ADVERTISEMENT
home / आरोग्य
Symptoms Of Lung Cancer

फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये सुरुवातीला दिसतात ही लक्षणे, दुर्लक्ष करणे पडते महागात

कधीकधी मानवी शरीरातील काही पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. पेशींच्या या अनियंत्रित वाढीला ट्यूमर म्हणतात. जेव्हा या पेशी संक्रमित होतात तेव्हा त्याला कर्करोग म्हणतात. जेव्हा हा कर्करोग फुफ्फुसात सुरू होतो किंवा शरीराच्या इतर भागातून संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला फुफ्फुसाचा कर्करोग म्हणतात. भारताबाबत बोलायचे झाले तर आपल्या देशातील एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी ७ टक्के रुग्ण हे फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत.दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ही बाब चिंताजनक आहे.

धूम्रपान न करणाऱ्यांनाही आहे याचा धोका 

Symptoms Of Lung Cancer In Marathi
Symptoms Of Lung Cancer

फुफ्फुसाचा कर्करोग आता जगाप्रमाणेच भारतातही सामान्य झाला आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सुमारे एक दशकापूर्वी, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे 10 टक्के रुग्ण असे होते जे धूम्रपान करत नव्हते, तर आता 20 टक्क्यांहून अधिक असे रुग्ण आढळले आहेत जे धूम्रपान करत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढते प्रदूषण होय. फुफ्फुसाचा कॅन्सर हा सायलेंट किलर आहे आणि त्याचा हळूहळू परिणाम होतो. याचे प्रमुख कारण धूम्रपान असले तरी आता अनेक धूम्रपान न करणारे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाला बळी पडत आहेत. सुरुवातीच्या अवस्थेतच त्याचा शोध घेऊन त्यावर योग्य उपचार केले तरच व्यक्तीच्या जगण्याची शक्यता वाढते. चिंतेची बाब म्हणजे केवळ १५-२० टक्के प्रकरणांमध्ये हा आजार सुरुवातीला आढळून येतो.

सुरुवातीला दिसून येत नाहीत लक्षणे 

दरवर्षी एक ऑगस्ट रोजी वर्ल्ड लंग कॅन्सर डे साजरा केला जातो. जगभरातील लोकांमध्ये या प्राणघातक आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो दरवर्षी लाखो लोकांना प्रभावित करतो. WHO नुसार, 2020 मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे 18 लाख लोकांनी आपला जीव गमावला होता. फुफ्फुसाचा कर्करोग हा प्राणघातक आजार आहे. हा रोग गंभीर अवस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची चिन्हे कळत नाहीत. म्हणूनच श्वसनाशी निगडित आजारांकडे दुर्लक्ष करू नये. जाणून घेऊया या धोकादायक आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत. 

फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे 

Symptoms Of Lung Cancer In Marathi
Symptoms Of Lung Cancer

जेव्हा तुमचा खोकला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकतो तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच, खोकला वाढल्यास आणि त्यासोबत रक्त येत असल्यास त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांना भेटा. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेटून आवश्यक त्या चाचण्या करून घ्या. जेव्हा वायुमार्ग अरुंद होतो किंवा फुफ्फुसातील ट्यूमरमधून द्रव छातीत जमा होते त्यामुळे धाप लागते किंवा श्वास घेणे कठीण होते. अशा वेळी वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांना दाखवावे. त्याचप्रमाणे छाती, खांदे, पाठ आणि शरीराच्या इतर भागात वेदना होणे हे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एक लक्षण असू शकते. जेव्हा कर्करोग हाडांमध्ये पसरतो, तेव्हा शरीराच्या अनेक भागांत असह्य वेदना होऊ लागतात. 

ADVERTISEMENT

कर्करोगाचे एक लक्षण अचानकपणे वजन कमी होणे हे देखील आहे. त्यामुळे तुमचे वजन काहीही प्रयत्न न करता अचानक कमी झाले तर ते फुफ्फुसाच्या कर्करोगासह इतर दुसऱ्या प्रकारच्या कर्करोगाचे लक्षण देखील असू शकते. असे घडते कारण कर्करोगाच्या पेशी तुमच्या शरीरातील सर्व ऊर्जा वापरण्यास सुरवात करतात. त्यामुळे ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका. 

फुफ्फुसाचा कर्करोग रोखण्याचा कोणताही निश्चित मार्ग नाही. कारण जे लोक धूम्रपान करत नाहीत त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होणार नाही असेही निश्चित नाही. धूम्रपान न करणे, धूम्रपान करणाऱ्यांच्या न राहणे, कार्सिनोजेनिक पदार्थांच्या संपर्कात न येणे, भरपूर फळे आणि भाज्या खाणे, नियमित व्यायाम करणे या गोष्टी पाळल्यास कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो. 

Photo Credit- istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
03 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT