ADVERTISEMENT
home / आरोग्य
do-not-hesitate-to-discuss-with-your-gynecologis

आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी चर्चा करताना संकोच बाळगू नका

अनेकदा असे दिसून आले येते की महिला त्यांच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्यासंबंधीत समस्यांविषयी डॉक्टरांसोबत खुलेपणाने चर्चा करत नाहीत. ब-याचदा त्यांना याबाबत उघडपणे बोलण्यास लाज वाटते किंवा संकोच वाटतो. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही डॉक्टरांकडे जाणे आणि तुमच्या सर्व शंका दूर करणे का अत्यावश्यक आहे. याबाबत आम्ही डॉ. वीणा औरंगाबादवाला, स्त्रीरोग तज्ञ, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर यांच्याकडून जाणून घेतले. 

होय, हे ज्ञात सत्य आहे की स्त्रियांना त्यांच्या लैंगिक सवयी, शारीरिक बदल, मासिक पाळी, गर्भधारणेपूर्व चाचण्या आणि तपासण्या आणि आरोग्याच्या समस्यांबद्दल केवळ त्यांच्या मित्रांसोबतच नव्हे तर स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलतानाही अस्वस्थता आणि लाज वाटू शकते. महिलांना त्यांच्या आयुष्यात आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे योग्य उपचार मिळणे ही काळाची गरज आहे. म्हणून, तज्ञांच्या मदतीने आपल्या समस्यांचे वेळीच निराकरण करण्याचा प्रयत्न करा. खाली दिलेल्या विषयांवर स्त्रीरोगतज्ञांशी चर्चा करण्यास संकोच बाळगू नका

या विषयावर बिनधास्त बोला

1. लैंगिक आरोग्यासंबंधी समस्या: जर तुम्हाला कॅंडिडिआसिस (सामान्यत: त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग), गोनोरिया (लैंगिक संक्रमित जिवाणू संसर्ग), जननेंद्रियावरील चामखीळ, संसर्ग झाला असेल किंवा इतर कोणतीही समस्या असतील जसे की योनमार्गाचा कोरडेपणा, कमी कामवासना आणि असामान्य स्त्राव याची देखील नोंद घेणे आवश्यक आहे. गर्भनिरोधकांच्या विविध पद्धती आणि त्यांचा वापर, परिणामकारकता आणि दुष्परिणाम याबद्दल स्वतःला शिक्षित करा. योनीविषयी अधिक माहिती घ्या.

2. मासिक पाळीच्या समस्या: अशा अनेक महिला आहेत ज्यांना मासिक पाळी अनियमित असू शकते. मासिक पाळी खूप लहान, लांब असू शकते किंवा काहीवेळा मासिक पाळीच येत नाही. शिवाय झोपेची कमतरता, जास्त स्क्रीन वेळ आणि तणाव मासिक पाळी आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात. वेदनादायक कालावधी एंडोमेट्रिओसिस (गर्भाशयाच्या अस्तरापासून उद्भवणारा एक प्रकारचा रोग) किंवा गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स (गर्भाशयात उद्भवणारे सौम्य ट्यूमर) मुळे असू शकतात. आपण सतर्क राहणे आवश्यक आहे, आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.

ADVERTISEMENT

3. लसीकरण: तुम्हाला माहिती आहे का? काही लसीकरण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, एचपीव्ही विषाणू, हिपॅटायटीस बी, रुबेला विरुद्ध मदत करेल. हे एखाद्याला एसटीडी होण्यापासून रोखण्यासाठी, इतर लस जसे की हिपॅटायटीस ए, टायफॉइड, इन्फ्लूएन्झा आणि दम्याच्या रुग्णांसाठी न्यूमोकोकल लस देखील संपूर्ण आरोग्यासाठी घेतली जाऊ शकते.

4. पॅप चाचणी: जर तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असाल, तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी पॅप स्मीअर आवश्यक आहे, लसीकरण केले आहे किंवा नाही.

5. स्तनाची स्व-तपासणी: स्तनाच्या कर्करोगाच्या विविध चिन्हे जसे की गाठ, स्तनाग्रांना सूज आणि स्तनाग्रातून होणारा स्त्राव दिसण्यासाठी ही दुसरी महत्त्वाची पद्धत आहे. 

तुम्हाला याबाबत बोलण्याची अजिबात लाज वाटण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी अर्थात स्त्री रोग तज्ज्ञांशी अगदी बिनधास्तपणे या समस्यांबाबत बोलायला हवे. लाजण्यामुळे तुम्ही स्वतःलाचा त्रास करून घेऊ शकता. योग्य पद्धतीने तुमची समस्या डॉक्टरांपर्यंत पोहचली तर त्यावर योग्य उपचार होण्यास अधिक फायदा होतो. त्यामुळे कधीही संकोच न बाळगता आपल्या समस्या डॉक्टरांकडे मांडा आणि त्यावर वेळीच उपचार घ्या. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT