केसांकडे दुर्लक्ष करणे देखील चांगले नाही. वयपरत्वे शरीरातील मेलनिन घटक कमी झाल्यामुळे केस पांढरे होऊ लागले असतील तर ठीक पण वयाच्या आधीच केस पांढरे होऊ लागले असतील. तर ते केसांच्या काही समस्या वाढवण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी तुम्ही केसांकडे दुर्लक्ष करु नका.पांढरे केस  होण्यापासून रोखण्यासाठी  तुम्ही योग्य उपाययोजना करा. त्यामुळे केस चांगले राहण्यास मदत मिळेल. 

ADVERTISEMENT


आता पांढऱ्या केसांची निगा राखत या गोष्टी करणे टाळले की, केस चांगले राहण्यास मदत मिळेल.

14 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT